असा लिहा आपला बायोडेटा

Spread the love

कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही पदाकरिता, जेव्हा आपण नोकरी मिळविण्याकरिता प्रयत्न करतो, तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला प्रथमत: आपला बायोडेटा द्यावा लागतो. बायोडेटावरूनच नोकरी देणाऱ्यांना आपल्या बद्दलची आवश्यक ती माहिती कळत असते. त्यामुळे बायोडेटा कसा लिहायचा? त्यामध्ये कोण-कोणती माहिती, कशी-कशी लिहायची? तसेच ती माहिती कोणत्या क्रमाने लिहायची? त्या माहितीचे काय महत्व असते? ह्या सर्वच गोष्टी आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण चांगला बायोडेटा लिहू शकतो.

बायोडेटामध्ये काय काय लिहिणे आवश्यक आहे?

बायोडेटामध्ये आपल्याबद्दल असलेली, नोकरी मिळविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची माहिती लिहायची असते. बायोडेटा वाचणाऱ्याला आपल्याबद्दल आवश्यक ती व्यक्तिगत, शैक्षणिक आणि इतर महत्वाची सर्वच माहिती त्या बायोडेटातून कळली पाहिजे.

बायोडेटामध्ये आपण जी काही माहिती लिहिणार आहोत ती माहिती अगदी शंभर टक्के खरी आणि वस्तूनिष्ठ असावी. बायोडेटामध्ये आपण जी काही माहिती लिहिलेली असेल ती प्रमाणित करण्यासाठी आपण त्या संदर्भातील झेरॉक्स प्रती आपली सही करून, त्यावर आपला मोबाईल नंबर व तारीख टाकून त्या बायोडेटासोबत जोडणे आवश्यक असते.

A4 साईझच्या पांढऱ्या स्वच्छ कागदावर आपला बायोडेटा व्यावस्थित डीटीपी प्रिंट करून द्यावा. बायोडेटा प्रिंट करतेवेळेस कागदाच्या डाव्या बाजूला दीड ते दोन इंच अंतराचा समास सोडावा. कारण त्यामुळे बायोडेटाच्या पंच करून व्यावस्थित फाईलमध्ये ठेवता येते. तसेच त्याशिवाय त्या समासामध्ये गरज पडल्यास बायोडेटा मागविणारे अधिकारी त्यावर काही सूचना किंवा त्यांचा अभिप्रायही लिहू शकतात.

बायोडेटाच्या खाली नेहमीच आपले नाव लिहून सही करावी. त्या खाली किंवा बायोडेटाच्या सर्वात वरच्या भागात उजवीकडे तारीख टाकावी. त्या खाली आपला नवीन रंगीत पासपोर्ट फोटो चिकटवावा.

बायोडेटा देतांना बायोडेटाच्या सोबत आपण कुणाला आणि कोणत्या पदाकरिता बायोडेटा देत आहोत? त्याबद्दल एक वेगळ्या कागदावरील कव्हरींग लेटर बायोडेटाच्या वर जोडून द्यावे.

बायोडेटामध्ये आपली माहिती लिहितांना ती व्यावस्थित आवश्यक त्या क्रमानेच लिहावी. त्या माहितीचा क्रम खालील प्रमाणे असावा.

स्वतःबद्दलची माहिती.

आपले संपूर्ण नाव.

आपला संपूर्ण पत्ता व्यवस्थित लिहावा. त्यामध्ये शेवटी पिनकोड नंबरचीही नोंद असावी. तो पत्ता कायमचा आहे की केवळ तात्पुरता निवासाचा पत्ता आहे? त्याचीही नोंद असावी. पत्र व्यवहाराकरिता तुमचा जो कोणता पत्ता असेल, त्यावर तशी विशेष नोंद करावी. आपल्याला पाठविलेले पत्र त्या पत्त्यावर मिळाले पाहिजे.

संपर्कासाठी आपला मोबाईल नंबर लिहावा.

आपला ईमेल नसेल तर तयार करून घ्याबा. बायोडेटावर आपला ईमेल असणे अत्यंत आवश्यक आहे.

आपली जन्मतारीख आणि बायोडेटा सादर करतेवेळी आपले वय किती आहे? त्याचीही बायोडेटामध्ये नोंद करावी.

आपला रक्तगटही आपण माहिती करून घ्यावा. त्याचीही नोंद बायोडेटामध्ये करावी.

आपल्या आधारकार्ड नंबरची, पॅन कार्ड नंबरची तसेच इलेक्शन कार्ड नंबरचीही नोंद आपल्या बायोडेटामध्ये करावी.

 

आपली शैक्षणिक माहिती

ह्यामध्ये आपल्या दहावीच्या, बारावीच्या, तसेच त्यापुढील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासंदर्भातील नोंद करावी. हे शिक्षण आपण कोणत्या बोर्डाकडून, कोणत्या वर्षी घेतले? त्यावेळी आपल्याला कोणता क्लास मिळाला होता? त्यावेळी आपल्या गुणांची टक्केवारी किती होती? ह्या संदर्भात व्यावस्थित नोंद करावी.

वरील शालेय आणि महाविद्यालयातील पदवी शिक्षणानंतर किंवा त्या अगोदर काही लोकांनी विशेष तंत्र शिक्षण अथवा काही विषयांचे विशेष प्रशिक्षणही घेतलेले असते. कुणी डीटीपी, टायपिंग केलेले असते, तर कुणी कॉम्प्युटर संदर्भातील किंवा इतरही काही विषयांचे विशेष प्रशिक्षण घेतलेले असते, त्याचाही आपल्या बायोडेटामध्ये व्यावस्थित उल्लेख करावा.

ह्याशिवाय इतर काही विषयात म्हणजेच कला, कौशल्य अथवा खेळ इत्यादी विषयातही आपला सहभाग किंवा प्रगती असेल तर त्या संदर्भातही आपल्या बायोडेटामध्ये उल्लेख करावा.

ह्या पूर्वी आपण कुठे-कुठे, कोण-कोणत्या कामाचा काही काळ अनुभव घेतला असेल तर त्या संदर्भातही व्यावस्थित उल्लेख करावा किंवा आपल्याला काही विशेष सन्मान अथवा काही विशेष प्रशस्ती पत्रके मिळाली असतील तर त्याचाही व्यावस्थित उल्लेख करावा.

आपल्याला कोण-कोणत्या भाषा लिहिता येतात, वाचता येतात व बोलता येतात त्याचाही व्यावस्थित उल्लेख करावा.

 

कौटुंबिक माहिती

ह्या संदर्भात माहिती देतांना आपले लग्न झालेले आहे की नाही? ह्याची नोंद करावी.

 

ओळख आणि संदर्भ

ह्यामध्ये आपल्या ओळखीच्या प्रतिष्टीत अशा तीन-चार व्यक्तींची नावे आणि मोबाईल नंबर टाकावेत. ह्या व्यक्तींनी गरज पडल्यास आपल्या वर्तनुकी संदर्भात चांगला अभिप्राय देणे अपेक्षित आहे.

 

बायोडेटाच्या शेवटी

डाव्या बाजूला स्थळ लिहून त्या खाली दिनांक टाकावी. तसेच उजव्या बाजूला आपला विश्वासू असे लिहून त्या खाली सही करावी. सहीच्या खाली आपले नाव लिहावे, नावाखाली कंसामध्ये मोबाईल नंबर लिहावा.

 

इथे आम्ही बायोडेटाचा एक सर्वसाधारण इंग्रजी नमुना देत आहोत.

 

Bio-Data

 • Full Name –
 • Address –
 • Mobile Number –
 • E-mail –
 • Birth date –                  Age –
 • Blood Group –
 • Aadhar Card No –          Pan Card No –          Election Card No –
 • Education –
Sr. NoDegree / DiplomaBoard / UniversityYearClass% of Marks
1SSC
2HSC
3Degree
4Masters Degree
5Technical Degree
6Other Education
 • Previous Experience –
 • Special Qualities and Strengths –
 • Hobbies –
 • Areas of Interest –
 • Awards / Prizes / Special Achievement –
 • Command over languages –

 Can write :

 Can read :

 Can Speak :

 • Information about family –

 Marital Status :

 Married / Unmarried

 • Reference –
 • Place –
 • Date –
 • Yours faithfully –
– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!