हे मृत्यू, तुला सलाम

Spread the love

ज्याप्रमाणे आपले जगणे हे इतरांकरिता अत्यंत आनंददायक व्हावे, असे आपल्याला वाटते, तसाच आपला मृत्यूही इतरांकरिता अत्यंत आनंददायकच होणे आवश्यक आहे. ज्यांनी जन्म घेतला आहे त्यांचा एक दिवस कधी ना कधी तरी मृत्यूही निश्चितपणे होणारच असतो. एखाद्या परिवारात एखाद्या लहान बाळाने जन्म घेतला की, त्याच्या सर्वच नातेवाईकांना अतिशय आनंद होतो. कारण त्या बाळाला पुढे त्या परिवारामध्ये अनेक वर्षे जीवन जगायचे असते. पुढे चालून त्या परिवारातील सदस्यांच्या उपयोगी पडायचे असते, त्यांच्या बाबतीत असलेले आपले कर्तव्य पार पाडायचे असते.

death of some people do not affect people if the person was very old aged

 

 ह्या उलट एखाद्या वय झालेल्या, मृत्युपथाच्या वाटेला लागलेल्या जर्जर वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या सर्वच नातेवाईकांना अत्यंत आनंद होत असतो. कारण त्याच्या मृत्यूने परिवारातील इतर लोकांची त्याच्या त्रासातून सुटका झालेली असते. वृद्धपणामुळे आपले शरीर निकामी होऊन हातपाय थकल्यामुळे त्या वृध्द व्यक्तीला जीवन जगण्यात कोणता आनंद मिळणार असतो? त्यापेक्षा तर आपला मृत्यू होऊन स्वतः त्रासातून मुक्त होण्यासोबतच तो वृध्द व्यक्ती दुसऱ्यांचीही आपल्या त्रासातून मुक्तता करीत असतो. अशा प्रकारे इतरांना अधिक त्रास न देता, योग्य वेळी मृत्यूला समोर जाणे म्हणजेच त्याच्या नातेवाईकांना त्या व्यक्तीने दिलेली एक महत्वपूर्ण अशी भेटच असते.

people get sad when a well working person expires

 ज्या व्यक्तीचे मृत्यूचे वय झालेले नाही, जो आपले सर्वच कार्य स्वतःच्या सामर्थ्यावर अगदी व्यवस्थित करीत असतो, ज्याच्या कार्यामुळे अनेक लोकांना मदत किंवा सहकार्यही होत असते, अशा कार्यतत्पर आणि इतरांच्या अनेक प्रकारे उपयोगी पडणाऱ्या व्यक्तीचा जर अवेळीच मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्याच नाही तर, ज्या-ज्या अनेक लोकांशी तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्यातरी कार्याने संबंधित होता, त्या सर्वच लोकांना अत्यंत दु:ख होत असते.

everyone wants to enjoy the life before the death comes to say them hello

 माणसाने जन्म घेतला की त्याला वाटते आपले जीवन कायम आनंदात जावे, आपल्या शरिरामार्फतच तर आपण आपल्या जीवनातील सर्व आनंदाचा उपभोग घेत असतो. आपले शरीर हेच आपल्याला आनंद मिळवून देण्याचे एकमेव माध्यम आहे. चांगले अन्न खाणे, चांगले वस्त्र वापरणे, शक्य तितक्या चांगल्या घरामध्ये निवास करणे, प्रवासाकरिता चांगले वाहन वापरणे, मनोरंजनाकरिता विविध साधनांचा वापर करणे, आपल्या शरिराच्या ज्या-ज्या काही आवश्यक अशा गरजा असतील, त्या त्या सर्वच गरजांची पूर्तता करून, जीवनातील विविध प्रकारच्या आनंदाचा उपभोग घेणे, ह्याकरिता धडपड करण्यातच आपले सर्व आयुष्य जात असते.

 शेवटी प्रत्येक गोष्टींचीही एक मर्यादा असतेच. प्रत्येक गोष्टीला एक अंत निश्चितपणे असतोच. तसेच आपल्या जीवनालाही शेवटी कधी ना कधी तरी अंत असतोच. आपल्याला जीवन जगण्याचा आणि त्याद्वारे जीवनातील सुख उपभोगण्याचा एवढा मोह असतो की, मृत्यू येऊन आपले जीवन कधीच संपू नये, असेच आपणास सदैव वाटत असते. परंतु ही गोष्ट कशी काय शक्य आहे? ह्याचा आपण कधीच विचार करीत नाही.

every person has a expiry date

 जशी कोणत्याही औषधीला ‘एक्सपायरी डेट’ असते, तशीच निसर्गातील कोणत्याही गोष्टीला कधी ना कधी तरी ‘एक्सपायरी डेट’ असतेच. त्याचप्रमाणे आपल्या शरिरालासुद्धा ‘एक्सपायरी डेट’ असते. त्या ‘एक्सपायरी डेट’ नुसारच आपले शरीर त्या-त्या काळापर्यंत सहजपणे कार्य करीत असते. ती ‘एक्सपायरी डेट’ आली की, आपले शरिरही आपोआपच ‘एक्सपायर’ होत असते. म्हणजेच आपल्या शरीराचाही शेवटी ठरलेल्या वेळी अंत होतच असतो.

 ‘जीवन आणि मृत्यू’ ही निसर्गाने ठरविलेली अप्रतिम अशी मौलिक रचना आहे. ज्या-ज्या गोष्टींचा अथवा व्यक्तींचा जन्म झालेला आहे, त्या-त्या गोष्टींचा शेवटी मृत्यूही निश्चितपणे होतच असतो. अशाप्रकारे मग तो कुणीही का असेना, मृत्यू कुणालाही कधीच सोडत नसतो. आपली कितीही धनसंपत्ती असुद्या, ती प्रचंड धनसंपत्तीसुद्धा आपल्याला मृत्युपासून कधीच वाचवू शकत नाही.

imagine what would have happened if there was no death for anyone

 एखाद्या व्यक्तीचा केवळ जन्मच झाला असता आणि त्या व्यक्तीचा कधीच मृत्यू झालाच नसता, तर मात्र फारच अवघड परिस्थिती निर्माण झाली असती. कल्पना करा की, आपल्या घरामध्ये एक हॉल, एक किंवा दोन बेडरूम आणि एक किचन आहे. अशा परिस्थितीत मृत्यूची जर निसर्गाने योजनाच केली नसती, तर आपले जेवढे काही पूर्वज आहेत ते सर्वच आपल्या अत्यंत जर्जर अशा वृद्धावस्थेत, आपल्या ह्या घरामध्ये जिथे-तिथे खोकलत बसलेले आपल्याला दिसले असते. त्यांच्या अत्यंत जर्जर अशा वृद्धावस्थेमुळे त्यांना उठणे, बसणे, चालणे, फिरणेही जमत नसल्यामुळे त्यांनी आपले सर्वच नैसर्गिक विधी एकाच ठिकाणी बसल्या जागीच केले असते. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या घरामध्ये सर्वत्र घाण केली असती. त्या घरातील अशा घाणीत थांबायलाही आपली कधीच इच्छा झाली नसती.

 शिवाय ह्या आपल्या पूर्वजांची आतापर्यंतची एवढी मोठी प्रचंड संख्या झाली असती की, एक हॉल, एक किचन आणि आपल्या दोन बेडरूमच्या घरामध्येच काय तर आपल्या घराच्या अंगणात, एवढेच काय तर आपल्या घराच्या गच्चीवरही त्यांना जागा पुरली नसती. शिवाय आपण आता एका परिवारात जरी पाच-सहा सदस्य असलो तरीही एकमेकांशी आपण कशी भांडाभांडी करतो, क्वचित प्रसंगी थोडीफार मारामारीही करतो, मग एवढे प्रचंड सदस्य एकाच घरातील असतील तर तिथे किती प्रचंड भांडाभांडी आणि मारामारी होत राहील, ह्याची आपण कल्पना करू शकतो.

 त्याशिवाय एवढ्या सगळ्या आपल्या प्रिय असलेल्या पूर्वजांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा आणि इतर आवश्यक त्या सर्व सुख-सुविधा आपण कशा-काय पुरवू शकलो असतो? आपल्याला तेवढा पगार किंवा आर्थिक उत्पन्न तरी आहे काय? एवढ्या सगळ्या व्यक्तींकरिता आपली जी काही तारांबळ होत आहे, ते सर्व पाहून आपण लगेच आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असता, परंतु त्यावेळी मृत्यूवरसुद्धा बंदी असल्यामूळे अथवा कधीच, कुणाचाही कोणत्याही कारणास्तव मृत्यू होण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे, आपल्याला जीव देणे सुद्धा कधीच शक्य झाले नसते. अशा परिस्थितीत आपल्या त्या सर्व प्रिय पूर्वजांसोबत आपल्याला जबरदस्तीने त्यांच्या ‘वृद्धलीला’ पाहात जगणे भाग पडले असते. एवढ्या सगळ्या वृद्धांच्या घोळक्यात राहून तुम्हाला तुमच्या जीवनातील खरा आनंद कधीच उपभोगता आला नसता.

 परंतु त्या निसर्गाच्या जीवन-मृत्युच्या कालचक्राचेच धन्यवाद! ज्याने मृत्यूची ही योजना करून आपल्याला ह्या सर्व भयंकर अशा संकटातून पूर्णपणे मुक्त केलेले आहे. असे करून निसर्गानेच आपल्याला आपल्या जीवनातील सर्व सुख-सोयी उपभोगण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने म्हंटले पाहिजे की, “हे मृत्यू, तुला सलाम…!”

some old people wants to live even after they get very close to death

 मी समाजात अनेकवेळा अनेक वृद्धांना पहिले आहे. त्यांना जीवनाचा फारच मोह असतो. वृद्धपणामुळे त्यांचे शरिरही अगदी जर्जर झालेले असते. त्यात अनेक आजारांनीही ते अत्यंत त्रस्त झालेले असतात. त्यांना उठता-बसता येत नाही, एवढेच काय तर त्यांना त्यांचे नैसर्गिक विधीसुद्धा स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतः पार पडता येत नाहीत.  तरीही त्यांना आपल्या जीवनाचा अथवा जीवंत राहाण्याचा मोह अजिबात सुटत नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यांना मरण्याची अजिबात इच्छाच नसते. दातांची कवळी घातलेल्या तोंडाने ते त्यांच्या नातेवाईकांना म्हणतात की, “मला दवाखान्यात घेऊन चला, मला असा-असा त्रास होत आहे. मला जेवणच जाईना, वगैरे वगैरे…!”

 अशावेळी त्यांना दवाखान्यात नेणे, तसेच आपली फारशी आर्थिक ऐपत नसतांनाही त्यांच्यावर विविध प्रकारचे महागडे उपचार करणे, त्यानुसार त्यांना औषधी पुरवणे, ही त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी दिलेली एक फार मोठी अशी शिक्षाच असते. एवढ्या महागाईच्या काळात आपल्या औषधोपचारावर आपल्या नातेवाईकांना आपण एवढा मोठा खर्च करायला सांगतो. आपल्या नातेवाईकांची मनापासून इच्छा नसतांनाही त्यांना आपल्या सेवेसाठी आपण विविधप्रकारे राबवून घेतो, असे करून आपण आपल्या नातेवाईकांकडून कोणत्या जन्मातील कर्ज वसूल करून घेत असतो? असे करून आपण त्यांच्यासोबत कोणत्या जन्माचा बदला घेत आहोत? याचा आपण आता शेवटच्या क्षणी तरी विचार केला पाहिजे.

 आपल्या वृद्धावस्थेच्या जर्जर अशा अवस्थेत आपल्या नातेवाईकांमार्फत, आपल्या सर्व नैसर्गिक विधी आपल्याला पार पडून घ्याव्या लागत असतात. अशा अत्यंत परावलंबी जीवन जगण्याचा, आपल्याला त्यावेळी खरोखरच काही आनंद वाटत असतो काय?

 आपण आपल्या तरुणपणामध्ये आपल्या कुणा आईवडिलांची, आजोबा-आजींची अथवा इतर कोणा वृध्द नातेवाईकांची ह्याप्रकारे कधी सेवा केलेली आहे काय? जर आपल्यावर तशी त्यांची सेवा करण्याची वेळ आली असती, तर आपण काय केले असते? ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपण जर अशी कुणाचीही कधी सेवा केली नसेल, तर मग इतरांनी आपली तशी सेवा करावी? अशी अपेक्षा तरी आपण इतरांकडून का करून घ्यावी? ह्याचाही आपण विचार केला पाहिजे.

some very old people gives headache to the family members

 आपल्या परिवारातील व्यक्तींची आपल्याबद्दल प्रेमाची अथवा आपुलकीची भावना असते, म्हणून ते आपली एवढी सेवा करतीलही, तरी सुद्धा त्यांच्याकडून तशी सेवा करवून घ्यायला आपल्याला काहीतरी लाज वाटायलाच पाहिजे.  काम,क्रोध,लोभ, मोह, मत्सर हे मानवाचे फार मोठे दुर्गुण आहेत. ह्या दुर्गुणाच्या भोवतीच मानवाचे सर्व जीवनचक्र चालत असते. ह्या चार-पाच गुणांपैकी दरवेळी कधी तरी कोणता तरी एक दुर्गुण प्रभावी ठरत असतो, आणि त्या गुणाच्या प्रभावाने तो मनुष्य त्या-त्या वेळी त्या-त्या गुणांच्या प्रभावाखाली येऊन, त्या-त्या प्रमाणे आपले  वर्तन किंवा कार्य करीत असतो. परावलंबी असा जर्जर वृद्धपणा, त्यामुळे प्राप्त झालेली असहाय्यता, आणि विविध गंभीर आजार त्या व्यक्तीला असतात, तरीही तो कामाच्या आहारी जातो, तेव्हा त्याला वाटते की, आपली पत्नी आपली सेवा करायला कायम आपल्या जवळच असली पाहिजेत.

 त्यावेळी तो व्यक्ती इतका परावलंबी झालेला असतो की, त्याच्या नैसर्गिक विधीकरिताही त्याला इतरांची मदत घ्यावी लागते. त्याच्या युरीनचा पॉट किंवा त्याचा लॅटरीन पॉटही त्याला त्याच्या खाली लावून घ्यावा लागतो. ह्या युरीन पॉटचा अथवा लॅटरीन पॉटचा किती घाणेरडा वास त्यावेळी येत असतो, तरीही त्याची पत्नी त्याची आपुलकीने तशाही अवस्थेत त्याची सेवा करीतच असते.

 ह्या अशा व्यक्तीला मात्र तिच्या त्या सेवेबद्दल कधीही, आपुलकी वाटत नसते, उलट त्याला तो आपला हक्क आहे, असेच वाटत असते. त्याच्या मनामध्ये त्याच्या पत्नीच्या ह्या सेवेबद्दल कोणतीही धन्यवादाची अथवा कृतज्ञेची भावना कधीच नसते. हे त्या व्यक्तीच्या बोलण्यातूनही लगेच जाणवते. जेव्हा तो व्यक्ती क्रोध ह्या दुर्गुणाच्या आहारी जातो, तेव्हा तो लगेच आपल्या पत्नीला त्याची एवढी सेवा करूनही, तिला तो वेळोवेळी शिव्या द्यायला लागतो. तिच्यावर रागवायला लागतो. ‘तू माझी व्यवस्थित सेवा करीत नाहीस’, असे म्हणून तो  तिला दुषणे देऊन कधी-कधी मार-हाणही करायला लागतो.

some very old aged people start behaving very rudely as they becomes more old

 जेव्हा तो मोह ह्या दुर्गुणाच्या आहारी जातो, तेव्हा मग त्या अवस्थेत त्याला काहीतरी चटक-मटक पदार्थ खाण्याची इच्छा होते. मग तो पत्नीला म्हणतो की, “मला हे पदार्थ करून खाऊ घाल, मला ते पदार्थ करून खाऊ घाल, वगैरे वगैरे…!” जर्जर वृद्धपणा आणि अपचनाचा त्रास असल्यामुळे त्याला फारसे काही खाता येत नसूनही, त्या व्यक्तीला असे चटक-मटक पदार्थ खाण्याचा मोह कधीच सुटत नसतो. शिवाय त्याला विविध गोष्टींचा अथवा वस्तूंचाही मोह होतो. मग तो म्हणतो, “अग, मला ही वस्तू पाहिजे, मला ती वस्तू पाहिजे, वगैरे वगैरे…!”. वास्तविक पाहाता आता कोणत्याही वस्तू वापरण्यासारखी त्या व्यक्तीच्या शरिराची अवस्थाही नसते. तरीही तो विविध वस्तूंची सतत मागणी करीतच असतो.

 मग तो जेव्हा लोभ ह्या दुर्गुणाच्या प्रभावाखाली असतो, तेव्हा त्याला आपल्या जीवनाबद्दल अथवा आपल्या जगण्याबद्दल लोभ निर्माण होतो. ह्या लोभाच्या प्रभावात असल्यानंतर, आपला कधीही मृत्यू होऊच नये, असे त्याला सतत वाटत राहाते.  जेव्हा तो मत्सर ह्या दुर्गुणाच्या प्रभावाखाली असतो, तेव्हा त्याला चांगले जीवन जगणाऱ्या आपल्या जवळच्या इतर काही नातेवाईकांबद्दल मत्सर वाटायला लागतो. त्यातूनच तो सतत कुणाला ना कुणाला तरी दुषणे देत असतो, कुणालातरी वाईट म्हणत असतो.

some very old people gets very weak when the death is near them

 वृद्धावस्था तसेच आजारपणामुळे आपली एवढी जर्जर अवस्था झालेली आहे. इतरांच्या मदतीशिवाय आपल्याला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, सर्व नैसर्गिक विधीसुद्धा इतरांच्या मदतीशिवाय आपल्याला अजिबात करता येत नाहीत, तरीही त्या व्यक्तीला अजूनही आपल्याला मृत्यू यावा, असे कधीच वाटत नाही. आपण कायम जिवंत राहावे आणि जीवनातील सर्वच आनंदाचा अनुभव तसेच उपभोग घ्यावा, असेच त्याला सतत वाटत असते. स्वतःच्या सामर्थ्यावर बसण्याची, उठण्याची, चालण्याची तसेच जगण्याची आपली अवस्था नसतांनाही, जगण्याची इच्छा त्याने अजूनही का करावी? हेच त्याला कळत नाही.

 वृध्द झालेल्या व्यक्तीने जगू नये, असे आमचे अजिबात म्हणणे नाही. त्याने अगदी आनंदात जगावे, कुणाच्याही मदतीशिवाय जो पर्यंत तो बसू शकतो, उठू शकतो, चालू शकतो, कुणाच्याही मदतीशिवाय तो स्वतःचे नैसर्गिक विधी स्वतःच पार पाडू शकतो, त्याला युरीन पॉट तसेच लॅटरीन पॉटची सुद्धा गरज पडत नाही, तो पर्यंतच त्याने जगायला काहीच हरकत नाही. परंतु जेव्हा तो स्वतः उठू शकत नाही, बसू शकत नाही, चालू शकत नाही, तसेच स्वतःच्या नैसर्गिक विधी करण्यासही तो युरीन पॉट, लॅटरीन पॉटचा वापर करून इतरांची मदतही घेऊ लागतो, तेव्हा आता मात्र आपला मृत्यू अत्यंत जवळ आलेला आहे, असे समजून त्याने मृत्यूशी प्रेमाने हात मिळवून, आनंदाने मृत्युच्या स्वाधीन झालेच पाहिजे.

every person who born has to die

 वास्तविक पाहाता योग्य वेळी आपल्याला योग्य प्रकारे मृत्यू यावा, हे मानवाकरिता शाप नसून फार मोठे वरदानच आहे. प्रत्येक गोष्टीला अंत असतोच, तसाच आपल्या जीवनालाही अंत आहेच. मृत्यू द्वारेच आपल्या जीवनाचा अंत होत असतो.  कोणत्याही कारणामुळे, आपले शरीर त्याच्या नैसर्गिक स्वरुपात कार्य करण्यास जेव्हा असमर्थ ठरत असते, तेव्हाच निसर्गाच्या रचणेप्रमाणे, नैसर्गिकपणेच आपला मृत्यू होऊन, आपल्या शरीराचाही अंत होत असतो.

 प्रत्येक सजीवाकरिता निसर्गानेच ही मृत्यूची व्यवस्था अथवा योजना आखलेली असते. अशा लोकांचा मृत्यू घडवून निसर्ग मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीची स्वतःच्या अपरिमित अशा दु:खातून तर सुटका करतोच, परंतु त्यासोबतच तो त्या व्यक्तीच्या परिवाराचीसुद्धा त्या व्यक्तीच्या वार्धक्यातील आजारपणाचा त्रास, व त्याच्यावर होणाऱ्या खर्चाच्या कचाट्यातूनही सुटका करीत असतो. अशाप्रकारे वृद्धापकाळाने जर्जर झालेल्या व्यक्तीचा मृत्यू, हा त्या व्यक्तीच्या परिवारातील लोकांकरिता एक फार मोठा आनंददायक असा उत्सव सोहळाच असतो. ह्याची कदाचित त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीला अजिबात कल्पनाही नसते.

 ज्या व्यक्तीचे व्यवस्थित हातपाय चालू आहेत, ज्याचे कार्य व्यवस्थित चालू आहे, जो आपल्या परिवारातील व्यक्तीशिवाय इतरांच्याही विविधप्रकारे कामात येतो, इतरांनाही तो सहकार्य अथवा मदत करू शकतो, अशा व्यक्तीचा जर वेळेपूर्वी मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचा मृत्यू हा सर्वांकरिताच अनपेक्षित, धक्कादायक आणि अत्यंत दु:खदायक असतो. अशा सर्वांना उपयोगी पडणाऱ्या व्यक्तीच्याच मृत्यू बाबत सर्वांनाच अत्यंत दु:ख होत असते.

 इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या अथवा इतरांच्या कोणत्याही कामात न येणाऱ्या, निरुपयोगी व्यक्तीला मृत्यूसुद्धा सहजा-सहजी येत नाही. अशा व्यक्तीने त्याला स्वतःला जर आपल्या परिवारातील इतर व्यक्तींबद्दल खरोखरच प्रेम वाटत असेल तर मात्र त्याने जैन धर्मीयांमध्ये ज्याप्रमाणे, ‘संथारा व्रत’ धारण करून, स्वइच्छेने अन्न-पाण्याचा त्याग करून, ज्याप्रमाणे मृत्यूची प्रतीक्षा करीत, मृत्युच्या कुशीत आनंदाने जातात, त्याप्रमाणेच त्या जर्जर झालेल्या वृध्द व्यक्तीनेही मग तो कोणत्याही का जाती-धर्माचा असेना, त्याने ‘संथारा व्रत’ धारण करून अत्यंत आनंदाने मृत्यूला प्राप्त करून घ्यावे.

 कोणत्याही मनुष्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ह्या दुर्गुणांचा प्रभाव असतोच. ह्या सर्व गुणांचा अगदी कटाक्षाने त्याग करून, जीवनाबद्दलची आपली आसक्ती अथवा मोह पूर्णपणे सोडून दिल्यासच त्या वृध्द व्यक्तीला मृत्युच्या मार्गाकडे वाटचाल करणे सोपे होईल. इतरांना त्रासदायक ठरणाऱ्या वृध्दपणाने आणि आजाराने जर्जर झालेल्या प्रत्येक व्यक्तीनेच, अन्न-पाण्याचा त्याग करून, ‘संथारा व्रता’चे पालन करीत मृत्युच्या मार्गाकडे लगेच प्रयाण करण्याची हिम्मत स्वतःमध्ये आणणे आवश्यक आहे.

 असे काही करता आले, तरच आपला मृत्यू परिवारातील इतरांकरिता, अत्यंत आनंददायक होईल. असे काही झाले तरच आपल्या परिवारातील लोक आपल्या त्या मृत्यूला म्हणतील की, “हे मृत्यू, तुला सलाम…..!”

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

One thought on “हे मृत्यू, तुला सलाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!