दिवसा कधीही झोपू नका, रात्री फारसं जागू नका

Spread the love

निसर्गाने दिवस आणि रात्रीची रचना केलेली आहे. सूर्य नियमितपणे उगवतो आणि नियमितपणे मावळतो. सूर्याभोवती आपली पृथ्वी नियमितपणे आपल्या ठराविक गतीने परिभ्रमण करीत असते. त्यामुळेच दिवस आणि रात्रीचे चक्र ठरलेल्या वेळी न चुकता चालूच असते. दिवस संपूर्ण मानवजातीला तसेच सजीव प्राण्यांना आप-आपले दैनंदिन कामे करण्यासाठी असतो, तर ती कामे केल्यानंतर आपल्याला जो काही थकवा येतो तो थकवा नाहीसा होण्यासाठी झोप घेण्याकरिता निसर्गाने रात्रीची रचना केलेली आहे. आपण जर दिवसाची कामे रात्री आणि रात्रीची कामे दिवसा करू लागलो तर ते आपल्याला निश्चितपणे गैरसोयीचे ठरेल. एवढेच नाही तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही घातकच ठरेल.

some people work at night instead of sleeping

आपण बऱ्याचवेळा पाहतो कि, अनेक लोक आपली दिवसा करावयाचीही काही महत्वाची कामे रात्री बराच वेळ जागरण करून करतात. त्यांना वाटते कि आपण रात्रीसुद्धा काम करून इतरांपेक्षा जास्तवेळ काम करीत आहोत. त्यामुळे बरेच काम मार्गी लागले आहेत वगैरे वगैरे….. परंतु तसं काहीच नसत जी आपली झोपण्याची नियमित वेळ असते त्यावेळी आपण जर काही कामे केली तर आपल्या कामाचा वेग अथवा गती मंदावते. एवढेच नाही तर आपल्या कामाची गुणवत्ताही लक्षणीय दृष्टीने कमी होते. त्याचसोबत शरिराला त्यावेळी झोपेची आवश्यकता असल्यामुळे अधून मधून आपोआप डोळे मिटल्या जाऊन डुलक्या घेतल्यामुळेही आपल्या कामामध्ये भरपूर चुका होण्याची शक्यता असते अथवा निश्चितपणे चुका होतातच. ( रात्री पुरेशी झोप घेतल्याने हे फायदे होतात )

ह्याचे एक उदाहरण द्यायाचे झाल्यास मध्यरात्रीनंतर चार चाकी वाहन चालकांना झोपेची डुलकी लागल्यामुळे अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण अनेकवेळा वाचलेल्याच आहेत. ही तर झाली वाहन चालाकांसंबंधीची गोष्ट परंतु इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक लोकांनाही रात्रीच्या वेळी कार्य करण्याचे गंभीर दुष्परिणाम भोगण्याची कधी-कधी वेळ येते. म्हणून आपली कोणतीही महत्वाची कामे करायची असतील तर ती कामे दिवसाच करण्याकरिता प्राधान्य द्या! एवढेच नाही तर आपल्या दिवसाच्या वेळेत सकाळी सर्वप्रथम आपली दैनंदिन दिनचर्या आटोपल्यावर नऊ-दहा वाजण्याच्या सुमारासच आपली कामे नव्या जोमाने सुरु करा. ह्यामुळे ती कामे अधिक चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता असते.

रात्रीच्या वेळेस योग्यवेळी आपण आपल्या शरिराला आवश्यक तेवढी झोप घेतल्यामुळे, आपला दिवसभराचा थकवा निघून जातो. सकाळी आपले शरिर नवीन काम करण्यासाठी उत्साहाने परिपूर्ण झालेले असते. त्यामुळे आपण आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. रात्री कामे केल्यामुळे आपल्या कामातील गुणवत्ता कमी होण्यासोबतच आपल्या शरिरावरही झोप न घेतल्यामुळे दुष्परिणाम होतात.

रात्री जागरण केल्याच्या दुसऱ्या दिवशी पुरेशी झोप न झाल्यामुळे आपल्याला फारच थकवा जाणवतो. झोपही येवू लागते. अधूनमधून डोळे आपोआप मिटल्या जातात. कोणत्याही कामात आपले मन लागत नाही. आपण दिवसा काही काम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कामातही चूका होऊ लागतात. कामाची गुणवत्ताही कमी होते. अशाप्रकारे आपला तो दिवसही कामाच्या दृष्टीने व्यर्थ वाया जातो. मग आपण आदल्या रात्री जागरण करून जे काही (कमी दर्जाचे) काम केले त्याचा फायदा तरी काय?

try to avoid working at night

बऱ्याचवेळा आपण आपले काम योग्यवेळी करीत नाही. काम करण्याची वेळ निघून जाते, त्यामुळेच आपल्याला कधी-कधी रात्री जागरण करून ते काम पूर्ण करावे लागते. त्यामुळे कोणतेही आणि कितीही महत्वाचे काम असुद्या, त्या कामाची गुणवत्ता हवी असेल तर ते काम योग्यवेळी दिवसाच करा! रात्री करू नका. रात्र फक्त झोपण्यासाठीच असते एवढेच लक्षात घ्या.

कुणीतरी म्हंटले आहे की, “लवकर उठे, लवकर झोपे, त्याला आरोग्य आणि संपत्ती भेटे !” म्हणूनच आरोग्य आणि संपत्ती भेटण्याकरिता आपणही आता योग्यवेळी योग्य काम करण्याची सवय ठेवलीच पाहिजे.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

2 thoughts on “दिवसा कधीही झोपू नका, रात्री फारसं जागू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!