अनीतीने मिळविलेली संपत्ती, वरदान नसून शाप ठरत असते

Spread the love

एखाद्या परिवारातील व्यक्ती सुखी आहेत की नाहीत? ह्याचा अंदाज घ्याचा असला तर आजकाल त्या परिवाराची आर्थिक परिस्थिती कशी आहे? ह्याचाच प्रामुख्याने विचार करण्यात येतो. त्यामुळे अनेक परिवारातील करते पुरुष आपली आर्थिक स्थिती संपन्न करण्याकरिता प्रयत्न करतात. आर्थिक दृष्टीने एखादा परिवार संपन्न असणे, ह्यामध्ये काहीही गैर नाही. परंतु त्यासोबतच त्या परिवारातील सर्व सदस्यसुद्धा चांगल्या संस्काराने संपन्न होणे ही सुद्धा अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे.

some families understands the value of money and savings

ज्या परिवारातील आर्थिक संपदा चांगल्या नितीनियमाने जमविल्या जाते, त्या परिवारातील इतर सदस्यांवरसुद्धा त्या चांगल्या नीती नियमांचेच संस्कार होत असतात. अशा परिवारातील सदस्यांना पैशांची किंमत कळते. आपल्या परिवारातील व्यक्ती किती मेहनतीने पैसे कमावतात, हे त्या परिवारातील इतर सदस्य पाहात असतात. त्यामुळे त्या पैशांचा दुरुपयोग, गैरवापर किंवा अनावश्यक वायफळ खर्च करण्याची त्यांची कधीच इच्छा होत नाही. ( गरज आणि इच्छेमधील फरक समजून, अशाप्रकारे पैसे खर्च करा )

in the rich families most members don't have habit of saving money

ह्या उलट ज्या परिवारातील व्यक्ती अनीतीने, भ्रष्टाचाराने, अथवा गैरप्रकाराने पैसा किंवा संपत्ती कमावितात, त्या परिवारातील इतर सदस्य ते सर्व पाहातात. आपल्या परिवारात पैसा कसा अगदी सहजपणे येतो, हे त्यांना माहिती असते त्यामुळे त्यांना त्या पैशांची अजिबात किंमत नसते. अशा पैशांचा मग प्रत्येक बाबतीत दुरुपयोग, वायफळ किंवा अनावश्यक खर्च करण्याकरिता सर्रासपणे वापर केला जातो. अशावेळी गरज नसतांना हॉटेलमध्ये जाऊन आपल्या चटोरेपणाच्या सवयीवर अतिरिक्त खर्च करणे, कुणातरी मित्रांच्या नादी लागून बिअरबारमध्ये जाऊन दारू किंवा बिअरवर खर्च करणे, वापरण्याकरिता आपल्याकडे पूर्वीचेच भरपूर कपडे असूनही वेळोवेळी फॅशन परस्तीच्या नावावर किंवा सणावाराच्या विविध प्रसंगाचे निमित्तसाधून अनावश्यक रीतीने कापडांची खरेदी करीत राहाणे, मनोरंजनाच्या किंवा सुख सुविधांच्या अथवा सौंदर्य प्रसाधनांच्या विविध साहित्यावर अनावश्यक रीतीने भरपूर खर्च करणे, मुलांच्या महागड्या शिक्षणाकरिता भरपूर देणगी अथवा मोठी फीस भरून त्यांच्या शिक्षणावर भरमसाठ खर्च करणे, आपल्या श्रीमंतीचा थाट दाखविण्यासाठी लग्न समारंभावर किंवा इतरही अनेक ठिकाणी प्रचंड खर्च करणे, या सारख्या गोष्टींवर सहसा अनितीद्वारे कमाविलेलाच भरपूर पैसा खर्च करण्यात येतो. अशा परिवारातील मुलांनासुद्धा वरील पैशांची विनाकारण उधळपट्टी करण्याकरिता काहीही वाटत नसते.

in the middle class family each members knows the value of money

 

ह्याउलट आर्थिक दृष्ट्या सर्व साधारण किंवा गरीब परिवारातील लोकांकडे जो काही मर्यादित पैसा येतो, त्या पैशांचे त्यांना महत्व कळालेले असते, त्यामुळे ते त्या पैशांचा अनावश्यक असा कधीच गैरवापर करतांना कधीच दिसत नाहीत. आपल्या घरी जे काही अन्न शिजते त्याच अन्नावर ते समाधान मानतात. घरच्या अन्नाला नाकारून, हॉटेलमध्ये जाऊन आपल्या चटोरेपणाची हौस भागविण्याची त्यांना कधीच इच्छा होत नाही. आपल्या गरजेपुरते अथवा आवश्यकतेपुरते कपडे घरात असतांना, फॅशन परस्तीच्या नावावर अथवा विविध सणावारांच्या प्रसंगानिमित्ताने कपडे किंवा इतर वस्तू खरेदी करण्याची अशा परिवारातील लोकांना गरज वाटत नाही. महागड्या शिक्षणाकरिता भरमसाठ देणगी अथवा फीस लागत असेल तर त्या शिक्षणाऐवजी दुसरा एखादा अभ्यासक्रम निवडण्याची अशा परिवारातील लोकांची इच्छा असते. लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमावरसुद्धा ह्या मंडळींकडून अतिरिक्त किंवा वायफळ खर्च कधीच केल्या जात नाही. अशा परिवारातील व्यक्तींना दुर्व्यसनांमध्ये किंवा इतर वाईट कामांमध्ये खर्च करण्याकरिता फारसा पैसा आणि वेळही नसल्यामुळे ते त्यापासून अलिप्त राहू शकतात.

in the rich families they spend the money on useless things

ह्याउलट श्रीमंत परिवारातील लोकांकडे भरपूर पैसा उपलब्ध असल्यामुळे ते दुर्व्यसनांवर अथवा वाईट सवयींवर सहजपणे भरपूर पैसा खर्च करू शकतात. अनितीने पैसे कमावणाऱ्या अनेक परिवारांमध्ये पैशांची कमी नसल्यामुळे विविध कामांवर तसेच विविध प्रकारच्या वाईट सवयींवरसुद्धा त्यांचा भरमसाठ पैसा खर्च होत असतो. ( आपण कमाविलेल्या पैशांचे अशाप्रकारे नियोजन करा )

अनीती आणि गैरव्यवहाराने पैसे कमाविणारी व्यक्ती आपला वर्तमान काळ तसेच आपला भविष्य काळ सुरक्षित करण्याकरिता धडपड करून अनीतीने भरपूर पैसा कमावितात, परंतु त्या अनितीने कमाविलेल्या पैशाचा ते कधीच सदुपयोग करून घेऊ शकत नाहीत. ह्या संपन्न असलेल्या परिवारांना आपल्या धन संपत्तीचे विशेष महत्व वाटत असते, त्याकरिता ते आपल्या नीतिमत्तेचाही बळी देतात. परंतु त्या धनसंपत्तीमुळे त्यांच्या परिवारातील सदस्यांमध्ये सद्गुण आणि चांगल्या संस्काराचा फारसा लवलेशही कधीच दिसून येत नाही. एवढेच काय तर त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असल्यामुळे त्यांच्या परिवारातील लोक कर्तुत्ववान होऊन चांगले कार्य करण्याऐवजी दुर्व्यसनी, आळशी आणी कर्तुत्वहीन होऊन आपल्या परिवारातील जमा संपत्तीची उधळपट्टी करण्यातच धन्यता मानतात. ( ह्या शब्दांचा अर्थ लक्षात घेऊनच पैसे खर्च करा )

अशाप्रकारे अनीतीने मिळविलेली संपत्ती ही त्या परीवाराकरिता वरदान ठरत नसून शाप ठरत असते.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

2 thoughts on “अनीतीने मिळविलेली संपत्ती, वरदान नसून शाप ठरत असते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!