शरीरासोबत आपल्या मनाचे आणि बुद्धीचेही रिचार्जिंग करा

Spread the love

जीवनात सुख, शांती आणि समाधान मिळविण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती आपआपल्या शारिरीक, बौद्धिक, आणि मानसिक क्षमतेनुसार काहीतरी व्यवसाय आणी नोकरी करीत असतो. व्यवसाय किंवा नोकरी त्याला व्यावस्थित करता यावी, त्यामध्ये त्याची प्रगती व्हावी आणि अपेक्षेप्रमाणे त्यातून समाधानकारक आर्थिक प्राप्ती व्हावी म्हणून तो त्यासंदर्भात कितीतरी प्रयत्न करतो. आपल्या कामाशी अथवा आपल्या व्यवसायाच्या संदर्भात प्रशिक्षणही घेतो. असे प्रशिक्षण घेऊन तो आपली कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न करतो. त्याची आपल्या व्यवसायाच्या अथवा आपल्या नोकरीच्या संदर्भातील कार्यक्षमता वाढली तर त्याची नोकरीतील पदोन्नती होऊ शकते. व्यवसायातील त्याची कार्यक्षमता, कुशलता, जनसंपर्क, नावलौकिक वाढला तर त्याचा व्यवसायही वाढतो, त्यातून त्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्राप्ती सुद्धा होऊ शकते.

people get tired after working too much

आयुष्यातील अत्यंत आवश्यक आणि अपरिहार्य असलेली ही सर्व धावपळ करता करता त्याच्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला थकवा येतो. असा थकवा आला की त्याच्या शरीराची, मनाची आणि त्याच्या बुद्धीची कार्यक्षमता कमी होते. त्याचे शरीर, मन आणि त्याची बुद्धी त्याच्या इच्छेप्रमाणे काम करण्यास नकार देते. ह्याचा परिणाम त्याच्या नोकरीवर किंवा व्यवसायावर होऊन त्याची आर्थिक प्राप्ती सुद्धा कमी होते. अपेक्षेप्रमाणे त्याला आपल्या जीवनात प्रगती करता येत नाही. ( जीवनात प्रगती करण्यासाठी, ह्याप्रकारे संघर्ष करा )

the way your mobile need to be charged you also need to be charged to get away from tiredness

उदा – आपला मोबाईल जेव्हा आपण एकसारखा अनेक तास वापरतो, तेव्हा त्यातील बॅटरी जास्त वेळ वापरल्या गेल्यामुळे त्या बॅटरीची कार्यक्षमता संपते आणि आपला मोबाईल बॅटरी संपल्यामुळे बंद पडतो. आपली इच्छा जरी असली तरी तो मोबाईल रिचार्जिंग केल्याशिवाय पूर्ववत चालू शकत नाही. मोबाईल पूर्ववत चालण्याकरिता आपल्याला त्या मोबाईलची बॅटरी चार्जिंग करावीच लागते. त्याकरिता काही काळ तो मोबाईल बंद ठेवून, चार्जिंग करण्याकरिता चार्जर मशीनला लावून ठेवावा लागतो. आवश्यक तेवढा काळ मोबाईलची बॅटरी चार्जिंग झाल्यानंतरच आपल्याला तो मोबाईल त्याच्या चांगल्या कार्यक्षमतेनुसार पुन्हा वापरता येईल.

मोबाईलच्या बॅटरी प्रमाणेच आपले शरीरसुद्धा असते, काही काळानंतर त्याची कार्य करण्याची क्षमता संपते. ह्याचा किती लोक आपल्या आयुष्यात विचार करीत असतील?

some people continue to work even after getting tired

बहुदा फारच कमी लोक ह्या बद्दल विचार करीत असतील. त्यामुळे अनेकांना त्यांची इच्छा असूनही आपल्या शरीराचा अत्यंत कार्यक्षमपणे वापर करता येत नाही. मोबाईलच्या बॅटरी प्रमाणेच आपले शरीरही कार्य करीत असते. अविरत कार्य केल्यामुळे मोबाईलच्या बॅटरी प्रमाणेच आपल्या शरीराची कार्यक्षमताही कमी कमी होऊन संपून जाते, तरीही आपण कार्य करणे सुरूच ठेवतो. अशाप्रकारे आपण आपल्या शरीरार एकप्रकारे अत्याचारच करीत असतो.

कदाचित अशाच काही गोष्टींच्या संदर्भात “अती तेथे माती” ही म्हण अस्तित्वात आली असावी, म्हणजेच जिथे जिथे अती होते, तिथे तिथे माती होणारच असते. आपल्या शरीराने अशा कोणत्याही बाबतीत अती केली तर त्याची लवकरच माती होण्यासही वेळ लागणार नाही. ह्या अतीमुळे आपल्या शरीराची माती होऊ नये म्हणून आपल्यालाही योग्य वेळी मोबाईलच्या बॅटरी प्रमाणेच आपले शरीरही रिचार्जिंग करून द्यावे लागेल. आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा केवळ आपले शरीरच कार्यरत नसून त्यासोबतच आपली बुद्धी आणि आपले मनसुद्धा कार्यरत असते. आपल्या कोणत्याही कार्यात आपली बुद्धी आणि आपले मन कार्यरत नसेल तर ते कार्य कधीच व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकणार नाही.

everyone should take some rest before going to work again

आपल्या नोकरीशी, व्यवसायाशी किंवा इतर कोणत्याही बाबतीत आपण जेव्हा काम करतो, तेव्हा त्या कामामुळे आपले शरीर, आपले मन आणि आपली बुद्धी थकते. शरीर, मन आणि आपली बुद्धी थकल्यामुळे आपली कार्यक्षमता कमी होते किंवा संपते, त्यामुळे आपली ही कार्यक्षमता किंवा कार्य करण्याची उर्जा परत मिळविण्यासाठी मोबाईलच्या बॅटरीला आपण ज्याप्रमाणे चार्जिंग करतो त्याच प्रमाणे काही तास आपल्या शरीरालाही विश्रांती द्यावी लागते. त्याकरिताच आपण आराम करतो तसेच शांतपणे झोपही घेतो. ही झोप घेतल्यामुळे आपल्याला पुन्हा कार्यकरण्यासाठी उर्जा प्राप्त होते. आता ह्या क्रियेमुळे आपण आपल्या शरीराला तर पुन्हा कार्यक्षम केलेलेच आहे, परंतु आपल्या मनाचे आणि आपल्या बुद्धीचे काय? कारण शरीरासोबतच आपली बुद्धी आणि आपले मनसुद्धा कायम कार्यरत असते. इथे तर आपण विश्राम करून किंवा झोप घेऊन आपल्या शरीरालाच पुन्हा कार्यक्षम केलेले असते. आपले मन आणि बुद्धी मात्र विश्राम करून अथवा झोप घेऊनही पुरेशी कार्यक्षम झालेलीच नसते. त्यामुळे आपले शरीर तर कार्य करीत राहील परंतु आपली बुद्धी आणि आपल्या मनाची व्यावस्थित रिचार्जिंग न झाल्यामुळे आपल्या कार्यातील गुणवत्ता कमी कमी होत जाईल. ( रात्री पुरेशी झोप घेतल्याने हे फायदे होतात )

these are the reasons why you can't sleep at night even after getting tired

आपली बुद्धी आणी आपले मन ह्याचीही रिचार्जिंग करण्याचे काही उपाय आहेतच ज्याचा आपण कधीच हेतू पुरस्पर विचार केलेला नसतो. ज्यावेळी आपण शरीराला विश्राम देण्यासाठी आराम करतो किंवा झोपतो त्यावेळी मनाला विश्राम किंवा आराममिळत नसतो. मन आणि आपली बुद्धी त्यावेळी सुद्धा कार्यरत राहाते. त्यावेळी आपल्या मनात वेगवेगळे विचार येत असतात, हे विचार आपल्या कामाशी, आपल्या परिवाराशी अथवा आपल्या इतर अनेक बाबींशी संबंधीत असतात. त्यावेळी आपण जरी झोपण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला झोप येत नाही. कारण त्यावेळी आपले मन आणि आपली बुद्धी जागृत असून ते इतर अनेक आवश्यक अथवा अनावश्यक अशा अनेक गोष्टींसंदर्भात विनाकारण विचार करीत असते. ( कोणत्याही समस्येबाबत विचार न करता अशाप्रकारे काम करा )

आपल्या जागृत मनाची विचार प्रक्रिया जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत आपण कितीही झोपण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला झोप येत नाही. ज्या क्षणी ही विचार प्रक्रिया बंद होईल त्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला गाढ झोप लागेल. त्यानंतरच आपल्या मनाला आणि बुद्धीला काही प्रमाणात विश्राम मिळून आपले मन आणि आपली बुद्धी ताजेतवानी होईल. आपल्या मनाला तसेच आपल्या बुद्धीला दररोजच रिचार्जिंग किंवा उत्साहित करण्याची आवश्यकता असते. ह्याकरीताच अनेक लोक टी.व्ही वरील मनोरंजक कार्यक्रम पाहातात, गाणी ऐकतात, आपल्याला आवडणारी चांगली पुस्तके वाचतात, आपल्याला आवडतील असे खेळ खेळतात, सहलीला जातात, पेंटिंग, शिल्पकला, हस्तकला, कविता, लेखन, बागकाम अशाप्रकारच्या कोणत्याही एखाद्या चांगल्या छंदामध्ये स्वतःला गुंतवून घेतात. ( प्रेरणा, स्फूर्ती तसेच कार्य करण्याची शक्ती अशाप्रकारे मिळवा )

some people use mobile in break to kill the tiredness

आजकाल ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन अनेक लोक मोबाईलचाही सहारा घेतात. मोबाईलवरील फेसबुक, व्हाट्सअप, विविध गेम, विविध व्हीडीओज, विविध चित्रपट किंवा विविध मनोरंजक कार्यक्रम पाहणे ह्याद्वारेही आजकाल अनेक लोक स्वतःच्या मनाला आणि बुद्धीला ताजेतवाने करण्याचा प्रयत्न करतात.

कोणत्याही मार्गाने का होईना, शारिरीक श्रम केल्यानंतर शरिराला विश्राम मिळणे आणि त्यासोबतच आपल्या मनाला आणि बुद्धीलाही विश्राम मिळून त्यांचीही कार्यक्षमता टिकून राहाण्यासाठी अशा मनोरंजनात्मक उपक्रमाची आपल्याला अत्यंत आवश्यकता असते. ह्या मनोरंजनात्मक उपक्रमांचाही आपल्या मनावर तसेच शरीरावर खोलवर परिणाम होऊ शकतो. चांगल्या प्रतिचे छंद जोपासणे किंवा मनोरंजक कार्यक्रम पाहाणे हे मनाला उत्साहित करून नवीन उर्जा देण्याचे कार्य करीत असते, जीवनात आनंद निर्माण करीत असते. त्याचप्रमाणे ह्यातील वाईट छंद किंवा मनोरंजनात्मक वाईट कार्यक्रम आपल्या जीवनाला वाईट मार्गाकडे किंवा अनितीकडे चालण्यासही प्रवृत्त करीत असतात. ह्यातूनच आपल्याला अनीतीने वागण्याचे, वाईट व्यसनाला बळी पडण्याचे, तासेक कुमार्गाला लागण्याचे प्रशिक्षणही मिळत असते. म्हणून अशा बाबतीत काय योग्य आहे? आणि काय अयोग्य आहे? ह्याचाही विचार करून आपण त्याप्रमाणे वागले पाहिजे. मनोरंजनात्मक वाईट कार्यक्रम किंवा अनितीकडे वाटचाल करणारे किंवा वाईट व्यसनात गुरफटून टाकणाऱ्या सर्वच बाबींपासून आपण कटाक्षाने दूर राहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

चांगल्या मनोरंजनात्मक किंवा चांगल्या उपक्रमातून आपल्या शरीराची, मनाची तसेच बुद्धीची कार्यक्षमता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण प्रगती पथावर वाटचाल करू लागतो.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

2 thoughts on “शरीरासोबत आपल्या मनाचे आणि बुद्धीचेही रिचार्जिंग करा

 • June 6, 2019 at 12:04 am
  Permalink

  There are some attention-grabbing deadlines in this article however I don抰 know if I see all of them heart to heart. There is some validity however I’ll take hold opinion until I look into it further. Good article , thanks and we wish extra! Added to FeedBurner as effectively

  Reply
 • June 10, 2019 at 9:35 am
  Permalink

  This website is really a stroll-via for the entire information you wanted about this and didn抰 know who to ask. Glimpse right here, and also you抣l definitely discover it.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: