बंद कपाटातील फोटोंना, जन्मठेपेची शिक्षा

Spread the love

जोपर्यंत आपले आई-वडील ह्यात असतात तो पर्यंत आपण स्वतःला नेहमी लहानच समजत असतो. आपले वय झालेले आहे, आता आपण मोठे झालोत, असे आपल्याला त्यावेळी कधीही वाटत नसते. आपण कितीही मोठे झालो, वयस्कर झालो, तरीही आपण आपल्या आई-वडिलांसमोर नेहमी लहानच असतो. निदान त्यांना तरी तसे अगदी नेहमीच वाटत असते.

आपला जन्म झाल्यानंतर त्यांनी अत्यंत दक्षतेने आपले पालन, पोषण, शिक्षण आणि संवर्धन केलेले असते. केवळ त्यांच्यामुळेच आज आपले ह्या जगामध्ये अस्तित्व आहे. त्यांनी आपल्याला जे काही शिक्षण दिले, त्यांनी आपल्यावर जे काही संस्कार केले, त्यांच्या त्या शिक्षणातून आणि संस्कारातूनच आपल्या आजच्या आयुष्याला आकार आलेला आहे.

parents taking their kids to kindergarten

ते लहानपणी जेव्हा आपल्याला बालवाडीत टाकतात, तेव्हा घरापासून दूर असलेल्या त्या बालवाडीत एकटे जाऊन बसायला आपल्याला अगदी नकोसे वाटते. तरीही ते आपल्याला हाताला धरून ओढत नेतात. त्या बालवाडीत बसायची आपल्याला इच्छा होत नाही, तेव्हा आपण रडून रडून गोंधळ घालतो. तरीही ते आपल्याला जबरदस्तीने तिथे बसवून घरी जातात. महिना-पंधरा दिवस हा कार्यक्रम चालतो, मग आपल्यालाही लक्षात येते की इथे बसल्याशिवाय आता गत्यंतर नाही, रडून रडून कितीही गोंधळ घातला तरीही ह्यातून काही आपली सुटका होणार नाही. तेव्हा मग आपण काहीही गोंधळ न घालता बालवाडीत जाऊन बसतो. तिथे आपले मन रमविण्याचा प्रयत्न करतो. दररोज बालवाडीचा वर्ग सुटला की वर्गाबाहेर आपल्याला घ्यायला आपली आई किंवा वडील आलेले असतात. त्यांच्या हाताला धरून आपण घरी येतो. ( पालकांनी मुलांच्या बालपणी ह्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे )

बालवाडीचे शिक्षण संपल्यानंतर आपल्याला प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात दाखल करण्यात येते. नवी शाळा, नवीन शिक्षक, नवीन वर्गातील आपल्या सोबतचे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी, नवीनच पाटी-पुस्तके, दप्तर, जेवणाचा डबा, वॉटर बॅग, शाळेचा गणवेश, ह्या सर्वांमध्ये आता आपले मन रमते. आई किंवा वडील दररोज आपल्याला शाळेत सोडायला येतात, तसेच शाळा संपल्यानंतर परत न्यायलाही येतात.

kids share their smallest moments with their parents when they are young

आपल्या वर्गात झालेल्या गमती-जमती, विद्यार्थ्यांच्या खोड्या आपण आपल्या आईवडिलांना सांगत असतो. हे सर्व ऐकून त्यांनाही त्याचे कौतुक वाटत असते. शाळेचे एखादे पुस्तक किंवा एखादे साहित्य किंवा कंपास पेटी आपल्याकडे नसली, तर आपण त्याकरिता त्यांच्याकडे हट्ट धरतो. ते साहित्य आत्ताच पाहिजे म्हणून आपण रडून रडून गोंधळही घालतो, ते साहित्य आणायला आपण त्यांना भाग पाडतो. ही प्रक्रिया जवळपास, आपण आठवीच्या वर्गात जाईपर्यंत चालत असते.

kids start forgetting their parents at this age

आठवीनंतर मात्र आपल्याला असे वाटू लागते की, आपण आता मोठे झालो आहोत. आपल्याला आता सर्व काही कळायला लागले आहे, परंतु तसे काहीही नसते. मग आपण आपल्या पद्धतीनेच स्वतः तयार होऊन शाळेत जायला लागतो. शाळेतील नवीन मित्रांमध्ये आपण गुंतून जातो. पहिल्यासारखी आता आपल्याला आपल्या आई-वडिलांची गरज भासत नाही. आपले अभ्यासाचे अथवा निकालाचे प्रगती पुस्तक पाहाण्यापुरतेच आता आई-वडील आपल्याकडे लक्ष देत असतात. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता आता कोणत्या महाविद्यालयात आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे? त्यानुसार त्यांची ऐपत असो किंवा नसो, तरीही ते आपल्याला त्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन देतात. त्यावेळी आपल्याला आता सर्व काही कळायला लागले आहे, असे आपल्याला वाटते. त्याशिवाय एक गोष्ट आपल्याला ही सुद्धा कळते की, आपल्या तुलनेत आपल्या आई-वडिलांना आता काहीच कळत नाही. असेही आपल्याला वाटू लागते, परंतु वास्तवात तसे काहीच नसते. कोणत्याच बाबतीत आपण त्यांच्यापेक्षा कधीच श्रेष्ठ नसतो, कारण त्यांनीच आपल्याला निर्माण केलेले असते, आपण त्यांना निर्माण केलेले नसते.

पुढे चालून महाविद्यालयीन शिक्षणाच्या संदर्भात आपण त्यांचा कोणताही सल्ला घेण्याच्या भानगडीत कधीही पडत नाही. जे काही आपल्याला वाटते त्यानुसार आपण वागत असतो, त्यांचे न ऐकल्यामुळे महाविद्यालयीन जीवनात कधी कधी आपले बरेच मोठे नुकसानही झालेले असते, हे आपल्याला जाणवते तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.

how the behaviour changes of your kids after they grow up

पुढे आपण कधीतरी कुठेतरी नोकरीला लागतो. त्यानंतर तर आपण आपल्या आई-वडिलांपेक्षाही फारच मोठे झाल्याचा आपल्याला भास होतो. परंतु जो पर्यंत आई-वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपण त्यांच्यासमोर लहानच असतो, त्यांच्या मृत्यूनंतरच आपण मोठे होतो. परंतु तरीही वास्तवात तसे काहीच नसते. आपण कितीही मोठे झालो तरीही त्यांच्याएवढे मोठे कधीच होत नसतो. विशेष हे की, आपले आई-वडील जिवंत असे पर्यंत आपल्याला ह्या गोष्टींची कधीही जाणीव होत नसते. परंतु तेव्हा ते ह्यात नसतात, तेव्हा मात्र क्वचीतच आपल्याला ह्या गोष्टीची प्रखरतेने जाणीव होते की, आपण आज जे काही आहोत, ते केवळ त्यांच्यामुळेच आहोत. ही गोष्ट आपण त्यांना त्यांच्या जीवंतपणी कधीच सांगितली नव्हती आणि सांगणारही नव्हतो. ( संस्कारांअभावी मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा असे होते )

आज त्यांच्या मृत्युनंतर मात्र ही गोष्ट आपल्याला समजलेली असती तरीही आज आपण त्यांना ही गोष्ट सांगू शकत नाही, कारण ह्यावेळी ते ही गोष्ट ऐकण्यासाठी आज ह्यात किंवा अस्तित्वातही नसतात.

people don't care about their parents after their parents death

त्यांचे अस्तित्व मात्र आजही आपल्या घरातील एका बंद कपाटात ठेवलेल्या त्यांच्या फोटोंच्या अल्बममधील त्यांच्या निर्जीव फोटोंच्या स्वरुपातच शिल्लक आहे. त्या शेजारीच त्यांचे लॅमिनेशन केलेले दोन मोठे फोटोही कपाटात आपण बंद करून ठेवलेले आहेत. हे फोटो किंवा त्यांच्या फोटोचा अल्बम पाहायला आता आपल्याला कुणालाही वेळ नसतो किंवा त्यांच्याच घरातील भिंतीवर त्यांचेच दोन मोठे फोटो लावायलाही आपल्याला जागा नसते, किंवा ते कुणालाही आवडत नाही.

some people keep the things of their parents as a memory

त्यांच्या वापरातल्या काही तुरळक जुन्या वस्तू मात्र आपल्या घरात आपण अजूनही त्यांची आठवण म्हणून जपून ठेवलेल्या आहेत. ह्या वस्तू किंवा ही अडगळ तुम्ही भंगारमध्ये का देऊन टाकीत नाहीत? म्हणून आपली मुल आपल्याला नेहमीच भांडत असतात. कारण त्या वस्तूंचे मोल त्यांना कधीच कळणार नाही. इथे पैशांचा प्रश्न नसून त्या वस्तूंमध्ये आपल्या भावना गुंतलेल्या असतात, हे त्यांना सांगूनही समजणार नसते. आपल्यानंतर आपले फोटोही त्याच कपाटात बंद करून ठेवण्यात येतील, असे समजायला अजिबात हरकत नाही.

आपण आपल्या मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, संवर्धन करून त्यांना जीवनात उभे करतो, त्याबद्दल आपल्याला नाही तरी ही आपल्या फोटोंना कपाटात बंद करून जन्मठेपेची शिक्षा ही दिलीच पाहिजे.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!