डिप्रेशन आणि त्याची लक्षणे

Spread the love

आजकाल प्रत्येकाला कधी ना कधी तरी डिप्रेशन येत असते, मग तो शाळेतील विद्यार्थी असो, कॉलेजमधील तरुण असो, कुठे नोकरी अथवा व्यवसाय करणारी व्यक्ती असो किंवा एखादा वृध्द व्यक्ती असो. प्रत्येकाला कधी ना कधी तरी त्याच्या आयुष्यात डिप्रेशनच्या समस्येला तोंड द्यावे लागते. डिप्रेशनमुळे व्यक्तीची कार्यशक्ती तसेच विचारशक्ती ही नष्ट होते.

डिप्रेशनमध्ये असलेली व्यक्ती ही नेहमी दु:खी आणि निराश अवस्थेतच असते. या निराश आणि दु:खी अवस्थेमुळे अनेकांची मानसिक स्थिती बिघडून जाते, तर काही काही लोक आत्महत्याही करतात.

खाली डिप्रेशनची लक्षणे सांगितलेली आहेत. त्या लक्षणांपैकी काही लक्षणे तुमच्यात दिसून आली, तर तुम्ही सुद्धा डिप्रेशनच्या परिस्थितीतून जात आहात.

 

१) तुम्हाला नेहमी असहाय्यपणा, अस्वस्थपणा आणि अपराधीपणाची भावना जाणवते.

You always feel the sense of helplessness, discomfort and guilt

आपण स्वतःला अत्यंत असहाय्य झाल्यासारखे समजतो. आपल्या जीवनात जे काही घडले आहे, त्यामध्ये आपल्याला कुणीच मदत करू शकत नाही, तसेच ह्या परिस्थितीला आपणच स्वतः जबाबदार आहोत असे समजून आपल्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते.

 

२) कोणतेही विशेष कारण नसतांनाही तुम्हाला निराशा जाणवते.

Even if you have no special reason, you feel disappointed and sad

कोणत्याही घटनेकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन निराशाजनक होऊन जातो, त्यामुळे एखादी आनंददायक घटना जरी घडली तरी त्या घटनेचा आनंद फार काळ आपल्या मनात राहात नाही. आपण सदैव निराश मनस्थितीतच राहातो.

 

३) कोणत्याही कार्यासाठी तुम्ही अक्षम आहात असे तुम्हाला वाटू लागते, आणि तुम्ही स्वतःची इतरांसोबत तुलना करायला सुरुवात करता.

You feel like you are uncapable to work, and you start to compare yourself with others

आपल्याकडे कोणतेही काम आल्यास ते काम आपल्याकडून होणारच नाही, असे आपल्याला वाटू लागते. अशावेळी तुम्ही ते काम करणाऱ्या इतर लोकांसोबत आपली तुलना करू लागता, त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वासही कमी होऊ लागतो.

 

४) तुम्हाला भूक लागते परंतु काहीही खाण्याची इच्छा होत नाही.

You get hungry but do not want to eat anything.

तुम्हाला भूक लागल्याचे जाणवते परंतु तुमची काहीच खाण्याची इच्छा होत नाही, तरीही तुम्ही काहीतरी खाण्याचा प्रयत्न केलाच तर तुम्हाला पुरेसे जेवणही जात नाही. थोडेफार जेवण केल्यानंतरसुद्धा तुम्हाला भूक लागल्याची जाणीव सदैव होतच असते.

 

५) तुम्हाला नेहमी थकल्यासारखे वाटते.

you always feel tired

कोणतेही लहान-मोठे काम केल्यानंतर तुम्हाला थकल्यासारखे जाणवते, अधिक काम करण्याकरिता तुमच्याकडे अजिबात उर्जा राहात नाही. त्यामुळे तुमची बरीच कामे अपूर्ण राहातात.

 

६) तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यासाठी अडचण निर्माण होते. ज्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत, त्या गोष्टी तुम्ही बऱ्याचदा विसरून जातात.

you cant focus on anything and you start forgetting things

कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही हातात घेतले तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्या कामामध्ये तुमचे लक्ष केंद्रित होत नाही. लक्ष केंद्रित होत नसल्यामुळे तुम्ही अगदी साध्या-साध्या गोष्टीही विसरायला लागता. याचा परिणाम तुमच्या इतर कामांवर होतो.

 

७) तुम्हाला पूर्वी ज्या गोष्टी करण्यात आनंद वाटायचा त्या गोष्टींमध्ये आता फारसा रस वाटत नाही.

You are not interested in the things you enjoyed before

पहिले तुम्हाला कशाचातरी छंद असेल किंवा काही विशेष गोष्टी करण्याची आवड असेल. आता ते छंद पुरविण्यात आणि त्या गोष्टी करण्यात तुम्हाला पूर्वीसारखा आनंद मिळत नाही, अथवा त्यामध्ये तुमचे मनही लागत नाही.

 

८) तुम्हाला इतरांसोबत राहायला अथवा वेळ घालवायला नकोसे वाटते. तसेच एकटेपणाही तुम्हाला फारसा आवडत नाही.

You do not want to spend time with others and also do not like loneliness

तुम्ही पूर्वी इतरांसोबत राहायचे, त्यांच्यासोबत वेळ घालवायचे, आता तुम्हाला त्यांच्यासोबत राहावेसे वाटत नाही आणि त्यांच्यासोबत वेळ घालवावा असेही वाटत नाही. तुम्ही त्यांची भेट घेण्यासही टाळाटाळ करीत असता. तसेच स्वतःचा एकटेपणाही तुम्हाला आवडत नाही.

 

९) तुम्हाला काम करण्याची अथवा कुठे बाहेर जाण्याची इच्छा होत नाही.

you feel like You do not want to work or go out

तुमच्या मनामध्ये सुरु असणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे तुमच्या इच्छाशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करण्याची अथवा कुठे बाहेर फिरायला जाण्याची तुमची इच्छा होत नाही.

 

१०) तुम्हाला कोणत्याही छोट्या-छोट्या गोष्टींचा राग येतो तसेच चिडचीड होते.

 You get angry and irritated with any small things

आपल्या मनाप्रमाणे जर एखादी गोष्ट घडली नाही, तर तुम्हाला चिडचिड होते. तसेच आपल्या घरातील लोक, मित्र तसेच इतर लोकांकडून घडलेल्या छोट्या-छोट्या चुकांवरुन तुम्हाला राग येतो.

 

११) तुम्हाला खूप झोप येते किंवा कितीही प्रयत्न केला तरीही झोप लागत नाही.

You do not sleep or sleep anytime

डिप्रेशनच्या अवस्थेत अतिशय विचार केल्यामुळे थकवा जाणवून तुम्हाला कधीही झोप येऊ लागते, अथवा मनामध्ये सतत विचार चालू असल्यामुळे तुम्हाला कधीकधी झोपही लागत नाही.

 

१२) तुम्हाला सर्व सोडून कुठेतरी निघून जावेसे वाटते.

All you want to do is to leave and start a new life

तुमच्या मनामध्ये नेहमी आपले काम, आपले घर, आपल्या सोबतचे लोक यांना सोडून कुठेतरी दूर निघून जाण्याचा विचार कायम येत असतो. ह्या विचारामुळे कुठेतरी जाऊन नव्याने आयुष्यास सुरुवात करण्याची तुमची सतत इच्छा होत असते.

Swapnil Ranveer– स्वप्निल रणवीर

linpaws8@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!