अपयशातून स्वतःला सावरण्याचे उपाय

Spread the love

“अपयश ही यशाची पहिली पायरी आहे”, ही म्हण प्रत्येकाने कुठे ना कुठे ऐकली किंवा वाचली असेल. पण लोकांना ही पायरी न चढता डायरेक्ट यश पाहिजे असते. प्रत्येकाला, प्रत्येकवेळी यश मिळणे हे शक्य नसते. प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी अपयश हे येत असते, मग तो शाळेतील मुलगा असो, कॉलेजमधील तरुण असो, कुठे नोकरी अथवा व्यवसाय करणारी व्यक्ती असो किंवा एखादा वृध्द व्यक्ती असो. प्रत्येकाला त्यांच्या जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अपयशासमोर जावे लागते. यशाचा आनंद घेणे हे प्रत्येकाला जमते, मात्र अपयश पचविणे हे प्रत्येकाला काही जमत नाही. अपयश आल्या नंतर त्याचा प्रभाव काही लोकांवर काही काळाकरिता राहातो तर काही लोक ते अपयश जास्त काळाकरिता मनाला लावून घेतात. अपयश आल्यानंतर तुम्हाला ते लवकरात लवकर पचवून पुन्हा तुमच्या मार्गाकडे वाटचाल करता आली पाहिजे. अपयशाचा प्रभाव जास्त काळ राहिला तर तो तुम्हाला नकारात्मकतेकडे खेचत जाईल.

खाली काही टिप्स दिल्या आहेत, ज्या तुम्हाला अपयशातुन  सावरण्याकरिता  करतील.

 

१) अपयशाचा स्वीकार करा.

Accept the failure

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीत खूप मेहनत करून देखील अपयश येते, तेव्हा आपण खूप दुखावल्या जातो. कधी-कधी हे अपयश आपल्या मनाला इतके लागते की त्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो. त्यानंतरचे कोणते काम आपण व्यावस्थित करू शकेल की नाही? ही शंका आपल्याला सतत येत असते.

अपयशापासून आपले लक्ष विचलित करण्यासाठी लोक त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. अपयशाकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला काही वेळासाठी तर बरे वाटेल परंतु नको त्या क्षणाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून परत तो विचार तुमच्या मनात येईल. म्हणून अपयशाकडे दुर्लक्ष न करता त्याचा स्वीकार करा, असे केल्यास निश्चितपणे तुम्हाला वाईट वाटेल परंतु त्याचा प्रभाव तुमच्यावर जास्तवेळ राहाणार नाही.

 

२) एका अडथळ्यामुळे निराश होऊन थांबू नका.

Do not stop because of one obstacle

काही लोकांना अपयशाची सवय नसते, त्यांच्या आयुष्यात त्यांना या पहिले कोणत्याच गोष्टीत अपयश आलेले नसते. अशा लोकांना जेव्हा कोणत्या गोष्टीत पहिल्यांदा अपयश येते, तेव्हा त्या अपयशाचा परिणाम त्यांच्यावर साधारण लोकांच्या तुलनेत थोडा जास्त होतो. या अपयशानंतर पुढचे कोणते काम ते व्यवस्थितपणे करू शकतील का नाही? हा विचार सतत त्यांच्या मनात येत राहातो. कोणते काम त्यांच्याकडे आल्या नंतर त्या कामात ते पाहिलेसारखे लक्ष घालत नाही किंवा त्या कामाला टाळण्याचा अथवा लांबवण्याचा प्रयत्न करतात. असे न करता, आलेले अडथळे दूर करून, निराश न होता आपले काम सुरु ठेवा.

 

३) झालेल्या गलतीपासून शिका.

learn from your mistakes

तुमच्याकडून कळत न कळत जी काही चूक झाली असेल तिला सतत दोष देत बसण्यापेक्षा ही चूक कशामुळे झाली असेल? ह्याचा विचार करा. भविष्यात तुमच्याकडून अशा प्रकारच्या चुका न होण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? याचे नियोजन तयार करा.

 

४) अपयशाला तुमच्या मनातून बाहेर काढून टाका.

discuss your problem with your close ones

जो पर्यंत तुमच्या अपयशाचा विचार तुमच्या मनातून बाहेर निघणार नाही, तोपर्यंत पुढच्या कोणत्याच कामामध्ये तुमचे मन लागणार नाही. तुम्हाला कोणताही विचार जर तुमच्या मनातून बाहेर काढायचा असेल तर त्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे कुणासोबत तरी त्याबाबत चर्चा करा. तुमच्या अपयशाबद्दल तुमच्या परिवारातील कोणत्या जवळच्या नातेवाईकाशी, जवळच्या मित्राशी अथवा आई-वडील, भाऊ-बहिण सोबत याबाबत चर्चा करा. चर्चा केल्याने तुम्हाला त्यावर काही उपाय भेटेल की नाही हे तर सांगता येणार नाही, पण तुमचे मन मोकळे होऊन तुम्हाला चांगले वाटेल.

 

५) प्रेरणेचा शोध घ्या.

Search for inspiration

प्रेरणा तुम्हाला यशाकडे नेऊ शकते तसेच अपयशाच्या प्रभावातून बाहेरही आणू शकते. कुणाला कोणत्या गोष्टीपासून प्रेरणा मिळेल काही सांगता येत नाही. कुणाला एखादी मुव्ही पाहून प्रेरणा मिळते, कुणाला एखादे गाणे ऐकल्यावर, कुणाला पुस्तक वाचल्यावर तर कुणाला एखाद्या व्यक्तीमुळे. तुम्हाला ज्या गोष्टीपासून प्रेरणा मिळू शकेल ती गोष्ट शोधा. प्रेरणा भेटल्याने तुमच्यामध्ये उत्साह निर्माण होईल, तुमचा हरवलेला आत्मविश्वास तुम्हाला परत मिळेल.

 

७) स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून परत एकदा नव्या जोशाने कामाला लागा.

start your work again with full confidence

तुम्ही तुमच्या अपयशाचा स्वीकार केला, झालेल्या चुकांचे नीट निरीक्षण केले, अपयशाचा विचार मनातून काढून टाकला आणि पुन्हा एकदा कामाला सुरुवात करण्याची प्रेरणा मिळविली. या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये निश्चितपणे बदल जाणवेल. आता शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला हे अपयश विसरून तुमचे काम उत्साहाने सुरु करायचे आहे. सध्याच्या चालू परिस्थितीचे भान ठेवून या अपयशाच्या काळात जी अपूर्ण कामे करायची राहिली असतील ती पूर्ण करा. तसेच आपल्याला आलेली किंवा नवीन येणारी कामे टाळण्याऐवजी आत्मविश्वासाने स्वीकारा.

 

Swapnil Ranveer– स्वप्निल रणवीर

linpaws8@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!