आपला रिझ्युमे प्रभावीपणे लिहिण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Spread the love

कुठेही नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जायचे म्हंटले की त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते तुमचा ‘रिझ्युमे’. जिथे तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जात आहात तिथल्या पदासाठी तुम्ही परिपूर्ण उमेदवार असू शकता, परंतु तुमचा इंटरव्ह्यू घेणाऱ्या त्या व्यक्तीला हे माहित नसते. त्या व्यक्तीला हे इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी कळवून देण्यासाठी तुमच्याजवळ एकच संधी असते, ती म्हणजे तुमचा रिझ्युमे. तुमच्या रिझ्युमेवरून इंटरव्ह्यूवर ला तुमच्या बद्दल, तुमच्या पात्रतेबद्दल, तुमच्या स्वभावाबद्दल एक कल्पना येऊन जाते. साधारणपणे इंटरव्ह्यूवरजवळ तुमचा रिझ्युमे वाचण्यासाठी फक्त एक ते दोन मिनिटे असतात, त्यामूळे आपली माहिती आपल्या रिझ्युमेवर कमीत कमी शब्दांत प्रभावीपणे मांडायला सर्वांना आलीच पाहिजे. खाली काही टिप्स दिल्या आहेत, त्या टिप्स विचारात घेऊन जर तुम्ही रिझ्युमे लिहिला तर नक्कीच तुमचा रिझ्युमे कमीत कमीत वेळात वाचता येणारा प्रभावी रिझ्युमे बनेल.

 

१) आपले नाव व कॉन्टॅक्ट डीटेल्स सर्वात वर लिहा.

Write your name and contact details at the top

रिझ्युमेची सुरुवात ही ठळक फॉन्टमध्ये असलेल्या आपल्या नावाने करा. जो व्यक्ती तुमचा इंटरव्ह्यू घेत आहे त्याला तुमचे नाव माहिती असणे आवश्यक असते. तुमच्या नावानंतर तुमचा मोबाईल नंबर व ईमेल टाका. तुम्हाला नोकरी भेटली की नाही हे तुम्हाला कंपनी कडून ईमेल अथवा मोबाईलवरच कळविण्यात येते. कॉन्टॅक्ट डीटेल्सचा शेवट हा आपला सध्याचा जो पत्ता आहे तो लिहून करावा. काही कंपन्या नोकरीबद्दल मोबाईल/ईमेल वर कळविण्याऐवजी आपल्या पत्त्यावर अपॉइंटमेंट लेटर पाठवीतात.

 

२) रिझ्युमेवर स्टायलिश फॉन्ट अथवा डिझाईन वापरू नका.

Do not use stylized fonts or designs on resume

आपला रिझ्युमे हा इतरांच्या रिझ्युमेपेक्षा चांगला आणि उठून दिसण्यासाठी काही लोक त्यामध्ये स्टायलिश फॉन्ट आणि डिझाईनचा वापर करतात. असे केल्यास तुमच्या रिझ्युमेचा प्रोफेशनल लुक कमी होतो.

 

३) करियर समरी मधील उद्दिष्टे कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.

Try to keep the career summary in short

आपल्या कॉन्टॅक्ट डीटेल्स नंतरचा महत्वाचा भाग असतो आपली करियर समरी. या भागातल्या गोष्टी वाचून इंटरव्ह्यूवर त्यांच्या मनात तुमची इमेज बनवत असतो. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या हिशोबाने तुमच्या करियर मधील ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या ठरतील फक्त त्याच गोष्टी इथे लिहा.

 

४) आपल्याला ज्या गोष्टी येत नसतील त्या गोष्टी आपल्या रिझ्युमेमध्ये लिहू नका.

Do not write things in your resume which you cant do

कधी कधी काही लोकांना नोकरीची इतकी गरज असते, की ते त्यांची त्या पदासाठी निवड केली जावी म्हणून आपल्या रिझ्युमेमध्ये त्यांना येत नसलेल्या जास्तीच्या गोष्टी लिहून देतात. असे केल्यास तुमचा रिझ्युमे चांगला अनुभवी आणि प्रोफेशनल तर दिसेल परंतु समोरच्यांनी जर त्या गोष्टींवरून काही प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचे उत्तर  देता आले नाही तर मात्र इंटरव्ह्यूवरला तुम्ही रिझ्युमेमध्ये खोटी माहिती लिहिलेली आहे हे समजायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी येत असतील आणि तुम्ही ज्या गोष्टींमध्ये तज्ज्ञ असाल फक्त त्याच गोष्टी तुमच्या रिझ्युमेमध्ये लिहा.

 

५) वेगवेगळ्या जागेवर, वेगवेगळ्या पदासाठी रिझ्युमे पाठवितांना त्यांच्यात बदल करा.

Make changes in resume, while sending resumes for different posts

नोकरीची अत्यंत गरज असलेले लोक कधी कधी हताश होऊन जिथे जिथे नोकरीची ऑफर असेल तिथे तिथे आपला रिझ्युमे पाठवीतात. उदा – डीटीपी ऑपरेटरच्या पदासाठी बनविलेला रिझ्युमे जर तुम्ही शिक्षकाच्या पदासाठी पाठविला तर तुम्हाला ते पद निश्चितच मिळणार नाही. कारण शिक्षकाच्या पदासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी डीटीपी ऑपरेटरच्या रिझ्युमेमध्ये नसतील.

म्हणून जर तुम्हाला वेगवेगळ्या पदासाठी रिझ्युमे पाठवायचा असेल तर एकच रिझ्युमे सर्व जागी न पाठविता त्या-त्या पदाला अनुसरून ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्यानुसार प्रत्येक जागेसाठी वेगवेगळा रिझ्युमे बनवा.

 

६) सर्व नोंदी न करता विशिष्ट ठिकाणच्या नोंदी करा.

Make a list of specific places without having all the entries

काही लोक कामाचा अनुभव लिहित असतांना आत्तापर्यंत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले आहे, त्या-त्या सर्व जागेंची नोंद ते रिझ्युमेवर करतात. असे न करता फक्त काही विशिष्ट ठिकाणी काम केले असल्यास त्या ठिकाणची व तिथल्या पदांची नोंद करावी. नोंद करतांना बुलेट लिस्ट वापरून ज्या ठिकाणी, ज्या पदावर असतांना काही विशेष कामे अथवा कामगिरी केली असल्यास त्याची देखील नोंद करा.

 

७) रिझ्युमेवर आपला फोटो लावणे अथवा सही करणे टाळा.

Avoid photographing or signing on your resume

तुम्ही जर मॉडेलिंग किंवा ऍक्टिंगशी संबंधित कोणत्या जॉबसाठी अर्ज करत नसाल तर आपला फोटो आपल्या रीझ्युमेवर लावण्याचे टाळा. त्याचसोबत रिझ्युमेच्या शेवटी आपली सही देखील करू नका, वाचता वाचता इंटरव्ह्यूवरचे लक्ष आपल्या सहीकडे गेल्याने त्यांचे रिझ्युमेमधील काही महत्वाचे मुद्दे वाचायचे राहू शकतात.

 

८) रिझ्युमेचा शेवट आपल्या कौशल्य व छंदाने करा.

put your skills and hobbies at the end of your resume

 

कामाव्यतिरिक्त इतर कोण-कोणती कौशल्ये तुमच्यामध्ये आहेत हे रिझ्युमेवर नोंदविणे नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर निवड करतांना निवडक उमेदवारांची आणि तुमची शैक्षणिक पात्रता जर सारखी असली तर तुम्हाला येत असलेल्या अतिरिक्त कौशल्यामुळे तुमची निवड होण्याची शक्यता वाढते. तसेच फावल्या वेळात तुम्हाला कोणते छंद आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात ही मुद्दे रिझ्युमेवर नोंदविल्याने इंटरव्ह्यूवरला तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल कळते.

 

शेवटची टीप -: आपला रिझ्युमे लिहून अथवा टाईप करून झाल्यानंतर दोन-तीन वेळेस तपासून पाहा. स्पेलिंग  व ग्रामॅटिकल मिस्टेक्स असलेल्या रिझ्युमेमुळे तुमचे इम्प्रेशन खराब पडू शकते.

 

Swapnil Ranveer– स्वप्निल रणवीर

linpaws8@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!