सद्गुणांची रुजुवात केल्यामुळेच, आपली प्रगती होईल

Spread the love

जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने “रोटी, कपडा और मकान” ह्या तीन गोष्टींची आवश्यकता असते असे म्हणतात. ह्या तीन गोष्टी मिळविण्यासाठी धन संपत्ती अथवा पैशांची आवश्यकता असते, पैसा मिळविण्यासाठी आपण विविध प्रकारच्या नोकऱ्या मिळविण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्या व्यवसायाद्वारे अथवा नोकरीद्वारे आपण पैसा मिळवितो.

केवळ आपल्या शिक्षणाद्वारे आपल्या नोकरीतील पडद्वारे किंवा व्यवसायातील कार्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेली प्रगती होईलच, असे म्हणता येणार नाही. प्रगती होण्यासाठी ह्या गोष्टींशिवाय आपल्यात नितीमत्ता, इमानदारी आणि सद्गुण असेही अत्यंत आवश्यक असते.

people who earn lot of money in wrong way are not real successful

नितीमत्ता, इमानदारी अथवा सद्गुण नसलेले लोक भ्रष्टाचार, वाईट कर्म, चोऱ्या करून किंवा गैर कायदेशीर रीतीने अपेक्षेपेक्षा कितीतरी आदिक धनसंपत्ती अथवा पैसा जमा करतील, ह्यामुळे त्यांनी आपल्या जीवनात फार मोठी प्रगती केली आहे, असे आपल्याला कधीच म्हणता येणार नाही. एवढा पैसा गोळा करूनही त्यांना सुख, समृद्धी आणि शांतीचा लाभ कधीच होत नाही. गैरकायदेशीर रीतीने संपत्ती गोळा करीत असतांना ते कधीही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. त्यांना तुरुंगवासही होऊ शकतो. ह्यामुळे त्यांचा समाजातील नाव लौकिकही खराब होऊ शकतो. एवढे सगळे होत असेल तर त्यांनी आपल्या जीवनात भरपूर प्रगती केली आहे, असे आपल्याला कसे काय म्हणता येईल?

प्रगती म्हणजे भरपूर पैसा असे नसून प्रगती म्हणजे जीवनातील सुख आणि शांती. मागे एका पुढाऱ्याने भ्रष्टाचार करून प्रचंड संपत्ती जमविली परंतु नंतर त्याला चार-सहा वर्षे जेलमध्ये राहावे लागले. त्याला पैसा मिळाला परंतु सुख-शांती मिळाली नाही. चांगले शिक्षण, चांगला व्यवसाय किंवा नोकरी त्यासोबतच आपल्यामध्ये काही सद्गुणांसोबतच नितीमत्ता व इमानदारीसुद्धा असणे आवश्यक आहे, असे असेल तरच आपण आपल्या जीवनात प्रगती करण्याची शक्यता असते.

कोणताही व्यवसाय सुरु करण्याअगोदर त्या व्यवसायाचे आपल्याला चांगलेच प्रशिक्षण घ्यावे लागते. एखाद्या विषयाची माहिती मिळवायची झाल्यास आपल्याला त्या विषयाचा चांगलाच अभ्यास करावा लागतो. तेव्हाच तो विषय आपल्याला चांगल्या प्रकारे अवगत होतो. त्याचप्रमाणे नितीमत्ता, इमानदारी अथवा चांगले संस्कार आपल्यात रुजविण्यासाठीही आपल्याला आपल्या मनाची पूर्ण तयारी करून त्याकरिता आपल्याला पूर्णपणे प्रयत्न करावे लागतात. हे चांगले सद्गुण आपल्यात अगदी सहजपणे येऊन कधीही आपल्यात आपोआप रुजणार नाहीत.

कोणतीही एखादी कला किंवा कौशल्य शिकण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात.

उदा – चित्रकला, शिल्पकला किंवा अभिनय कला शिकण्यासाठी आपल्याला मनाची तयारी ठेवून, व्यक्तिगत प्रयत्न करण्यासोबतच त्या त्या कलेत निष्णांत असलेल्या एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सानिध्यात राहून त्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन त्याचे अनुकरणही करावे लागते. अशाप्रकारे आपण हळू हळू त्या कलेत पारंगत होऊ लागतो.

you need guidance To create virtue in your mind

त्याचप्रमाणे कोणतेही सद्गुण आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची तयारी ठेवून, त्याबाबतीत कुणाचे तरी मार्गदर्शन घेऊन हे सद्गुण असलेल्या कुणा व्यक्तीचे आपल्याला अनुकरणही करावे लागेल. मग हा व्यक्ती आपल्या कुटुंबातील किंवा कुटुंबाच्या बाहेरीलही असू शकतो.

स्वामी विवेकानंदाची जडण घडण होण्यासाठी स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा संपर्क आणि संस्कार कारणीभूत ठरले होते. त्यांच्या चांगल्या संस्कारांने स्वामी विवेकानंदामध्ये दैवी गुणांची रुजुवात झालेली होती. तर महाभारतातील दुष्ट प्रव्रुतीच्य शकुणी मामांच्या संपर्कात आणि त्यांच्या मार्गदर्शनात वाढलेल्या दुर्योधनामध्ये सर्वच प्रकारच्या कुसंस्कारांची रुजुवात झालेली होती.

सांगायचे तात्पर्य असे की, आपल्या परिवारातील सदस्यांमध्ये चांगल्या गुणांची आणि नीतिमत्तेची रुजुवात करण्यासाठी त्या परिवारातील जेष्ठ सदस्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असते. परंतु त्या अगोदर त्यांच्यामध्ये सुद्धा या सद्गुणांची अथवा नीतिमत्तेची रुजुवात झालेली असावी.

young people ignore implementing virtue because of their ego

लहान वयातील मुलांना ज्याप्रमाणे वडीलधारे व्यक्ती मार्गदर्शन करतील त्याप्रमाणेच ते वागतात, परंतु जस जसे त्यांचे वय मोठे होते तस तसे आता आपल्याला सर्व काही कळत आहे, असे त्यांना वाटायला लागते. अशावेळी त्यांना काही सांगणे अथवा काही मार्गदर्शन करणे अत्यंत कठीण असते. कारण त्यावेळी ‘मला सर्व काही कळते’ अशी गर्वाची भावना त्यांच्या मनामध्ये रुजलेली असते. त्यामुळे ते त्यांच्या स्वभावातील काही दुर्गुणांकडे मुद्दाम दुर्लक्षही करू लागतात. इतरांनी त्यांना ह्या बाबतीत काही मार्गदर्शन करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न केला तर, त्यांच्यातील अहंपणाच्या भावनेमुळे तो त्यांना आपला अपमान वाटत असतो. त्यामुळे इतरांनी सांगितलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टी ऐकण्याच्या मनस्थितीत ते नसतात.

त्यांना हे कधीच समजत नसते की, आपली प्रगती होण्याकरिता इतरांसोबतचा आपला अत्यंत चांगला नीतिमत्तेने अथवा इमानदारीने केलेला व्यवहार, आपला चांगला स्वभाव, प्रत्येक कामातील आपले अनुशासन अथवा शिस्त, आपली बुद्धिमत्ता आणि कार्य तत्परता, तसेच कार्यातील कुशलता ह्यासारख्या काही गुणांमुळेच आपली जीवनात प्रगती होऊ शकते.

जीवन जगतांना इतरांशी बोलतांना, इतरांशी वागतांना, दैनंदिन कार्य करतांना, आपण सतत आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण कोणकोणत्या बाबतीत काय काय चुका केलेल्या आहेत? आपल्याला कशामुळे कुठे कुठे अपयश आलेले आहे? हे आपल्याला ह्या आत्मपरीक्षणामुळे समजून येईल. त्यानंतरच आपल्याला आपण केलेल्या पूर्वीच्या चुका दुरुस्त करण्याची प्रेरणा मिळेल. त्यानंतर ह्या चुका लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल.

त्यासोबतच जे जे चांगले सद्गुण अथवा चांगल्या गोष्टी आपल्यात नाहीत, त्या सद्गुणांची आपल्यात प्रयत्नपूर्वक रुजुवात करावी लागेल. ह्या सद्गुणांमध्ये आपल्याला दिवसेंदिवस वाढ करता आली पाहिजे, असे काही झाले तर आपले व्यक्तिमत्व निश्चितपणे अत्यंत प्रभावी होईल. आपली कार्यपद्धती सुधारेल आणि त्यामुळे आपल्या प्रगतीचे दार निश्चितपणे उघडे होईल, त्यानंतर आपली प्रगती ओंयास फारसा वेळ लागणार नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!