आपल्या जीवनातील स्वच्छतेचे आणि व्यवस्थितपणाचे महत्व

Spread the love

आपण ज्या ठिकाणी कार्य करतो तेच आपण ज्या ठिकाणी राहातो, त्या ठिकाणी आपल्या ज्या काही वस्तू ठेवलेल्या असतील त्या सर्व वस्तू टापटीप आणि व्यावस्थित ठेवलेल्या असाव्यात. आपल्या प्रत्येक कामामध्ये स्वच्छता, टापटीप आणि शिस्त दिसून यावी. आपल्या कामाच्या जागी अथवा ज्या ठिकाणी आपण राहातो त्या जागी स्वच्छता, टापटीप आणि शिस्त नसेल तर त्याचा परिणाम आपल्या कामावरही दिसून येतो.

try to stop creating mess on your working table

काही काही लोकांना आपल्या कामाच्या जागी असलेली अस्तव्यस्त ठेवलेले इतर साहित्य व्यावस्थित आणि स्वच्छ ठेवायला कंटाळा येतो. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे उत्साहाने काम करण्याची इच्छा होत नाही. ह्या स्वच्छतेचा परिणाम त्यांच्या मनावर तर होतोच परंतु त्यांच्या कामावरही होत असतो. शिवाय त्यांच्या व्यक्तीमत्वात असलेल्या ह्या दुर्गुणामुळे इतर लोकांनाही त्यांच्या कार्यातील हा हलगर्जीपणा दिसून येतो. त्यामुळे ह्याचा त्यांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम होत असतो.

people who keep tidiness are always work with full enthusiasm

ज्याला स्वच्छतेची आणि टापटीपीची सवय लागेलेली असते तो व्यक्ती आपले कोणतेही काम अत्यंत व्यावस्थित आणि टापटीपीनेच करीत असतो. आपल्या कोणत्याही कामात होणारा अव्यवस्थितपणा अथवा गैरशिस्त त्याला अजिबात आवडत नसते. एखादे काम त्या व्यक्तीने आपल्या हातात घेतले तर ते काम अत्यंत व्यावस्थित कसे होईल? ह्याकरिता तो व्यक्ती पूर्णपणे प्रयत्न करतो. ह्यामुळे त्या व्यक्तीच्या व्यवसायातही वाढ होत असते. आपल्या ह्या स्वभावामुळे असा व्यक्ती इतरांनाही आवडत असतो.

ज्या व्यक्तीला अस्वच्छतेबद्दल घृणा आणी स्वच्छतेबद्दल प्रेम असते, त्या व्यक्तीच्या कामाच्या ठिकाणी तसेच त्याच्या निवासस्थानीसुद्धा स्वच्छता आणि टापटीप दिसून येते. त्या व्यक्तीच्या ह्या सवयीमुळे त्याच्या घरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि टापटीप अशीच ठेवलेली असते. मग ते त्याच्या घरातील फर्निचर असो, भांडे असो, त्याचे वस्त्र असो किंवा इतर कोणतेही साहित्य असो. अशा व्यक्ती आपल्या ह्या स्वच्छतेच्या टापटीपीच्या आणि व्यावस्थितपणाच्या सवयीमुळे इतरांमध्येही विशेष व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात.

well organized people become successful in life

आपली दैनंदिन कामे तर प्रत्येकाला करावीच लागतात परंतु स्वच्छता व टापटीपीची सवय असलेल्या लोकांनी केलेली कामे इतर लोकांच्या तुलनेत निश्चितपणे गुणवत्तापूर्ण झालेली असतात. एवढेच नाही तर इतर लोकांपेक्षा ह्या लोकांची जीवनात विशेष प्रगती झाल्याचेही आपणास दिसून येत असते.

ज्या ज्या लोकांनी आपल्या जीवनात विशेष प्रगती केल्याचे आपणास दिसून येते, त्या त्या लोकांकडे आपण पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते की, त्यांच्या कार्य करण्याच्या जागी तसेच त्यांच्या निवासस्थानीसुद्धा अत्यंत स्वच्छता, टापटीप आणि सुव्यवस्था असल्याचे दिसून येते. स्वच्छता आणि टापटीपीची त्यांची ही सवय त्यांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक कार्य अत्यंत व्यवस्थितपणे करण्यासाठी प्रेरित करीत असते. केवळ आपल्या त्याच सवयीमुळे त्यांची जीवनात प्रगती झालेली असते. जीवनात प्रगती करू इच्छिणाऱ्यांनी स्वच्छता, टापटीप आणि आपल्या प्रत्येक कार्यातील व्यवस्थितपणा ह्याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!