देहबोलीसह बोलण्याची कला अवगत करणे आवश्यक

Spread the love

देहबोली म्हणजे आपल्या शरीराच्या हालचालीवरून ओळखता येणारी आपली अपेक्षित वर्तणूक. आपण काय करणार आहोत? आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत? आपण कोणता निर्णय घेणार आहोत? ह्या संदर्भात आपल्या शरीराच्या चेहऱ्याच्या आणि डोळ्यांच्या हावभावातील घडून येणारा अपेक्षित बदल ह्यालाच देहबोली असे म्हणतात.

तसा हा विषय फार मोठा आहे, इथे आपण केवळ त्या विषयांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. आपण जेव्हा कोणाशीही कोणत्याही कामाच्या संदर्भात संपर्क साधतो किंवा बोलतो, तेव्हा आपण जे काही शब्द उच्चारतो, त्या शब्दांना अनुसरूनच आपल्या शरीराचे, आपल्या डोळ्यांचे तसेच आपल्या चेहऱ्याचे हावभाव होत असतात. त्या हावभावांनाच देहबोली असे म्हणतात.

आपल्या मनात वेगळ्याच भावना असतील, त्या भावना प्रकट न करता आपण बोलतांना वेगळेच शब्द उच्चारले असतील आणि आपल्या शरीराने अथवा चेहऱ्याने आपल्या बोलण्यानुसार योग्य ते हावभाव प्रगत केले नसतील तर त्यावरूनही समोरच्या व्यक्तीला आपले अंतर्मन लगेच कळून येईल. त्यामुळे आपल्या बोलण्याचाही त्याच्यावर सकारात्मक परिणाम होणार नाही.

we can recognize anything by the gesture of someones body and face immediately

जेव्हा आपण एखाद्या कामासंदर्भात एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो, तेव्हा आपण त्याला जे काही काम सांगतले आहे, ते काम तो करणार आहे की नाही? हे आपल्याला त्याच्या बोलण्यावरून लगेच त्याच्या शरीराच्या आणि चेहऱ्याच्या हावभावावरूनही निश्चितपणे ओळखता येते. त्याच्या बोलण्यातील स्वर, त्याच्या बोलण्यातील शब्द, त्या शब्दाला त्याच्या डोळ्याची तसेच चेहऱ्याची अथवा शरीराच्या हावभावाची अपेक्षित प्रतिक्रिया काय दर्शवित आहे? हे सर्व पाहून आपण त्या व्यक्तीच्या मनातील विचार सहजपणे ओळखू शकतो.

आपल्या मनात जसे विचार निर्माण होतील, त्या विचारांनुसारचा आपण, त्याच प्रकारचे शब्द उच्चारतो. एवढेच नाही तर आपल्या चेहऱ्यावरही त्या शब्दांना अनुसरूनच डोळ्याचे, चेहऱ्यांचे तसेच शरीराचेही हावभाव प्रकट होत असतात. त्या हावभावावरुनच समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर, राग, घृणा, द्वेष, तिरस्कार, सन्मान, अपमान ह्यापैकी नेमकी कोणती भावना आहे हे आपल्याला सहजपणे ओळखता येते.

when we get angry it also affects our facial expressions and body language

जेव्हा आपल्याला कुणाचा कोणत्यातरी गोष्टीवरून अत्यंत राग येतो, तेव्हा त्या रागाच्या भावनेनुसार आपले कठोर शब्द आणि आपला तीव्र स्वर प्रकट करून त्या व्यक्तीशी आपण बोलत असतो. त्यानुसारच आपल्या डोळ्यांचे आणि आपल्या चेहऱ्याचेही हावभाव बदलत असतात. आपले शरीरही वरील भावनेनुसार आपली प्रतिक्रिया दर्शवित असते. आपण कुणाशी अत्यंत प्रेमाने बोलत असलो तर त्या भावनेनुसारच आपल्या डोळ्याचे, आपल्या चेहऱ्याचे आणि आपल्या शरीराचेही हावभाव प्रकट होत असतात आणि त्या भावनेनुसारच योग्य त्या शब्दांचा वापर करून योग्य त्या स्वरात आपण त्या संबंधित व्यक्तीशी बोलत असतो.

we can understand thousand things just by understanding body language

समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे की राग आहे? द्वेष भावना आहे की मैत्रीची भावना आहे? आपल्या बद्दल त्यांच्या मनात आदर व सन्मानाची भावना आहे की अपमानाची व तिरस्काराची भावना आहे? ह्याचा अंदाज घेण्याकरिता आपण त्यांच्या देहबोलीचे निरीक्षण केले तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला सहजपणे समजून जातील. देहबोलीमुळे जवळपास सत्तर टक्के त्यांच्या मनातील भावना आपण ओळखू शकतो. त्यानंतर ते जेव्हा आपल्याशी बोलू लागतील तेव्हा त्यांच्या बोलण्यातील शब्द तसेच त्यांचा बोलण्याचा स्वर ह्यावरून आपण त्यांच्या मनातील विचारांचा तसेच वर्तणुकीचा तीस टक्के अंदाज सहजपणे लावू शकतो.

जसे आपल्या मनातील विचार असतील, त्याप्रमाणेच आपली भाषा आणि शब्द व्यक्त होतात. त्या शब्दानुसारच आपल्या शरीराचे, डोळ्यांचे व चेहऱ्याचे हावभावही प्रकट होऊ लागतात.

we can understand when a person is happy by their body language

we can understand when a person is sad by their body language

 

एखादा व्यक्ती आनंदात असेल तर त्याच्या बोलण्यावरून तसेच शरीराच्या हावभावावरून, त्याच्या डोळ्यांवरून तसेच त्याच्या चेहऱ्यावरूनच आपल्याला त्याच्या मनातील आनंदाची भावना ओळखू येते. दुःखात तसेच रागात असणाऱ्या व्यक्तीलाही आपण अशाच पद्धतीने सहजपणे ओळखू शकतो. कोणत्याही व्यक्तीला आपण त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या व्यक्तीमत्वावरून तसेच त्याच्या शब्दावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून आपण ओळखू शकतो.

a persons body language is based upon their feelings for another person

ज्याप्रमाणे तो व्यक्ती असेल, त्याप्रमाणेच त्याची वागणूक राहील, त्याच्या वागणुकीप्रमाणेच त्याने उच्चारलेले शब्द तसेच त्याचे बोलणे राहील. त्याच्या मनात कुणाबद्दल जर घृणा, द्वेष, मत्सर, राग, तिरस्कार, आनंद, प्रेम, सन्मानाची अथवा अपमानाची भावना असेल तर त्या त्या भावनेनुसारच त्याच्या शरीराचे हावभाव आणि त्याचे बोलणे तसेच त्याच्या आवाजाचा स्वरही असेल. त्याची ओळख त्याने उच्चारलेल्या शब्दांतून तसेच त्यांच्या हावभावातून सहजपणे होत असते.

good body language is very important in professional as well as in personal life

गोड बोलण्याने आवाजातील चांगल्या स्वराने कोणतेही बिघडलेले काम सहजपणे होऊ शकते. चांगला व्यवहार आणी चांगली भाषा असेल तर कोणतीही समस्या सहजपणे सुटते. त्याउलट अप्रिय भाषा अथवा वाईट शब्द, तसेच कर्णकर्कश आवाज असेल तर आपली सहज होणारी कामेही अजिबात होत नाहीत. बोलणे ही सुद्धा एक कला आहे, प्रत्येक व्यक्तीला ही कला शिकणे आवश्यक आहे. बोलतांना कोणत्या शब्दांत, कोणत्या स्वरात तसेच कोणत्या पद्धतीने बोलावे, ह्याला फारच महत्व असते.

आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात अनेकवेळा अनेकांशी अनेक कामासंदर्भात बोलावेच लागते. तुम्ही कोणासोबत, कोणत्या विषयावर, कोणत्या स्वरात बोलणार आहात? ह्याचा तुम्ही बोलण्याअगोदरच विचार केला पाहिजे. कोणत्याही संदर्भात कुणाशीही बोलण्याची आवश्यकता पडल्यास सदैव गोड शब्दांत आणि चांगल्या स्वरातच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या वाईट शब्दांमुळे आपसातील संबंध बिघडून होणारी कामेही होत नसतात. तसेच इतरांच्या दृष्टीत आपण अप्रिय ठरत असतो, ह्या सर्व गोष्टींचे आपण भान ठेवलेच पाहिजे.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!