योग्य वेळी लोकांचा निरोप घेणे, आनंददायक असते

Spread the love

समाजात आपला अनेक लोकांशी काहीतरी कामानिमित्त संबंध येतो. आपल्याला त्या लोकांची भेट घ्यावी लागते. आपल्या कामासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी लागते. अशावेळी आपण ज्या लोकांना भेटणार आहोत, त्या लोकांच्या भेटीचे पूर्व नियोजन आपण केले पाहिजे. पूर्व नियोजन न करता तसेच त्या लोकांना आपल्या भेटीची पूर्वसूचना न देता, आपण तांना भेटण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यावेळेस ते त्यांच्या इतर कामामध्ये गुंतलेले असतील तर ते आपल्याला भेटण्यासाठी तसेच आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकणार नाहीत, तसेच त्यावेळी ते आपले काय म्हणने आहे? हे शांतपणे ऐकूण घेण्याच्या मनस्थितीमध्ये सुद्धा नसतील. त्यामुळे त्यांच्यासोबत झालेली आपली भेट आणि आपले बोलणे सुद्धा व्यर्थ जाण्याची शक्यता असते.

make a list of points you want to ask the person

आपण आपल्या कामासंदर्भात ज्यांना भेटणार आहोत, त्यांना आपण केव्हा भेटणार आहोत? तसेच त्यांच्याशी आपण त्या भेटीत काय बोलणार आहोत? अथवा कशा कशा संदर्भात आपण त्यांच्याशी काय काय चर्चा करणार आहोत? ह्या संदर्भातील थोडक्यात नोंदी आपण आपल्या पॉकेट डायरीमध्ये केल्या पाहिजेत. आपण ज्या क्रमाने आपले मुद्दे मांडणार आहोत, त्याच क्रमाने त्या मुद्यांची आपण व्यावस्थित नोंद केली पाहिजे. संबंधित व्यक्तीसोबत बोलतांना आपल्या पॉकेट डायरीमध्ये ओअहून आपण चर्चा करीत असलेल्या मुद्यांची मांडणी आपण नोंदविलेल्या क्रमाने होत आहे की नाही? ह्याची खात्री केली पाहिजे. आपण नोंदविलेला एखादा मुद्दा चुकून सुटला असेल तर त्या मुद्द्यासंदर्भातही आपण चर्चा केली पाहिजे.

आपल्या सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर आपल्या कामासंदर्भात संबंधित व्यक्तीचा जो काही अभिप्राय अथवा निर्णय झाला असेल त्यानंतर त्या अभिप्रायावर अथवा निर्णयावर आपले मत नोंदवून त्या व्यक्ती सोबतची आपली चर्चा तसेच आपली भेट संपवून लगेच आपण त्या व्यक्तीचा निरोप घेतला पाहिजे.

say good bye on the right moment

कुण्या व्यक्तीशी, कोणत्या कामासंदर्भात काय बोलावे? आणि कुण्या व्यक्तीचा त्या कामासंदर्भात किती वेळ घ्यावा? ह्याचा आपण नेहमीच विचार केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीशी आपले बोलणे झाल्यानंतर त्याच्याकडे त्यापेक्षा जास्त वेळ थांबून आपण आपला तसेच त्या व्यक्तीचाही अतिरिक्त वेळ वाया घालवू नये. कारण त्या व्यक्तीला आपल्या कामाशिवाय इतरही काही कामे असू शकतात, किंवा त्याला इतरही काही लोकांच्या भेटी घ्यायच्या असतील, त्यामुळे, “तुम्ही आता निघा”, असे त्या व्यक्तीने आपल्याला म्हणण्या अगोदरच आपण त्या व्यक्तीचा निरोप घेतला पाहिजे. ( इतरांशी बोलतांना, लक्षात ठेवा ह्या गोष्टी )

say good bye on right moment after going to someone else's house

आपण जेव्हा एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जातो, तेव्हा जर आपण त्यांच्या प्रिय नातेवाईक असलो तर त्यांना निश्चितपणे थोडा आनंद होईल, ते आपले यथोचित स्वागत करतील. आपल्याला काय हवे काय नको, हे सुद्धा आपुलकीने विचारतील, परंतु हे काही काळच, कारण पाहुण्यांच्या पाहुणचार फक्त दोन दिवसांपर्यंतच घेणे ठीक असते. दोन दिवसानंतर मात्र आपल्या त्या नातेवाईकाला आपली अडगळ वाटू लागते. पहिल्या दोन दिवसात त्याने आपल्या आगमनाबद्दल जो आनंद दर्शविला होता, तो त्याचा आनंद दोन दिवसानंतर राहात नाही. त्याच्या वागण्यातला रुक्षपणा आपल्याला हळूहळू जाणवू लागतो, म्हणून आपण लगेच त्याचा निरूप घेऊन त्याच्या घरून निघून जावे.

आता आपण कोणत्या रेल्वेने परत जाणार आहात? अथवा आता आपल्याला परतीसाठी कोणती बस किंवा रेल्वे आहे? असे त्या पाहुण्यावर आपल्याला विचारण्याची वेळ येऊ देऊ नये. प्रत्येक बाबतीत आपण इतरांशी बोलतांना, कसे बोलायचे? काय बोलायचे? आणि किती बोलायचे? ह्याचे नेहमीच भान ठेवले पाहिजे. तसेच कोणत्या कामानिमित्त आपण किती वेळ त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिले पाहिजे, ह्याचेही आपण भान ठेवले नाही तर लोक आपल्याला निश्चितपणे कंटाळतील आणि “तुम्ही निघा आता!”, असेही म्हणू लागतील. ( कुणाच्या घरी पाहुणे म्हणून जातांना, लक्षात ठेवा ह्या गोष्टी )

ही वेळ आपल्यावर येण्याअगोदरच आपण नेहमीच इतरांचा निरोप घेणे, आपल्यालाच नाहीतर त्यांनाही आनंददायक असते.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!