आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवून, आपले ध्येय गाठण्याकरिता खालील गोष्टींचा अवलंब करा…!

Spread the love

आयुष्यात आपले ध्येय काहीतरी वेगळेच असते, परंतु ते ध्येय गाठण्याऐवजी आपण अनपेक्षितपणे दुसरीकडेच भरकटत जातो. आपल्या जीवनावर आपले नियंत्रण कधीच राहात नाही.
उदा – कुणाला एम.बी.बी.एस. करून डॉक्टर व्हायचे असते, परंतु त्याला गुणवत्ता कमी पडल्यामुळे तिथे प्रवेश घेता येत नाही. मग तो व्यक्ती बी.ए.एम.एस. किंवा बी.एच.एम.एस. ला प्रवेश घेऊन थोड्या हलक्या प्रतीचा का होईना, डॉक्टर झाल्याचे समाधान मिळवितो. अशाप्रकारे आपल्याला करायचे असते वेगळे, परंतु आपण दुसरेच काहीतरी करून बसतो. परिस्थितीवर आपण कधीच नियंत्रण ठेऊ शकत नाही. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण खालील गोष्टींचे कटाक्षाने पालन केले पाहिजे.

१) आपल्या जीवनाचे लक्ष किंवा ध्येय ठरवा.
set your goal
जिथे आपली दररोज नजर जाते त्या ठिकाणी आपल्या घरातील भिंतीवर आपले ध्येय ठळक अक्षरात लिहून ठेवा. त्यासोबतच आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर आपले ध्येय लिहून ठेवले तरीही हरकत नाही.

२) ध्येय गाठण्यासाठी कार्यसूची तयार करा.


आपल्या जे काही करायचे आहे, त्या संदर्भातील आपली एक कार्यसूची तयार करा. त्या कार्यसूची मध्ये क्रमवारपणे करावयाच्या गोष्टींची नोंद करा. ध्येय गाठण्यासाठी कोण-कोणत्या गोष्ठी, कोण-कोणत्या क्रमाने, करणे आवश्यक आहे त्याची सविस्तर माहिती नोंदवा.

३) कार्यसूचीप्रमाणे सर्वच गोष्टी करण्यासाठी वेळेचे नियोजन करा.

plan time
कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आपण कोणती गोष्ट किती वेळ करणार आहोत याचेही व्यवस्थित नियोजन करा.

४) कार्यसूचीचे कटाक्षाने पालन करा.

follow the list you made
नियोजन केलेल्या आपल्या कार्यसूचीचे कटाक्षाने नियमितपणे पालन करा. कार्य आणि वेळ चुकणार नाही याबद्दल दक्षता बाळगा.

५) आपल्या कार्याची पडताळणी करा.

check your list
दर पंधरा दिवसांनी आपण आपल्या कार्यसूचीतील कार्याचे, तसेच वेळेचे व्यवस्थित पालन करीत आहोत काय? याची पडताळणी करा. कुठे काही चूक होत असेल किंवा कुठे काही सुटत असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करा. वरील गोष्टींचे पालन नीटपणे केल्या जात नसेल तर आपण आपले ध्येय सोडून दुसरीकडेच भरकटत जात आहोत, ह्याची नोंद घ्या, आणि पुन्हा आपल्या कार्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

६) पुरेशी झोप घ्या.

 Get enough sleep
आठ ते नऊ तासांची झोप कोणत्याही व्यक्तीस पुरेशी असते. आठ तासांपेक्षा कमी झोपू नका. आठ तासांपेक्षा कमी झोपल्यास दुसऱ्या दिवशी तुमच्यामध्ये काम करण्यास पुरेसा उत्साह राहाणार नाही आणि तुमच्या कामाचे वेळापत्रकही बिघडण्याची शक्यता निर्माण होईल.

७) आपले शरीर तंदुरुस्त ठेवा.

exercise
आपण ठरविलेले काम करण्यात उत्साह राहाण्याकरिता आपले शरीर तंदुरुस्त राहाणेही अत्यंत महत्वाचे असते. त्याकरिता आपल्या वयोमानाप्रमाणे, तसेच शरीर प्रकृतीप्रमाणे व्यायामाची सवय लावून घ्या. योगासने केल्यामुळेही चांगला व्यायाम होतो. हे काहीच करणे जमत नसेल तर सकाळी-सकाळी अर्धा तास वेगात चालण्याचा व्यायाम करा. ह्यामुळेही तुमच्या शरीरास चांगलाच व्यायाम मिळवून आपले शरीर तंदुरुस्त ठेवता येईल.

८) चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा.

be with successful people
आपले ध्येय गाठण्याकरिता ज्या-ज्या लोकांची आपणास चांगली मदत होऊ शकते, त्या-त्या लोकांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत काम करा, त्यांचे मार्गदर्शन आणि मदत मिळविण्याचा प्रयत्न करा.

९) पुन्हा-पुन्हा प्रयत्न करा.

never give up
आपले ध्येय गाठण्याकरिता अडचणी येत असतील, अपयश येत असेल तर त्याकरिता जिद्दीने पुन्हा-पुन्हा प्रयत्न करा. हळू-हळू का होईना, यशाची एक एक पायरी चढत कष्टाने पुढे पुढेच पाउल ठेवण्याचा प्रयत्न करा. हार मानून त्या ठिकाणी मार्गातच कुठेतरी थांबू नका. त्या मार्गातून परतही फिरू नका किंवा यशाकडे जाण्याचा तो मार्गही कधीच सोडून देऊ नका. अपयश आले तरीही सातत्याने पुन्हा-पुन्हा प्रयत्न करीत राहिल्यास नक्कीच आपल्याला त्या क्षेत्रात यश मिळते.

१०) इतरांचीही मदत घ्या.

Get help from others too.
आपल्याला यश मिळण्याकरिता निव्वळ आपल्या प्रयत्नाचीच गरज नसते, तर त्या सोबतच इतर अनेकांच्या मदतीचीही आपल्याला अत्यंत आवश्यकता असते. इतरांच्या मदतीशिवाय आपल्याला कधीच यश मिळू शकत नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, म्हणून आपल्या यशात भागीदार असणाऱ्या लोकांचा शोध घ्या. त्यांच्यासोबत तसेच इतरांच्यासोबतही नेहमीच सौजन्याची आणि अत्यंत नम्रपणाची वर्तणूक ठेवा. आपली चांगली वर्तणूक आणि इतरांसोबत चांगले बोलणे, चांगले वागणे असेल तरच इतर लोकही आपल्याला स्वतःहोऊन चांगलीच मदत करतील. त्यांच्या मदतीमुळेच आपल्याला यश मिळविणे सोपे होईल.

११) पॉकेट डायरीचा सदैव वापर करा.

Always use Pocket Diary
आपण कोण-कोणती कामे, कोण-कोणत्या वेळी पूर्ण केलेली आहेत? तसेच कोण-कोणती कामे पूर्ण करणे बाकी आहेत ह्याची आपल्या छोट्या पॉकेट डायरीमध्ये त्या-त्या क्रमाने व्यवस्थित नोंद करून प्रत्येक दिवशी झोपण्यापूर्वी राहिलेली कामे पूर्ण करण्याची योजना तयार करा.

१२) झोपण्यापूर्वी आपल्या ध्येयासंदर्भात चिंतन करा.

think about your goal
आज आपण कोण-कोणते कार्य व्यवस्थित केलेले आहे अथवा नाही याचे चिंतन झोपण्यापूर्वी करा. आपले ध्येय गाठण्याच्या हिशोबाने आपले कार्य व्यवस्थित चालू आहे काय? याचाही विचार करून त्याप्रमाणेच दुसऱ्या दिवशी वागण्याचा कटाक्षाने विचार करा.
एवढे सर्व नियोजन केले तर तुम्ही निश्चितपणे तुमचे ध्येय गाठू शकता.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!