वाचाल तर वाचाल – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Spread the love

ज्या कामाची आपल्याला आवड नसते ते वाचन करण्याचे काम आपण नेहमीच टाळत असतो, त्या कामाबद्दल आपल्याला कुणी विचारणा केलीच तर मात्र आपण “मला वेळच नाही”, असे कारण सांगतो. विशेष हे की, आपल्याला खायला, टी.व्ही पाहायला, इतरांशी गप्पा मारायला, मोबाईल खेळायला, कितीही वेळ झोपायला, विनाकारण वेळ घालवायला भरपूर वेळ असतो. परंतु वाचायला मात्र आपल्याकडे अजिबात वेळ नसतो, ही गोष्ट अगदी सत्य आहे.

अनेक लोक असे असतात ज्यांना वाचनाची अजिबात आवड नसते. एखाद्या चांगल्या वाचनिय असलेल्या पुस्तकाचे सलग पाच पानेही वाचण्याची त्यांची इच्छा नसते. कारण ते त्या ठिकाणी आपले मन कधीच एकाग्र करू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीमध्ये नवीन माहिती मिळविण्याची तीव्र इच्छा असली तरच ती व्यक्ती वाचन करण्याकरिता तयार होते.

now a days people say they don't have time to read

आपण कशाकरिता वाचन करीत असता? असा प्रश्न जर आपण काही लोकांना विचारला तर प्रत्येक व्यक्ती ह्या प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे देतील. जे विद्यार्थी असतील ते म्हणतील, “आम्ही फक्त परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरिताच वाचन करतो”, महाविद्यालयातील विद्यार्थीसुद्धा असे काहीतरी उत्तर देतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणतील आम्ही स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होण्याकरिताच फक्त त्या संदर्भातीलच पुस्तकांचे वाचन करीत असतो. दैनिक वर्तमान पत्रांचे वाचन करणाऱ्या व्यक्ती म्हणतील की, “दररोज आपल्या शहरात, राज्यात, तसेच देश-विदेशात काय काय घडत आहे त्याची थोडी फार माहिती असावी, म्हणून आम्ही वाचन करतो”, साप्ताहिक मासिकांचे वाचन करणारेही असेच काहीतरी उत्तर देतील, त्यांचे हे जे काही वाचन चालते ते सुद्धा अगदी वरवरचे आणि विशेषतः हेड लाईनचेच वाचन असते. त्याखालील मजकुरावर ते फक्त एक सरासरी नजर फिरवतील. एखाद्या वर्तमान पत्रात लहान मोठ्या अशा पन्नास बातम्या जर असतील तर त्यातील फार तर फोन ते तीनच बातम्या ते वाचतील, बाकी केवळ हेडलाईनवरून नजर फिरवून ते लगेच वर्तमान पत्र बाजूला ठेवतील, कारण काय तर त्यांच्याकडे वाचायला अजिबात वेळच नसतो. मी अगोदर सांगितलेली अनेक महत्वाची कामे त्यांच्या मागे असतात.

अनेक लोकांचा प्रश्न असतो की, वाचन करून आपला काय फायदा होणार आहे? त्यापेक्षा आपण आपली दैनंदिन कामे करीत राहावे. ( चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने हे  फायदे  होतात )

look for the book shelf when you visit someone's house

आपण कुणाच्या घरी जर गेलो तर तिथे सर्वप्रथम एका गोष्टीचे निरीक्षण करा, त्या घरातील कपाटात किंवा रॅकमध्ये तुम्हाला काही पुस्तके दिसतात काय? दिसत असतील तर किती पुस्तके दिसतात? ती पुस्तके कोणत्या प्रकारची तसेच कोणत्या विषयावरील आहेत? एवढ्या गोष्टींचे आपण निरीक्षण केले की, त्या घरातील लोकांची मनोवृत्ती, प्रवृत्ती, त्यांचे संस्कार, त्यांच्या वागण्याची, बोलण्याची, राहण्याची पद्धत ह्या संदर्भात आपल्याला बराचसा अंदाज येऊ लागतो.

ज्या घरात धार्मिक पुस्तके किंवा धार्मिक ग्रंथ ठेवलेले असतात, त्या घरातील लोक बहुधा धार्मिक प्रवृत्तीचेच असतात. जिथे तांत्रिक विषयाची पुस्तके असतात, त्या घरातील कुणीतरी व्यक्ती त्या विषयाचा अभ्यास करीत असेल, ज्या घरातील कायद्यासंदर्भातील पुस्तके असतात त्या घरातील कुणीतरी व्यक्ती बहुधा वकिलीचा अभ्यास किंवा वकिली करीत असेल, जिथे कथा, कादंबऱ्या मोठ्या साहित्यिकांची ग्रंथ संपदा असेल तेथील व्यक्ती साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत असणारा असू शकेल. अशाप्रकारे ज्या ज्या घरात ज्या ज्या विषयासंदर्भातील पुस्तके असतील, त्या त्या घरातील लोक त्या त्या क्षेत्रात निश्चितपणे कार्य करतांना आपल्याला दिसून येतील. अनेक घरात तर कोणत्याच विषयावर पुस्तके दिसून येत नाहीत, अशावेळी त्या घरातील लोक थोडेफार शिकलेले जरी असतील तरी त्यांच्या घरात वाचन संस्कृती अजिबात दिसून येणार नाही. अशा परिवारातील लोक क्वचित आर्थिक दृष्ट्या संपन्न जरी असले तरीही ते थोडे विक्षिप्त आणि मनोरुग्णही असण्याची शक्यता असते.

people who don't like to read are the one who don't want to keep the books at home

“पुस्तके आपल्याला काय देतात? पुस्तके वाचून आपला काय फायदा होणार आहे? पुस्तके विकत घेऊन एवढे पैसे कशाला बरबाद करायचे? पुस्तके म्हणजे घरातील मोठी अडगळच असते? पुस्तकांची ही रद्दी रद्दीवाल्याला देऊन आपल्या घरातील ही अडगळ दूर केली पाहिजेत” असे दिव्य विचार असणारीही बरीच मूर्ख मंडळी आपल्या समाजात असतातच, जे त्यांच्याच पूर्वजांच्या ग्रंथ भांडाराचा निकाल लावू इच्छितात.

काही काही ठिकाणी तर घरातील एखाद्याच जेष्ठ व्यक्तीला पुस्तकांची आवड असते तर त्यांच्या घरातील इतर सर्वच मंडळींना पुस्तकांची अजिबात आवड नसते. आपल्या घरातील विविध प्रकारच्या ग्रंथ संग्रहात कोणकोणत्या विषयांची पुस्तके आहेत? ह्याची सुद्धा त्यांना काहीच माहिती नसते. त्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाचा लाभ घेण्याची त्यांची कधीच इच्छा होत नाही, कारण त्यांच्यामध्ये ज्ञान मिळविण्याची आवडच नसते.

people gain their knowledge by reading books

ज्या विषयाची आपल्याला काहीच माहिती नसते, त्या अनेक अज्ञात विषयाची माहिती आपल्याला केवळ पुस्तकेच देतात. जगातील अनेक ज्ञानी व्यक्तींनी त्यांचे अनुभव पुस्तकांमध्ये सांगितलेले असतात. त्यांचे ते अनुभव आपल्याला त्यांची पुस्तके वाचूनच समजतात, त्या अनुभवाचा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात खूपच उपयोग होतो. समाजात कसे राहायचे? इतरांशी  कसे बोलायचे? इतरांशी कसे वागायचे? आपण आपले कार्य नीतीमत्तेने कसे करायचे? आपल्या परिवारातील लहान-थोर मंडळींशी कसे वागायचे? आपला स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ सोडून आपल्या घर परीवारायचे हीत कसे जपायचे? हे सर्व संस्कार आपल्याला चांगल्या पुस्तकांतूनच शिकायला मिळतात. पुस्तकांच्या वाचनामुळेच आपले व्यक्तिमत्व सर्वच दृष्टीने प्रगल्भ होत असते, पुस्तकांमुळेच आपले ज्ञान वाढते.

साने गुरुजींचे “शामची आई” ह्या पुस्तकामध्ये संस्कारांचा फार मोठा ठेवा साठविलेला आहे. अशा अनेक पुस्तकांमधूनच आपल्यावर चांगल्या संस्कारांची जडण-घडण होत असते. त्यामुळे अशा अनेक पुस्तकांचे आपण वाचन केलेच पाहिजे.

people who don't read, don't get successful in their life

ज्या ज्या परिवारातील मुलांनी, तरुणांनी ह्या पुस्तकांचा अभ्यास केलेला नाही अथवा वाचन केलेले नाही, ते निश्चितपणे संस्कार शून्य आणी बरेचसे विक्षिप्तही असतात. आपल्या परिवारातील किंवा बाहेरील लोकांशी कसे बोलावे? कसे वागावे? समाजात किंवा परिवारात कसे राहावे? ह्याची त्यांना अजिबात जाणीव नसते. पुस्तकांच्या वाचनाशिवाय त्यांचे जीवन संस्कारशून्य झालेले असते. त्यामुळे त्यांची एका ठरावीक मर्यादेपलीकडे अजिबात शैक्षणिक, व्यावसायिक, शारीरिक तसेच मानसिक प्रगतीसुद्धा कधीच होत नसते.

ज्यांचा चांगल्या पुस्तकांशी कधीच संबंध येत नाही, त्या लोकांचे जगणे, वागणे, बोलणे हे काहीचे विक्षिप्तपणाचेच असते. सुसंस्कार नावाच्या गोष्टींचा त्यांच्यामध्ये पूर्णपणे अभावच असतो. पुस्तक शत्रू असणाऱ्या अशा अनेक लोकांनी एवढे लक्षात ठेवावे की, जगात नीतीमत्ता सांभाळून ज्या ज्या लोकांनी आपली प्रचंड अशी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती केलेली आहे, ते सर्व पुस्तकप्रेमी होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन करून तसेच प्रचंड अभ्यास करू आणि ज्ञान मिळवूनच आपली प्रगती करून घेतलेली होती. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत की, “वाचाल तर वाचाल!”. पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त ग्रंथ पुस्तकांचा व्यक्तिगत ग्रंथ संग्रह केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच होता.

केवळ आपला प्रचंड ग्रंथ संग्रह ठेवण्याकरिताच त्यांनी मुंबईतील दादर येथे “राजगृह” नावाचा बंगला बांधला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यासारखा ग्रंथाची आवड असणारा आणी प्रचंड वाचन करणारा महापुरुष जगात दुसरा कुणीही नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

One thought on “वाचाल तर वाचाल – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!