आपण कमाविलेल्या पैशांचे अशाप्रकारे नियोजन करा

Spread the love

जेव्हा आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक पैसा येतो, तेव्हा तो पैसा आपण हौस, मौज, मजा सारख्या इतर अनावश्यक गोष्टींवर खर्च करतो. त्यामुळे आपल्याकडे पैसा शिल्लक राहात नाही. वर्तमान काळात केलेली बचत आपणास भविष्यकाळात नक्कीच उपयोगी पडते. म्हणून बचतीचे महत्व ओळखून त्याप्रमाणे प्रत्येकाने बचत करणे हे शिकलेच पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीचे महिन्याचे आर्थिक उत्पन्न वेगवेगळे असते. त्यानुसार त्या व्यक्तीला आपल्या खर्चाचे नियोजन करावे लागते. नियोजन करून खर्च न केल्यास इतर अनावश्यक ठिकाणी अतिरिक्त रक्कम खर्च केल्या जाते आणि आवश्यक त्या गोष्टीकरिता रक्कम कमी पडते आणि त्यामुळे महिन्याच्या खर्चाचे आपले नियोजन अथवा बजट बिघडते.

खालील गोष्टींद्वारे तुम्ही तुमच्या पैशांचे नियोजन करून आपला अतिरिक्त होणारा अनावश्यक खर्च टाळून पैशांची बचत करू शकता.

 

आपले महिन्याचे एकूण उत्पन्न किती आहे? त्यातील किती पैसे हे कोण-कोणत्या गोष्टींकरिता खर्च होतात याची नोंद खालीलप्रमाणे करा.

  • किराणा सामान
  • घर भाडे / बिल्स (लाईट बील, पेपर बील इत्यादी)
  • रिचार्ज (टीव्ही / मोबाईल / इंटरनेट)
  • खाणे-पिणे
  • शिक्षणावरील खर्च
  • वाहनांचा पेट्रोल खर्च
  • आजारपणावरील खर्च
  • इतर किरकोळ खर्च

एकूण खर्च

महिन्याची बचत

 

नोंद केलेल्या गोष्टींवर होण्याऱ्या खर्चाचे चांगले निरीक्षण करा. आता वरील सर्व गोष्टींवर लागणाऱ्या खर्चासाठी एक नवीन बजेट शीट तयार करा, त्यावर नवीन नियोजनानुसार कोण-कोणते खर्च आपण कमी करू शकतो त्यानुसार नियोजन करून अपेक्षित खर्चाची नवीन रूपरेषा तयार करा. सर्व नोंदी करून पुढील महिन्यापासून त्यानुसार व्यवस्थित खर्च करा.

 

खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा.

 

१) उधारीत किंवा लोन वर एखादी वस्तू घेण्याचा मोह टाळा.

avoid buying something on loan

एखादी वस्तू आपल्याला उधारीत मिळत असेल तर आपल्याला त्या वस्तूची अत्यंत गरज नसेल तरीही ती वस्तू घेण्याचा आपल्याला मोह होतो. लोनवर घेतलेल्या वस्तूच्या किमतीवर आपल्याला अधिक रकमेचे व्याज भरावे लागते. व्याज आणि मूळ किंमत वेळेवर भरता आली नाही तर त्याकरिता आपल्याला अतिरिक्त रकमेची पेनल्टीसुद्धा भरावी लागते. तीन पेक्षा अधिक हफ्ते थकीत झाले तर आपण लोनवर घेतलेली वस्तू जप्तही केल्या जाते.

 

२) कोणतीही वस्तू विकत घेण्याअगोदर ती वस्तू खरच आवश्यक आहे का? यावर विचार करा, आवश्यक नसल्यास ती वस्तू घेऊ नका.

before buying any item Think about it

 

एखादी वस्तू विकत घेण्याअगोदर ती वस्तू दुकानात पाहून आल्यानंतर चार दिवस ती वस्तू न घेता त्या वस्तूशिवाय आपले काही काम अडत आहे काय? याचा विचार करा, जर त्या वस्तूशिवाय आपले काम चालू शकते काय? याचा प्रयत्न करा.

 

३) मित्रांसोबत सतत बाहेर हॉटेलमध्ये जेवणाकरिता अथवा थेटर मध्ये मुव्ही बघण्याकरिता जाण्याचे प्रमाण थोडे कमी करा.

stop going out with friends to save money

मित्रांसोबत सतत बाहेर हॉटेलमध्ये जेवण्याकरिता जेव्हा आपण जातो तेव्हा त्या ठिकाणी आपले कमीत-कमी २५० रुपये खर्च होतात. शिवाय मुव्ही पाहण्याकरिता गेलो तर तिथेही आपले जवळपास २०० रुपये खर्च होतात. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण्याऐवजी आपल्या मित्रांना आपल्या घरी जेवायला बोलवा तसेच थेटरमध्ये मुव्ही बघण्याऐवजी त्यांच्यासोबत आपल्या घरीच लॅपटॉप किंवा टीव्हीवर मुव्ही बघा.

 

४) वारंवार कपडे/बूट खरेदी करू नका.

Do not buy clothes shoes frequently.

वारंवार कमी किमतीचे, हलक्या दर्जाचे कपडे/बूट घेण्याएवजी एकदाच जास्त काळ टिकणारे चांगल्या दर्जाचे टिकाऊ कपडे/बूट घ्या. चांगल्या दर्जाचे, जास्त काळ टिकणारे कपडे/बूट घेतल्याने ते लवकर खराब होणार नाहीत आणि तुम्हाला परत-परत नवीन कपडे/बूट घेण्याची गरजही पडणार नाही.

 

५) आपल्या पाकिटात अतिरिक्त पैसे ठेऊ नका.

Do not put extra money in your pocket.

आपल्या पाकिटात अतिरिक्त पैसे असल्यास ते पैसे इतर अनावश्यक कामासाठीही खर्च करण्याचा आपल्याला मोह होतो. त्यामुळे आपल्या पाकिटात आवश्यक तेवढीच रक्कम ठेऊन उरलेले पैसे आपल्या बँक अकाऊंटमध्ये जमा करा.

 

६) बाहेर मेस लावण्याऐवजी अथवा कॅन्टीनमध्ये जेवण्याऐवजी घरी स्वतः स्वयंपाक बनवा.

learn to cook at your home to save some extra money

आपण जेव्हा शिकण्यासाठी अथवा नोकरीसाठी बाहेरगावी राहातो तेव्हा आपण मेस लावतो किंवा कॅन्टीनमध्ये जेवतो. ह्यामध्ये प्रत्येकी १६०० ते २००० रुपये दरमहा खर्च होतो. त्याऐवजी आपण दोन-तीन मित्र मिळून घरीच स्वयंपाक करण्याचे ठरविले तर अत्यंत कमी पैशांमध्ये आपला जेवणाचा खर्च भागू शकतो.

 

७) सामान खरेदी करण्याकरिता जाण्याअगोदर शॉपिंग लिस्ट बनवून घ्या, लिस्ट मध्ये नोंदविलेल्याच साहित्याची खरेदी करा.

make your shopping list before going to shopping

बाहेर सामान खरेदी करण्याकरिता गेल्या नंतर तिथे दुकानात आपल्याला इतरही अनेक वस्तू दिसतात ज्या आपल्याला घेण्याचा मोह होतो. अशावेळेस आपण बनविलेल्या लिस्टनुसारच सामान खरेदी करा, असे केल्यास आपल्याला नको असलेल्या अनावश्यक वस्तू निश्चितपणे टाळता येतात.

 

८) आवश्यक नसेल तेव्हा घरातील फॅन, लाईट बंद ठेवा.

switch off the fan and light when not in use

बऱ्याचवेळा आपण आपल्या घरातील फॅन, लाईट गरज नसतांनाही चालूच ठेवतो. अशावेळी अतिरिक्त वीज वापरल्या जाऊन वीज बिलावर अतिरिक्त खर्च होतो, म्हणून आवश्यक नसेल तेव्हा घरातील फॅन, लाईट बंद ठेउन आपण वीजबिलात बचत करू शकतो.

 

९) टीव्ही आणि इंटरनेटसाठी आपल्या ऑपरेटर कडून आवश्यक तेवढ्याच, योग्य त्या पॅकची माहिती घ्या.

find the suitable pack for tv and internet

बऱ्याचवेळा आपण टीव्हीचा जास्त चॅनल्स असलेला पॅक विकत घेतो. वास्तविक पाहता तेवढे जास्तीचे चॅनल्स पाहायला आपल्याला तेवढा वेळही नसतो, त्यामुळे त्या अतिरिक्त चॅनलच्या पॅक करिता भरलेले पैसे वाया जातात. तसेच इंटरनेटचाही आपण गरजेपेक्षा जास्त डाटा असलेला पॅक ऍक्टिव्हेट करतो, तो सुद्धा आपण तेवढा वापरत नाही, त्यामुळे त्याकरीताही आपले अतिरिक्त पैसे खर्च होतात. त्याकरिता आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्याच पॅक ची आपल्या ऑपरेटर कडून माहिती घेऊन आपल्याला योग्य असलेल्या पॅकचाच वापर करा.

 

१०) ऑनलाईन बील भरून आपल्या पैशांची व वेळेची बचत करा.

Save your money and time by paying the bill online

कोणतेही बील ऑनलाईन भरल्यामुळे त्यामध्ये आपल्याला काही डिस्काऊंट अथवा सूट मिळते. तसेच बील भरण्याकरिता इतरत्र जाण्याची गरज पडत नसल्यामुळे आपल्या पेट्रोलच्या खर्चासोबतच आपल्या वेळेचीही बचत होते.

 

११) आपल्या मोबाईल मधील शॉपिंग अॅप्स डिलीट करा.

delete the shopping apps from your mobile phone

आपल्या मोबाईलमध्ये विविध अॅप्स असल्यामुळे त्यामध्ये अनेक वस्तू वेळोवेळी विक्री करिता प्रदर्शित होत असतात. त्यामध्ये बऱ्याच वेळा स्पेशल सेल ऑफरमध्ये विशेष डिस्काऊंटही दिल्या जाते, त्या डिस्काऊंटच्या मोहापायी अनेकवेळा गरज नसतांनाही काही वस्तू घेण्याचा आपल्याला मोह होतो. त्यामुळे अशा शॉपिंग अॅप्स डिलीट केल्यामुळे आपल्या होणाऱ्या अनावश्यक खर्चाची बचत होते.

 

१२) एखादी महागाची वस्तू घेण्याअगोदर पाच ठिकाणी चौकशी करा.

compair price before buying something

एखादी महागडी वस्तू घेण्याअगोदर त्या वस्तूची पाच दुकानात चौकशी केल्यामुळे कोणत्या दुकानात त्या वस्तूची किती किंमत आहे ह्याची माहिती आपल्याला मिळते. तसेच त्या वस्तूची ऑनलाईन किंमत किती आहे? हे सुद्धा जाणून घ्या. त्यानंतर ज्या ठिकाणी ती वस्तू योग्य दरात मिळत असेल तिथूनच ती वस्तू खरेदी करा.

Swapnil Ranveer– स्वप्निल रणवीर

linpaws8@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!