मोठे झाल्यावरही आपली मुलं-मुली अजूनही परावलंबीय आहेत काय?

Spread the love

आपल्या लहान मुलांना वाढवितांना आपण नको तेवढे त्यांच्यावर लक्ष देतो. जेव्हा आपण त्याला बालपणी बालवाडीत टाकतो, तेव्हा त्याची तयारी करून दिल्यानंतर आपण त्याचे शाळेचे दप्तर आपल्या एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने आपण त्याचा हात धरून त्याला बालवाडीत सोडून येतो. तेथेही तो शांतपणे बसत नाही, रडून रडून गोंधळ घालतो. तरीही शेवटी शिक्षकांच्या जवळ त्याला सोपवून त्या बाळाची आई घरी येते, नंतर पुढच्या वर्गात जाईपर्यंतही जवळपास हीच परिस्थिती असते. मुलं-मुली पाचवी-सातवीच्या वर्गात गेल्यानंतरही त्यांची आईच त्यांच्या शाळेची सर्व तयारी करून देऊन त्यांना शाळेत सोडून येते.

make your child habit to pack his school bag

वास्तविक पाहाता चवथी नंतर मुलाला स्वतः तयार होऊन, शाळेत जाण्याची सवय लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यावेळेस मुलगा जवळपास दहा वर्षाचा झालेला असतो आणि एवढ्या वयाच्या मुलांनी किंवा मुलींनी स्वतः आपल्या शाळेची तयारी करून त्यांनी स्वतः शाळेत जाण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे. ( मुलांवर चांगले संस्कार करण्याकरिता पालकांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे )

stop giving mobile to your child

आजकाल ह्या वयातील मुल आळशीपणाच्या सवयीमुळे स्वतः काहीही काम करण्याची तयारी ठेवीत नाहीत. शाळेतून घरी आल्यानंतर शाळेचे दप्तर एका कोपऱ्यात फेकल्यानंतर त्यांच्या आईने त्यांचे जेवण त्यांच्या समोर ठेवले की, ते जेवतांनाही टीव्ही सुरु करून टीव्ही पाहात बसतात. टीव्ही न पाहाता मुलांना जेवणाची इछाच राहात नाही, टी.व्ही. नसेल तर मग त्यांच्या हातात जेवतांना मोबाईल तरी पाहिजेच असतो. अशा सवयी अनेक मुलांना किंवा मुलींना असतात. त्यांच्या ह्या सवयीवर नियंत्र आणण्याकरिता पालकही जाणीवपूर्वक काहीच प्रयत्न करीत नाहीत. ( पालकांनी मुलांच्या बालपणी ह्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे )

tell your child to help you in small work

जस जसे आपली मुल-मुली मोठे होत जातात, तस तसे त्यांना घरातील लहान मोठी किरकोळ कामे सांगायलाच पाहिजेत. ह्यामुळे त्यांना थोडे फार काम करण्याचीही सवय लागेल. अशाप्रकारे मुलांना काम करण्याची सवय लागणे हेच फार महत्वाचे असते. तरीही ज्या मुलांना अथवा मुलींना अशा प्रकारच्या कामाच्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला जात नाही, ती सर्व मुल मुली आपल्या भावी जीवनात अत्यंत आळशी झाल्याचेच दिसून येतात. त्यांच्या कोणत्याही कामाकरिता ते आपल्या आईची मदत घेतांना दिसतात. वास्तविक पाहाता ह्या वयातील मुला-मुलींना कुणाचीही मदत न घेता आपआपली कामे करता आली पाहिजेत.

take your child for shopping and teach them shopping lessons

मुलगी जेव्हा दहाव्या वर्गात जाते तेव्हा तिच्या आईने तिला घरकामाची शिकवण देऊन स्वयंपाकासह इतरही घरातील अनेक कामे स्वतः करण्याची तिला प्रेरणा दिली पाहिजे, तसेच ह्या वयातील मुलाला सुद्धा स्वतः बाजारात जाऊन भाजी-पाला आणणे, दळण आणणे, वीज बील भरणे तसेच इतरही काही वस्तू खरेदी करणे ह्या सारखी अनेक कामे मुलाला करण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. अशी कामे केल्यामुळे त्या त्या मुलांचा किंवा मुलींचा आत्मविश्वास वाढीस लागून, व्यवहार ज्ञान मिळून त्यांना स्वयंप्रेरणेने कामे करण्याची सवय लागते.

दहावीनंतर मुली कॉलेजमध्ये जातात, तेव्हा त्यातील अनेक मुली आपल्या आळशीपणामुळे घरातील कामे करीतच नाहीत. स्वयंपाक तसेच घरातील इतरही काही काम त्यांनी न केल्यामुळे त्यांना कोणत्याही कामाची सवय राहात नाही. हे त्यांच्या भावी जीवनाकरिता फारच अडचणीचे ठरू शकते.

teach your child how to cook

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अनेक मुली आपल्या अभ्यासातच दंग राहून घरकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असतात. ह्या वयातील मुलींना तिच्या आईने स्वयंपाक करण्याचे विशेष प्रशिक्षण तिला आपल्या स्वतःच्या मार्गदर्शनाखाली दिलेच पाहिजे. जेव्हा तिचे लग्न होईल, तेव्हा तिच्या सासरच्या एका मोठ्या परिवाराची ती सदस्य होईल. अशावेळी त्या परिवारात गेल्यानंतर तिला जेव्हा स्वयंपाक तसेच त्या घरातील इतरही अनेक कामे करण्याची वेळ येते, तेव्हा त्या कामांची तिला अजिबात सवय नसल्यामुळे ती कामे तिला व्यवस्थित जमतच नाहीत. अशावेळी सासरच्या मंडळींची बोलणी खाऊन तिला अपमानित होण्याची वेळ येते.

आपल्या मुलीने तिच्या सासरी गेल्यानंतर तिला घर काम आणि स्वयंपाक जमत नसल्यामुळे तिला त्या ठिकाणी काय काय अडचणी येतील? ह्याचा विचार करून त्या मुलींना त्यांच्या लग्ना अगोदरच त्यांच्या आईने चांगलीच समाज देऊन अशा प्रकरच्या सर्वच कामाचे प्रशिक्षण तिला सक्तीने दिलेच पाहिजे.

मुलांच्या बाबतीतही अशीच गंभीर परिस्थिती असते. बालवाडीत असलेल्या एखाद्या मुलाला सर्व गोष्टी आपल्या आईच्या मदतीने करवून घेण्याची सवय असते. त्याचप्रमाणे तो पाचवी-सातवीच्या इयत्तेत गेल्यानंतरही त्याची ही, स्वतःची कामे इतरांकडून करवून घेण्याची वाईट सवय गेलेली नसते.

don't make your child be lazy

पुढे चालून तो जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडतो, तेव्हा तो एखाद्या नोकरीला किंवा व्यवसायाला सुरुवात करतो. तेव्हाही त्याला आपल्या स्वतःची कामे स्वतःहा करण्याची सवय लागलेली नसते. बालवाडीत किंवा प्राथमिक शाळेत शिकत असतांना तो मुलगा ज्याप्रमाणे आपल्या आईच्या मदतीने आपली सर्व कामे करवून घेत असे, तसेच तो आताही आपल्या आईच्या किंवा घरातील इतर कुणाच्यातरी मदतीने आपली स्वतःची कामे करवून घेतो. ही एक अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असते. आपल्या मुलांनी तसेच मुलींनी त्यांच्या भावी जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने त्यांची स्वतःची कोणतीही कामे स्वतःहा करावीत, म्हणून त्यांच्या पालकांनी त्यांना सुरुवातीपासूनच त्या कामाची सवय लावणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्या मुलींचे अथवा मुलांचे अतिरिक्त फाजील लाड करण्याच्या नादात आपण त्यांना त्यांची स्वतःची कामे करू देत नसाल, तर त्यांच्याकरिता पुढे चालून ही परावलंबीत्वाची सवय फारच अडचणीची ठरत असते. ह्यामुळे त्यांचा मानसिक विकास होत नाही. त्यामुळे असे वागणाऱ्या पालकांनी लगेच सावध होऊन आपल्या मुला-मुलींना स्वतःची कामे स्वतःच करू द्यावीत. आपली स्वतःची कामे स्वतःच कशी करावीत? हे त्यांना कटाक्षाने सांगा अथवा शिकवा.

ही कामे जर त्यांनी ह्यापूर्वीच योग्य वेळी शिकून घेतली असती आणि स्वतः केली असती, तर त्यांना आता परावलंबी होण्याची आवश्यकताच राहिली नसती. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील फार मोठा दोष आहे. आपली स्वतःची कामे आपण स्वतः केल्यामुळेच आपला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होऊन आपले व्यक्तिमत्वही सुधारते.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

One thought on “मोठे झाल्यावरही आपली मुलं-मुली अजूनही परावलंबीय आहेत काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!