व्यवसाय सुरु करण्यापूर्वी ह्या गोष्टी करा

Spread the love

नोकरी मिळणे कठीणच नाही तर अत्यंत कठीण झालेले आहे. तरुण-तरुणी नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आपला वेळ विनाकारण घालवीत असल्याचे दिसून येत. कधीच न मिळणाऱ्या नोकरीच्या प्रतीक्षेत आपला वेळ वाया घालविण्याऐवजी तरुण-तरुणींनी आपल्याला जमेल असा कोणतातरी उद्योग व्यवसाय सुरु करून आपला वेळ सत्कारणी लावावा. उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता आम्ही खाली काही माहिती देत आहोत.

 

आपण निवडलेल्या उद्योगाची माहिती आणि प्रशिक्षण घ्या.

get the knowledge and information about your business

आपण जो कोणता उद्योग किंवा व्यवसाय निवडला असेल त्या उद्योगाची आपल्याला अगदी सखोल माहिती आणि अनुभव असणे आवश्यक असते. सखोल माहिती नसतांना अथवा त्या उद्योगाचा कोणताही अनुभव नसतांना, केवळ स्वतःचे अथवा कुठूनतरी कर्ज मिळवून सुरु केलेल्या त्या उद्योगाचे भवितव्य निश्चितपणे धोक्यात येते. तो व्यवसाय अनुभव नसल्यामुळे डबघाईस येऊन, तोटा होऊन लगेच बंद पडतो. म्हणून कोणताही व्यवसाय सुरु करण्याअगोदर त्या उद्योगातील अथवा व्यवसायातील तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली भरपूर काम करून त्या व्यवसायाचा अगोदर चांगला अनुभव घेणे आवश्यक आहे. मग हा अनुभव एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सोबत काम करून मिळविता येतो, अथवा आपण निवडलेल्या एखाद्या उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण संस्था असेल तर तिथेही अपान त्या उद्योग व्यवसायाचे ज्ञान मिळवून अनुभव प्राप्त करून घेऊ शकतो. ज्या उद्योग व्यवसायाची आपल्याला सखोल माहिती व अनुभव आहे तोच व्यवसाय करावा. कुणी एखादा व्यक्ती एखाद्या उद्योगात चांगला पैसा मिळवीत असल्याचे पाहून आपण तो उद्योग अनुभव नसतांना अजिबात करू नये.

 

उद्योग व्यवसायाची निवड

select the type of your business

साधारणपणे उद्योग व्यवसाय निवडतांना आपल्याला तो उद्योग व्यवसाय करता येईल काय? तो उद्योग व्यवसाय करण्याची आपली शारीरिक, आर्थिक, बौद्धिक तसेच मानसिक क्षमता आहे काय? ह्याचाही गंभीरपणे विचार करावा. एखादा मेहनतीचा उद्योग व्यवसाय करण्याकरिता आपली शारीरिक क्षमता कणखर असावी लागते. त्यासोबतच एखदा उद्योग व्यवसाय करण्याकरिता आपली आर्थिक क्षमताही चांगली असावी लागते. तसेच एखाद्या उद्योगाकरिता बौद्धिक तसेच मानसिक क्षमताही चांगली असावी लागते. उद्योगाची निवड करतेवेळी आपल्यात ह्या क्षमता आहेत काय? ह्याचाही शोध घेऊन आपण उद्योगाची अथवा व्यवसायाची निवड करावी.

 

उद्योग व्यवसाय साधारणपणे तीन प्रमुख गटांमध्ये विभागता येतात.

  • सेवा व्यवसाय
  • विक्री व्यवसाय अथवा व्यापार
  • निर्मिती व्यवसाय

 

सेवा व्यवसाय

सेवा व्यवसायामध्ये आपण ग्राहकांना किंवा लोकांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देऊ शकतो सेवा उद्योगाचे अनेक प्रकार आहेत. उदा – मोबाईल रिपेरिंग करून देणे, कपडे शिवून देणे, डीटीपी किंवा छपाई करून देणे, मंडप डेकोरेशन, हॉटेल किंवा खानावळ चालविणे, विविध प्रकारच्या वस्तूंची दुरुस्ती करून देणे.

 

विक्री व्यवसाय

विक्री व्यवसायाचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. ह्यामध्ये आपण ग्राहकांना किंवा लोकांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे विविध वस्तूंची विक्री करू शकतो. ह्याकरिता आपल्याला लोकांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याचे, मालाचे, अथवा वस्तूंचे दुकान सुरु करून अनेक प्रकारच्या वस्तूंची, किराणा मालाची किंवा कोणत्याही साहित्याची विक्री करता येते.

 

निर्मिती व्यवसाय

ह्यामध्ये आपल्याला लोकांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्याची, मालाची, अथवा वस्तूंची निर्मिती करता येते. कोणत्याही वस्तूची निर्मिती करण्याकरिता कारखाना टाकून, यंत्र सामुग्रीची मोठ्या प्रमाणात उभारणी करून, आवश्यकतेप्रमाणे अनेक कुशल आणि अकुशल कामगाराच्या मार्फत हा निर्मिती व्यवसाय करता येतो. उदा – कुलर बनविणे, पंखे बनविणे, सायकल, मोटार सायकल, कार, टीव्ही, मोबाईल, लाकडी किंवा लोखंडी फर्निचर इत्यादींची निर्मिती करणे, वगैरे वगैरे

 

व्यवसायाकरिता आवश्यकतेप्रमाणे जागेची उपलब्धता

start looking for a suitable place for your business

सेवा व्यवसाय, विक्री व्यवसाय तसेच निर्मिती उदयोग ह्या तीनही गटांकरिता आवश्यकतेप्रमाणे जागेची गरज असते. सेवा उद्योग अगदी छोट्याश्या एखाद्या स्वतःच्या अथवा भाड्याच्या जागेतही १०*१२ चे दुकान टाकूनही करता येतो. जागा किती मोठी हवी आहे? ते आपल्या उद्योगाच्या स्वरूपानुसार ठरविता येते.

विक्री व्यवसायातही आपल्या व्यवसायाच्या आवश्यकतेप्रमाणे जागेची निवड करून स्वतःचे अथवा भाड्याचे दुकान घेऊनही हा व्यवसाय करता येतो. विक्री करिता आपण कोणता माल, अथवा वस्तू किती प्रमानात ठेवणार आहोत? त्यानुसार आपल्याला जागा उपलब्ध असावी लागते.

निर्मिती उद्योगाकरिता साधारणपणे मोठी जागा लागते. आपण कोणत्या वस्तूंची, कोणत्या यंत्रांची अथवा कोणत्या साहित्याची निर्मिती करीत आहोत? त्यानुसार आपल्याला किती कामगारांची गरज आहे? किती यंत्र सामुग्रीची तसेच इतर आवश्यक साहित्याची गरज आहे? त्यानुसार आपल्याला जागेची आवश्यकता असते. ह्याशिवाय पाणी, वीज, निर्मिती उद्योगाकरिता आवश्यक असणाऱ्या विविध शासकीय विभागाच्या विविध परवानग्याची सुद्धा आवश्यकता असते.

 

उद्योग व्यवसायाकरिता आवश्यक ते भांडवल किंवा अर्थ सहाय्य

start collecting money for your business

सेवा व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायाच्या गरजेनुसार अत्यंत कमी भांडवलातही हा व्यवसाय सुरु करता येतो. अगदी दहा हजारांपासून नंतर एक-दीड लाख रुपयांमध्येही आपल्याला सेवा उद्योग चांगल्याप्रकारे सुरु करता येते. आपण कोणता सेवा उद्योग करणार त्यानुसार भांडवल किती लागेल? हे ठरविता येते, त्यानुसार आपण स्वतः भांडवल जमवून किंवा एखाद्या बँकेमार्फत कर्ज घेऊनही व्यवसाय सुरु करू शकतो.

 

विक्री व्यवसायाकरिता भांडवल

आपण कोण-कोणत्या वस्तूची, मालाची अथवा साहित्यांची विक्री करणार आहोत? विक्री करण्याकरिता आपण आपल्या दुकानात किती माल ठेवणार आहोत? ह्यावरून आपल्याला किती भांडवलाची गरज आहे? त्यानुसार आपल्याला भांडवल किंवा अर्थसहाय्याची व्यवस्था करावी लागते. ह्याकरिता गरज पडल्यास एखाद्या बँकेकडूनही अर्थसहाय्य किंवा कर्ज घ्यावे लागते.

 

निर्मिती उद्योगाकरिता भांडवल

निर्मिती उद्योगाकारीताही आपल्या उद्योगाच्या स्वरूपानुसार अथवा आपण कोणत्या वस्तूंची अथवा कोणत्या यंत्रांची निर्मिती करीत आहोत? त्यानुसार मोठ्या प्रमाणात भांडवल किंवा अर्थसहाय्याची गरज भासते. ह्याकरिता आपल्याला बँकेचे आवश्यकतेप्रमाणे कर्ज घ्यावे लागते. त्यामध्येच मग उद्योगाकरिता अथवा कारखान्याकरिता जागा, यंत्र सामुग्री, इतरही आवश्यक त्या गोष्टी तसेच विविध विभागाच्या परवानग्या आणि कुशल व अकुशल कामगारांची गरजेप्रमाणे व्यवस्था करता येते.

 

ह्या आहेत व्यवसाय वाढीसाठी आवश्यक गोष्टी

things that will help to increase your business

कोणताही व्यवसाय चांगल्याप्रकारे चालण्यासाठी त्या व्यवसायानिमित्त आपल्याकडे आलेले ग्राहक हे आपल्या सेवेमुळे अथवा आपल्या व्यवहारामुळे संतुष्ट होणे अत्यंत आवश्यक असते. ईमानदारी, सचोरी आणि योग्य व माफक दर आकारणी सोबतच ग्राहकांशी आदर आणि सौजन्याची वागणूक, ह्याच गोष्टीमुळे उद्योग व्यवसायाची चांगली वाढ होऊ शकते.

जाहिरात व जनसंपर्क ही सुद्धा उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट असते. ग्राहकांशी आपला व्यवहार चांगला असेल, तो जर आपल्या व्यवहाराने संतुष्ट झाला असेल तर तो त्याच्या संपर्कातील इतर लोकांनाही आपल्याकडे पाठवील. ग्रहाज जर आपल्या व्यवहाराने असंतुष्ट असेल तर तो त्याच्या संपर्कातील इतर लोकांनाही आपल्याकडे न येण्यासंदर्भात त्यांना सावध करील. लोकांमध्ये आपल्या व्यवसायाच्या संदर्भात चर्चा आणि प्रसिद्धी झाली तर आपला व्यवसाय निश्चितच वाढतो. लोकांमध्ये आपण आपल्या व्यवसायातील फसवणुकीच्या अथवा बेईमानीच्या व्यवहारामुळे कुप्रसिध्द झालो तर लोक आपल्याकडे येऊ इच्छिनार नाहीत, त्यामुळे आपला व्यवसाय डबघाईस येऊन तोटा होऊन पडण्याचीही शक्यता असते. म्हणून एखाद्यावेळी व्यवसायात थोडाफार तोटा होत असेल, तरीही चालेल परंतु आपल्या व्यवसायातील आपले नाव कोणत्याही परिस्थितीत आपल्या बेईमानीच्या  व्यवहारामुळे खराब होऊ नये, ह्याची दक्षता घ्यावी.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!