सुखी होण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केलाच पाहिजे

Spread the love

जीवन जगतांना अनेक गोष्टी मिळविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न आणि कठोर परिश्रम केल्यानंतरच आपल्याला हव्या त्या गोष्टींची प्राप्ती होऊ शकते. ज्याप्रमाणे आपण ह्या गोष्टी मिळविण्यासाठी प्रयत्न करतो, त्याचसोबत आपल्याला अनेक अनावश्यक अशा गोष्टींचाही त्यागही करावा लागतो. काही काही गोष्टी आपल्याला जीवनातून कटाक्षाने प्रयत्नपूर्वक दूर कराव्या लागतात. अशा काही गोष्टींचा त्याग केल्याशिवाय अथवा काही गोष्टींना प्रयत्नपूर्वक सोडून दिल्याशिवाय आपल्याला प्रगती पथावर मार्गक्रमण करताच येत नाही.

Without sacrificing some things or trying to leave things in a few ways, we can not move on the path of progress.

उदा – आपल्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे असते. अशावेळी आपल्याला आपले घर सोडून, प्रवास करण्याकरिता बाहेर पडावेच लागेल. तावेली आपल्याला काही काळाकरिता का होईना, घराचा त्याग केल्याशिवाय आपल्या प्रवासाच्या इच्छित ठिकाणी पोहोचताच येणार नाही.

बालपणी आपण प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असतो, चौथी पर्यंत शिक्षण झाले की आपल्याला आपल्या त्या प्राथमिक शाळेचा त्याग करून हायस्कूलमधील पाचवीच्या वर्गात नाव टाकावे लागेल. तिथे आपण दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला त्या हायस्कूलचा त्याग करावा लागेल. त्यानंतर अकरावी करिता एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या पुढील शिक्षण घेण्याकरिता आपल्याला त्या महाविद्यालयाचा त्याग करून त्यापुढील उच्च शिक्षण घेण्याकरिता आपल्याला एखाद्या उच्च महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल, वगैरे वगैरे.

सांगायचे तात्पर्य एवढेच की जेव्हा आपल्याला प्रगतीच्या दिशेने पुढे जायचे असते तेव्हा मात्र आपल्याला पूर्वीच्या आपल्या जवळ असलेल्या अनेक गोष्टींचा त्याग करावाच लागतो. केवळ आपल्या जवळच्या काही गोष्टींचा त्याग करण्याची इच्छा आपण ठेवली नाही तर आपल्याला प्रगती पथावर पुढे जाणे अतिशय अवघड असते.

आपल्या प्रगती करिता अनेक गोष्टींचा त्याग करणे, ही आपल्या जीवनातील एक अत्यंत अपरिहार्य अशी गोष्ट आहे. एखादी जुनी गोष्ट सोडल्याशिवाय नवीन गोष्टींची प्राप्ती करणे अत्यंत अवघड असते. जुन्या गोष्टींचा त्याग करण्याची प्रवृत्ती आपण जर ठेवलीच नाही तर त्यामुळे आपला प्रगतीचा मार्ग खुला होणे फारच कठीण असते.

त्यामुळे त्याग करण्याची प्रवृत्ती आपल्या मनात निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात वेळोवेळी प्रसंगानुसार आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.

उदा – एखाद्या तरुण मुलीला तिचे लग्न झाल्यावर आपल्या आई-वडिलांच्या घराचा त्याग करून तिच्या पतीच्या घरी जाऊन तिथे आपल्या नवीन घर संसाराची स्थापना करावी लागते. त्याकरिता तिला तिच्या आई वडिलांच्या घराचा त्याग केल्याशिवाय तिला तिच्या नवीन घर संसाराची स्थापना करताच येत नाही. हा त्याग केल्याशिवाय तिला तिच्या स्वतःच्या नवीन घर संसाराची प्रगती कधीच करता येणार नाही.

you have to abandon all the bad things so you can have good things in life

आपल्या जीवनातील अनेक वाईट गोष्टींशी आपला संबंध येतो. आपल्याला अनेक वाईट गोष्टींच्या सवाई लागलेल्या असू शकतात. ह्या सर्व वाईट गोष्टींचा आपल्याला कटाक्षाने त्याग करावा लागेल तरच कदाचित आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींची रुजुवात होऊ शकेल. जोपर्यंत आपल्या मनामध्ये, आपल्या विचारांमध्ये तसेच आपल्या कार्यामध्ये अशुभाचे दर्शन होईल, तोपर्यंत आपण काहीना काही तरी अशुभ अथवा वाईट कृत्यच करीत राहू. आपण आपल्या मनामध्ये असलेल्या वाईट विचारांचा आणि त्या विचारानुसार आपण करीत असलेल्या वाईट कार्याचा त्याग केल्याशिवाय आपण चांगले कार्य करूच शकत नाही.

आपल्या मनामध्ये इतरांबद्दल क्रोध, इर्षा, द्वेष, मोह, ममता, लोभ हे दुर्गुण ठामपणे बसलेले असतात. ह्या दुर्गुणांचा त्याग केल्यासच, आपल्या मनामध्ये दया, प्रेम, करुणा, श्रद्धा, निस्वार्थीपणा ह्यासारख्या काही गुणांची रुजुवात होऊ शकते. आपल्या मनातील अनेक वाईट अथवा अशुभ विचारांमुळे अपान ज्या काही वाईट गोष्टी अथवा वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त होतो, त्या सर्वच वाईट अथवा अशुभ विचारांचा आपण त्याग केला पाहिजे. तरच आपल्या मनात चांगले विचार निर्माण होऊन आपण चांगले कार्य करण्यास प्रेरित होऊ.

We must avoid all these bad things while talking with someone

आपण इतरांशी बोलतांना बऱ्याच वेळा खोटे बोलतो, इतरांची टिंगल टवाळी करतो, त्यासोबतच खोटी प्रशंसा किंवा चापलुसी करतो, इतरांशी कटू अथवा वाईट शब्दांत बोलतो, आपल्या बोलण्यातून आपण इतरांची निंदा किंवा अपमानही करतो, अनेकांशी बोलतांना आपण अनावश्यक गोष्टीही बोलतो, आपल्या बोलण्यातील ह्या सर्व वाईट गोष्टींचा आपण कटाक्षाने त्याग केला पाहिजे. आपल्या अशा बोलण्यामुळे इतरांशी आपले मतभेद, भांडणे, वादावादी होऊन आप-आपसातील चांगले असलेले संबंधही बिघडून जातात. त्यामुळे आपल्या बोलण्यातील ह्या सर्व वाईट गोष्टींचा आपण कटाक्षाने त्याग केलाच पाहिजे, तरच आपण इतरांशी योग्य शब्दांत, गोड आवाजात, इतरांचा मान-सन्मान ठेवून योग्य तेच बोलून सर्वांशी आत्मीयता ठेवून वागण्यास प्रवृत्त होऊ शकतो.

अशाप्रकारे आपल्या जीवनाला वाईट प्रवृत्तीकडे नेणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, त्या त्या सर्वच गोष्टींचा त्याग केल्यास आपल्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टींचा उदय होईल. असे काही झाले तरच आपल्या जीवनात प्रगती होऊन आपल्याला निश्चितपणे सुख-शांती समृद्धी सह समाधानही प्राप्त होईल, ह्याची खात्री बाळगा.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!