खरे बोलून दिलेला शब्द पाळा, विश्वसनिय बना

Spread the love

दररोजच आपला अनेक लोकांशी काहीतरी कामानिमित्त संबंध येतो. काही वेळेस आपण लोकांची कामे करतो, तर काही वेळेस लोकही आपली कामे करतात. आपण लोकांची जी काही कामे करणार असतो, त्या कामाकरिता आपण लोकांना शब्द देतो, तो शब्द आपण निश्चितपणे पाळलाच पाहिजे. आपण लोकांना त्यांच्या कामाकरिता जी काही वेळ दिलेली असते, ती वेळ सुद्धा पाळण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. लोकांना दिलेली वेळ, तसेच लोकांना दिलेला शब्द आपल्याला पाळता आला नाही, अथवा ती वेळ आणिआपण दिलेला शब्द आपण काहीतरी कारण सांगून टाळला तर आपण त्या लोकांच्या नजरेत खोटे बोलणारे ठरत असतो. आपला शब्द खोटा ठरला तर त्या लोकांच्या नजरेतील आपली विश्वसनियता नष्ट होत असते.  ( अशाप्रकारे विश्वासपात्र बना )

always try to speak the truth

कोणताही परिस्थितीत आपण इतरांना दिलेला शब्द खोटा ठरू देऊ नये, म्हणून आपण विशेष दक्षता घेतली पाहिजे. त्याकरिता आपण नेहमीच खरे बोलले पाहिजे, काहीतरी खोटे बोलून अथवा काहीतरी कारणे सांगून आपण एखाद्या व्यक्तीचे काम करणे टाळले तर कदाचित तो व्यक्ती आपल्यावर नाराज होईल. त्यावेळी तो आपल्याशी काहीच बोलणार नाही, कारण असे काही बोलणे योग्य नसते. परंतु तो व्यक्ती नाराज झाल्यामुळे त्याच्या मनातील दुःख तो जवळच्या अनेक लोकांकडे व्यक्त करेल. त्यामुळे कदाचित त्या व्यक्तीला थोडे समाधान होईल, परंतु त्यामुळे आपण कसे खोटे बोलतो, दिलेल्या शब्दाचे पालन करायचे कसे टाळतो, ह्याची चर्चा तो व्यक्ती इतर अनेकांकडेही करण्याची शक्यता असते. ( खोटे बोलण्याचे, असे असतात दुष्परिणाम )

आपला जो काही व्यवसाय आहे, त्या आपल्या व्यवसायावरही निश्चितपणे आपल्या खोटे बोलण्यामुळे फरक पडणार असतो. लोक आपल्यावर विश्वास ठेवीत नाहीत, लोकांच्या नजरेमध्ये आपण एक खोटे बोलणारे, एक अविश्वसनिय व्यक्ती म्हणून आपली ओळख होत असते.

always speak true and do your work on time

त्याकरिता आपण केवळ लोकांच्याच नाही तर आपल्या स्वतःच्याही नजरेत कायम विश्वासपात्र बनण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. इतरांप्रती आपली वचनबद्धता असणे, ही एक फार मोठी गोष्ट असते. जेव्हा आपण इतरांना सांगतो की, “मी तुमचे काम ह्या ह्या वेळी करतो”. तर ते काम आपण नक्कीच त्यावेळी केलेच पाहिजे. ( इतरांच्या नजरेत अशाप्रकारे विश्वासपात्र बना )

दिलेल्या वेळी आपण एखाद्याचे काम मुद्दामच न करणे, अथवा ते काम तेवढ्या गंभीरपणे करण्याचे मनावर न घेणे, ह्याचा अर्थ त्या कामाप्रती आणि त्या व्याक्तीप्रती आपल्या मनामध्ये असलेली तिव्र नकारात्मक भावना हीच प्रामुख्याने कारणीभूत ठरत असते. आपल्या मनातील त्या नकारात्मक भावनेमुळेच आपण ते काम करण्याचे मुद्दामच टाळत असतो, आणि ते काम न झाल्याबद्दल आपण संबंधित व्यक्तीला न पटण्यासारखी काहीतरी करणे सांगत असतो.

आपल्याला ज्या ज्या लोकांची काही कामे करायची असतील, त्या त्या लोकांना आपण अगोदरच विचार करून वेळ आणि शब्द देणे, त्यानंतर त्या व्यक्तीच्या कामाप्रती आपल्या मनामध्ये नेहमीच सकारात्मक भावना ठेवा, त्यामुळे त्या व्यक्तीची कामे, मुद्दाम टाळण्याची आपल्याला अजिबात इच्छा होणार नाही, असे झाले तर आपल्याला समाजात कोणीही खोटे बोलणारा व्यक्ती अथवा अविश्वासू व्यक्ती असे म्हनणार नाही.

use the pocket diary to organize your work

इतरांच्या नजरेत लबाड न ठरता विश्वासपात्र बनण्यासाठी आपण नेहमीच एका छोट्या पॉकेट डायरीचा वापर केला पाहिजे, त्या पॉकेट डायरीमध्ये आपण आपल्याला दररोज कोण-कोणती कामे करायची आहेत, ह्याची तारीखवार, वेळेसह नोंद केली पाहिजे.

कुणाकुणाला आपण काय काय आश्वासने दिलेली आहेत, कुणाकुणाची कोणकोणती कामे आपण केव्हा केव्हा करायची आहेत, तसेच आपलीही कोणकोणती कामे आपल्याला कोणकोणत्या दिवशी आणि कोणकोणत्या वेळी करायची आहेत, ह्याची आपण व्यावस्थित नोंद करून ठेवली पाहिजेत. आपल्याला करावयाच्या सर्व कामाची आणि वेळेची यादी आपण आपल्या डायरीत लिहून ठेवल्यामुळे ती कामे आपण कधीही विसरण्याची शक्यता नसते. डायरीचे दिवसातून तीन-चार वेळा अवलोकन करून त्यामध्ये नोंदविलेली कामे दक्षतापूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

अशाप्रकारे इतरांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जेव्हा आपण आपली किंवा इतरांची कामे योग्य वेळी पूर्ण करू त्यावेळेस इतरांच्या नजरेत आपण एक विश्वसनिय व्यक्ती म्हणून ओळखल्या जाऊ. एक लबाड, खोटे बोलणारी, खोटी आश्वासने देणारी व्यक्ती अशी आपली समाजामध्ये ओळख असण्यापेक्षा एक खरे बोलणारी, दिलेल्या शब्दाचे पालन करणारी, एक विश्वसनिय व्यक्ती म्हणून आपली ओळख असणे आपल्याकरिता निश्चितपणे गौरवास्पद आहे.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

2 thoughts on “खरे बोलून दिलेला शब्द पाळा, विश्वसनिय बना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!