असा करा अपयशाशी सामना

Spread the love

  बऱ्याचवेळा आपण जे कार्य करण्याचे ठरवितो ते कधी-कधी पूर्ण होतच नाही. आपण त्यासाठी केलेले सर्व प्रयत्न किंवा आपण केलेली सर्व मेहनत ही वाया जाते. आपल्याला त्या कार्यात अपयश येते, आपल्याला त्या कार्यात आलेल्या ह्या अपयशामुळे आपण अत्यंत दु:खी होतो. त्यामुळे आपल्याला आपल्याला झोप येत नाही, तसेच भूकही लागत नाही, आपली मनस्थिती सुद्धा बिघडते. कधी कधी तर अपयशी झालेल्या काही काही व्यक्ती आत्महत्याही करतात, असे काही न करता ह्या अपयशातूनच प्रेरणा घेऊन आपण पुन्हा प्रयत्न करून यश मिळविले पाहिजे.

  अपयशातून सावरण्याकरिता ह्या खालील काही सूचनांचा अवलंब करा –

 

१) अपयशामुळे जेव्हा आपली मनस्थिती खराब होते, तेव्हा आपण खचून किंवा घाबरून जातो. अशाप्रकारे मनस्थिती खराब करून घेण्याची किंवा अपयशाने खचून किंवा घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. प्रत्येक स्थितीचा आपण धैर्यपूर्वक सामना करावा. “अपयशाचे दिवस आणि परिस्थिती कधीही कायम तशीच राहात नाही. परिस्थिती आणि वेळ सदैव बदलतच असते”, ह्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेऊन शांत चित्ताने तसेच धैर्याने पुढे वाटचाल करावी.

keep calm and dont give up

 

२) अपयश आल्यानंतर त्या बद्दल दु:खी झाल्यामुळे आपल्या अपयशाची कधीही भरपाई होऊ शकत नाही, त्यामुळे आपण त्याबद्दल अजिबात दु:खी होऊ नका. त्याऐवजी आपल्याला अपयश कशामुळे आलेले आहे? यश मिळविण्याकरिता आपण काय-काय प्रयत्न करणे आवश्यक होते? ह्याचे शांत चित्ताने विश्लेषण करा.

think and analyse your mistakes

 

३) आपण ज्या-ज्या गोष्टी अंमलात न आणल्यामुळे आपल्याला अपयश आले आहे, त्या-त्या सर्वच गोष्टी एका कागदावर क्रमवारपणे लिहून काढा. आपण प्रयत्न करण्यात कुठे-कुठे कमी पडलो आहोत? ह्याचीही तिथे नोंद करा. कोणत्याही समस्येवर काही ना काही तरी उपाय हा हमखास असतोच. आपल्या अपयशावर काय उपाय आहे? त्या संदर्भातही त्या कागदावर नोंद करा.

write down your mistakes and things you could do

 

४) आपण केलेल्या नोंदीनुसार आपल्या अपयशास कारणीभूत ठरलेल्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या धडक कृती कार्यक्रमाचे कागदावर व्यावस्थित वेळापत्रक तयार करा.

plan your timetable

 

५) आपण तयार केलेला धडक कृती कार्यक्रम वेळापत्रकाप्रमाणे ठामपणे त्वरित अंमलात आणण्यास सुरुवात करा.

do as per your timetable

 

६) आपण तयार केलेला धडक कृती कार्यक्रम राबविण्यास आपणास काही अडचण येत असेल तर त्या संदर्भात पुन्हा योग्य व्यक्तीची मदत अथवा सहकार्य मिळविण्याचाही प्रयत्न करा.

get help from others

 

७) आपल्या प्रयत्नात किंवा कृती कार्यक्रमात काही त्रुटी, काही अडथळे, काही कमतरता असतील तर त्या लगेच दूर करण्याचाही प्रयत्न करा.

 try to solve your problems by your own

८) एक, दोन किंवा तीन प्रयत्नातही आपल्याला यश मिळत नसेल तर, यश मिळेपर्यंत वारंवार नेटाने अथवा जोमाने प्रयत्न करीत राहा. आपण नक्कीच यशस्वी व्हाल, ह्याची खात्री बाळगा. आपल्या अपुऱ्या प्रयत्नांमुळे आपण अपयशी होतो, तर आपली कठोर मेहनत, भरपूर प्रयत्न व योग्य व्यक्तींचे सहकार्य आपल्याला यश मिळवून देण्यास कारणीभूत ठरतात. ह्या गोष्टीचा कधीही विसर पडू देऊ नका.

keep trying until you get success

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!