खोटी प्रतिष्ठा जपण्याच्या नादात आपण किती खर्च करतो?

Spread the love

आपल्या बुद्धी कौशल्यानुसार प्रत्येक व्यक्ती व्यवसाय अथवा नोकरीमधून आर्थिक प्राप्ती करीत असतो. आपल्या त्या आर्थिक प्राप्ती नुसार तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या गरजेनुसार त्याला खर्च करावा लागतो. आपल्या अथवा आपल्या कुटुंबाच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्याकरिता लागणाऱ्या खर्चाचे व्यावस्थितपणे त्याने काटेकोरपणे नियोजन केले पाहिजे. आपल्या गरजा आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चाचे योग्य ते नियोजन न करता त्याने अनावश्यक त्या ठिकाणी, अनावश्यक त्या गोष्टींवर खर्च केला तर, त्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.

stop spending money on the things which you don't need

आपली जी काही आर्थिक परिस्थिती असते, त्यापेक्षा आपण आर्थिक दृष्ट्या अधिक संपन्न आहोत, असे इतरांना दाखविण्याची अनेक लोकांची मानसिकता असते. समाजात माझी खूपच प्रतिष्ठा आहे, असा त्यांचा स्वतःबद्दलचा एक कायमस्वरूपी गैरसमज झालेला असतो. त्यामुळे आपली ती खोटी प्रतिष्ठा राखण्यासाठी अथवा मी आर्थिक दृष्टीने चांगलाच संपन्न आहे, हे इतरांना दाखविण्यासाठी तो आपली ऐपत नसतांनाही अनेक प्रसंगी, अनेक ठिकाणी, अनेक गोष्टींवर अनावश्यक असा खर्च करतो.

don't take loan or borrow money from someone to keep your reputation

एखाद्या विवाहात, एखाद्या घरगुती कार्यक्रमात, देणगी अथवा सप्रेम भेट देण्याच्या प्रसंगी, आपण जर चांगला खर्च केला नाही, तर लोक आपल्याला काय म्हणतील? अशाने इतरांसमोर आपली प्रतिष्ठा कशी काय राहील? अशी त्याला भिती वाटते, म्हणून तो अशाप्रसंगी आपल्या आर्थिक ऐपतीपेक्षाही अधिक खर्च करतो. ह्याकरिता मग त्याला वेळप्रसंगी कर्जही काढावे लागते. अशाप्रकारे तो इतरांसमोर खोटा दिखावा, करून आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी आतल्या आत कर्जबाजारी होत असतो. अशाप्रकारे आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक लोक कर्जबाजारी होऊन कर्जाच्या ओझ्याखाली ते आपली मानसिक शांती घालवून जीवन जगत असतात.

खर पाहाता, लोक काय म्हणतील? अथवा आपली खोटी आर्थिक प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी, अथवा मी सुद्धा आर्थिक दृष्टीने संपन्न आहे, हे इतरांना दाखविण्यासाठी अनेक लोक कर्ज काढून आपला ऐपतीपेक्षा अधिक खर्च करीत असतात. स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण अनेक वेळा ढोंग करीत असतो. वास्तविक जीवनात जे आपण नाही, त्याचे ढोंग करून, त्या त्या प्रसंगानुसार आपण खोटा अभिनय करीत असतो. त्या त्या प्रसंगाला साजेसे संवाद सुद्धा आपण म्हणतो. हे ढोंग आपण केले नाही तर समाजातील आपली प्रतिष्ठा कमी होईल, लोक आपल्याला नवे ठेवतील, असे आपणास वाटत असते.

don't buy extra cloths if you don't need them

आपण सगळ्यात जास्त दिखावा कपड्यांच्या बाबतीत करीत असतो. आपल्या आवश्यकतेपुरते, अथवा आपल्या ऐपतीनुसार कपडे आपण वापरत नसून, इतरांना दाखविण्यासाठी आपण अनेक विविध प्रकारचे महागडे कपडे वापरीत असतो. आपले आकर्षक रूप दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांवर सुद्धा बराचसा अतिरिक्त पैसा गरज नसतांनाही खर्च करीत असतो. ह्या सर्व कृत्रीम गोष्टींमुळे आपली प्रतिष्ठा वाढत आहे, असा आपल्याला गैरसमज झालेला असतो. परंतु वास्तविक पाहाता आपण ज्या दृष्टीकोनातून विचार करतो, त्या दृष्टीकोनातून इतर लोक आपल्याबाबतीत अजिबात विचार करीत नसतात. आपण आर्थिक दृष्टीने किती गरीब आहोत, की संपन्न आहोत, ह्यासंदर्भात कुणालाही काहीही घेणे देणे नसते. त्यांना त्यांची मुलगी आपल्या घरात द्यायची नसते, किंवा आपली मुलगी त्यांना सून म्हणून करून घ्यायची नसते.

don't try to look rich if you are not rich

एकदा का एखाद्या व्यक्तीने आपण आहोत त्यापेक्षा अधिक आर्थिक दृष्टीने संपन्न असल्याचे ढोंग करण्याचा प्रयत्न केला की, ते ढोंग टिकण्यासाठी तो आपली ऐपत नसतांनाही भरमसाठ खर्च करीत असतो. समाज तर कोणत्याही गोष्टीला चांगले किंवा वाईट म्हणत असतो, परंतु समाजात आपली प्रतिष्ठा टिकविण्यापायी अशा व्यक्तींना अनावश्यक रीतीने आपल्या फॅशन परस्तीवर किंवा इतर गोष्टींवर अनावश्यक असा खर्च करावा लागतो. एवढे करूनही जेव्हा कधीतरी त्या व्यक्तीची वास्तविकता इतरांना कळते, तेव्हा मात्र त्या व्यक्तीची लोक चेष्टा सुद्धा करतात. त्यामुळे आपण वास्तविक जीवनात जसे आहोत, तसेच वागण्याचा, तसेच दिसण्याचा, तसेच बोलण्याचा आपण सदैव प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपल्यावर कधीही लज्जीत होण्याची किंवा कोणत्याही बाबतीत कधीच ढोंग करण्याची आवश्यकता राहाणार नाही.

stop going for shopping regularly

फॅशन परस्ती, खोटी प्रतिष्ठा अथवा दिखावा करण्यात स्त्रियांचाही फार मोठा पुढाकार असतो. शेजारणीने नवीन साडी घेतली तर ती स्त्री सुद्धा नवीन साडी घेते. कोणताही सण उत्सव आला की त्या निमित्ताने तिला नवीन साडी पाहिजेच असते, तिच्याकडे अगोदरच्याच अनेक साड्या असतात, तरीही नवीन साडीची तिला हौस असते. त्यासोबतच दागिणे, मग ते बेंटेक्सचे असले तरीही चालतील, त्याशिवाय सौंदर्य प्रसाधनांची विविध साधने सुद्धा पाहिजेच असतात. एखाद्याच्या लग्नात गेल्यानंतर तिथेसुद्धा इतरांच्या तुलनेत चांगली भेटवस्तू देण्याचा स्त्रियांचा कल असतो. कारण कमी दर्जाची वस्तू दिली तर इतरांसमोर आपली प्रतिष्ठा कमी होईल, असे त्यांना वाटत असते. त्यांना ह्या गोष्टीची अजिबात चिंता नसते की, ह्या सर्वांकरिता त्यांच्या पतीला किती तरी मोठी आर्थिक झळ सोसावी लागत असते.

खरे पाहाता, आपल्या फॅशन परस्तीमुळे, आपण वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनांमुळे, अथवा आपल्या विविध प्रकारच्या कपड्यांमुळे किंवा आपण वेळोवेळी अनावश्यक अशा अनेक गोष्टींवर खर्च करीत असल्यामुळे समाजात आपली प्रतिष्ठा कधीच वाढत नसते. अथवा त्यामुळे आपल्याला मानसन्मानही कधीच मिळत नसतो. ह्याकडे लोकांचे अजिबात लक्ष नसते.

वास्तविक पाहाता, अपान समाजात कसे वागतो? आपण इतरांशी कसे बोलतो? आपण इतरांना वेळप्रसंगी कशी मदत व सहकार्य करतो? आपल्यामध्ये कोणकोणते विशेष गुण आहेत? आपल्या त्या गुणांचा समाजाला किंवा इतरांना कसा उपयोग होऊ शकतो? ह्याच सर्व गोष्टींमुळे समाजात आपली प्रतिष्ठा व मानसन्मान वाढत असतो. समाजातील आपली प्रतिष्ठा व मानसन्मान वाढविण्यासाठी आपण ह्याच विशेष गुणांची जोपासना केली पाहिजे.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!