मानसिक तणावाची कारणे आणि त्यापासून मुक्तीचे उपाय

Spread the love

 पूर्वीच्या काळी आजच्या सारख्या कोणत्याही अत्याधुनिक सुख-सुविधा उपलब्ध नव्हत्या, तरीही पूर्वीचे लोक आजच्यापेक्षा थोडे अधिकच आनंदात राहायचे. आता दिवसेंदिवस मानवाने फार मोठी प्रगती केलेली आहे. प्रवासाची अत्याधुनिक साधने उपलब्ध झालेली आहेत. जगात कुठेही कोणतीही घटना घडली तर काही वेळातच त्या घटनेची सर्वत्र माहिती होते. देशातल्या अथवा जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातील, कोणत्याही व्यक्तीसोबत, केव्हाही काही सेकंदातच मोबाईलद्वारे बोलण्याची आपल्याला सोय उपलब्ध झालेली आहे. विविध रोगांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. थोडक्यात असे म्हणता येईल की, मानवाला आज जे काही हवे आहे, ते सर्व त्याला सहजपणे उपलब्ध होत आहे.

 एवढे सगळे असूनही आजचा मानव आनंदी नाही. त्याच्या जीवनामध्ये आनंद अत्यंत कमी तर दु:ख फार मोठ्या प्रमाणात सामावलेले आहे, असेच त्याला वाटते. ह्याला प्रामुख्याने कोणती कारणे कारणीभूत असावीत? ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. एवढ्या सर्व सुख-सुविधा उपलब्ध असूनही माणूस हा अत्यंत दु:खी मनस्थितीत का जीवन जगत आहे? तो आज एवढा उदास आणि तणावग्रस्त का झालेला दिसत आहे? आपल्याकडे सर्व काही असूनही त्याच्या मनाला कुठेच शांती का मिळत नाही? एवढ्या सगळ्या सुख-सोयी उपलब्ध असूनही त्याच्या जीवनात फारसा कोणताच आनंद का दिसून येत नाही?

reasons why people get stress

 असे का होत आहे? ह्या प्रश्नाचा आपण शोध घेतला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती वरून कितीही आनंदात असल्याचे दाखवीत असली तरीही त्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी दु:ख असल्याचेच जाणवत आहे. त्याला शरिराचे कोणतेही दु:ख अथवा आजार नसून काही तरी मानसिक दु:ख अथवा तणाव असल्याचे दिसून येत आहे. शरिराचे जे काही विविध आजार असतात, ते आजार असलेल्या लोकांचे प्रमाण थोडे कमीच आहे. अत्याधुनिक उपचार आणि औषधी योजनांद्वारे त्या लोकांच्या शारिरीक आजारांवर बऱ्याच प्रमाणात आता नियंत्रणही आणता येते, परंतु मानसिक आजारांवर नियंत्रण आणणे वाटते तेवढे सोपे अजिबात नसते. ज्यांना हे मानसिक आजार असतात त्यांना किंवा त्याच्या परिवारातील लोकांनाच ह्याची कल्पना असते.

some people can't work when they are under stress

 शारिरीक आजार असलेल्या व्यक्ती काही प्रमाणात का होईना, आपले दैनंदिन कार्य करू शकतात, परंतु मानसिक आजारी असलेल्या व्यक्तीचे त्याच्या कोणत्याच कामात कधीच फारसे मन लागत नाही. त्याने कोणतेही काम करण्याचा प्रयत्न जरी केला, तरीही ते काम बिघडण्याचीच अधिक शक्यता असते. वरून ती व्यक्ती कितीही तंदुरुस्त दिसत असली, तरीही ती व्यक्ती मनातून मात्र तणावग्रस्त, निराश झालेला तसेच चिंताग्रस्त असून पूर्णपणे खचललीच असते.

 असे का होते? ह्याचा आपण विचार केला पाहिजे. मानसिक आजार असलेल्या व्यक्ती वास्तविक जीवन जगत नसून, काल्पनिक अवास्तव असेच जीवन जगण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो. वर्तमानाचे त्यांना अजिबात भान नसते, भविष्याच्या त्याच्या अवास्तव कल्पनांना मूर्त स्वरूप मिळत नसल्याचे पाहून त्यांना अत्यंत दु:ख होत असते, त्यामुळेच त्यांची मानसिक स्थिती बिघडून ते तणावग्रस्त आणि मनोरुग्ण होतात. त्यांच्याकडे काय-काय आहे? त्याबद्दल ते सदैव असमाधानीच असतात आणि त्यांच्याकडे काय-काय नाही? त्याबद्दलच ते अत्यंत दु:खी असतात. आपल्याकडे जे काही आहे ह्याबद्दल त्यांना कधीच समाधान वाटत नाही. जे त्यांच्याकडे नाही ते त्यांना लगेच पाहिजे असते. त्याकरिता काही काळ प्रतीक्षा करण्याची त्यांची अजिबात तयारी नसते, त्यामुळेच ते सदैव दु:खी असतात. त्यामुळेच त्यांच्या मनामध्ये सदैव तणाव आणि अशांतता निर्माण झालेली असते. असेच लोक ‘अतृप्त आत्मे’ असतात.

main reason behind the stress is people think

 उदा – एखाद्या व्यक्तीला आपण सद्य परिस्थितीत आहोत त्यापेक्षाही अधिक श्रीमंत व्हावेसे वाटते, त्याकरिता त्याला खूप पैसा मिळवावा असेही वाटते, परंतु हे सहजपणे शक्य नसते, त्यामुळे त्याचे मन अशांत होवून तो तणावग्रस्त झालेला असतो.

 एखादी तरुण व्यक्ती कुणावर तरी एकतर्फीच प्रेम करीत असते. त्या व्यक्तीच्या एकतर्फी प्रेमाला दुसऱ्या व्यक्तीकडून अजिबात प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे ती व्यक्ती तणावग्रस्त होवून तिची मनस्थिती बिघडते. त्या व्यक्तीचे कोणत्याच कामात मन लागत नाही. भविष्यातील व्यर्थ कल्पना केल्यामुळे, तसेच वास्तवाचे भान न ठेवल्यामुळे त्याची अशी दशा होते. कधी कधी अशी व्यक्ती आत्महत्याही करते.

 थोडक्यात असे म्हणता येईल की, अशा व्यक्ती वास्तवाचे भान न ठेवता, अवास्तव अशा इच्छा-आकांशाची पूर्तता होण्याची अपेक्षा ठेवतात. आपल्या इच्छांची पूर्तता होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळेच ते तणावग्रस्त होऊन त्यांची मानसिक स्थिती बिघडते आणि ते मनोरुग्ण होतात.

causes of stress

 अशा तणावग्रस्त व्यक्तीला जेवण जात नाही, झोप येत नाही, त्याची स्मरणशक्ती कमजोर होते, कशातच त्याचे मन लागत नाही. आपले दैनंदिन काम व्यवस्थितपणे करण्याचीही त्याची इच्छा होत नाही. तो नेहमीच उदास राहातो. कुणाशी बोलण्याचीही त्याची इच्छा होत नाही. त्याच्या मनात सदैव आत्महत्येचे विचारही येत असतात. अशा व्यक्तीला एखाद्या मनोरुग्ण तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

 बऱ्याचवेळा तर असेही दिसून येते की, काही-काही व्यक्ती तर आर्थिक दृष्ट्या अत्यंत संपन्न असतात, तरीही त्यांच्या इतर काही अवास्तव अशा इच्छांची पूर्ती होत नसेल अथवा काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडत नसतील, तर ते तणावग्रस्त होऊन आत्महत्यासुद्धा करतात. अशाच प्रसंगातून मागे भय्यू महाराजांनीही आत्महत्या केलेली आहे. (याबद्दल चे आर्टिकल येथे वाचा )

 अनेक महिलांचा त्यांच्या परिवारात विविध कारणास्तव छळ केला जातो. कुणी म्हणतात पत्नी पसंत नाही, तर कुणी म्हणतात पत्नीला घरातील कामे येत नाहीत, तर कुणी-कुणी तिच्याकडे माहेराहून पैसे घेवून येण्याची मागणी करतात, अशावेळी त्या महिला तणावग्रस्त होऊन त्यांची मानसिक स्थिती बिघडल्यामुळे त्या आत्महत्या करतात.

some people choose to suicide because of stress

 अनेक व्यक्तींना, अनेक कारणांमुळे तणाव किंवा मानसिक त्रास होत असतो. त्यांच्या इच्छेप्रमाणे अथवा अपेक्षेप्रमाणे जेव्हा काही गोष्टी घडून येत नाहीत, तेव्हा ते तणावग्रस्त होऊन आत्महत्या करतात. अनेक शेतकरी दुष्काळ पडून पिकपाणी न झाल्यामुळे आत्महत्या करतात. अनेकांना मुलीच्या लग्नाची चिंता असते, त्यामुळेही अनेक लोक आत्महत्या करतात.

 अशाप्रकारे तणावग्रस्त मनस्थिती झालेल्या त्या लोकांच्या जीवनात त्यावेळी काहीतरी मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. त्या प्रश्नाचे उत्तर सोडविण्यास जेव्हा ते असमर्थ ठरत आहेत, असे त्यांना वाटू लागते, तेव्हाच ते तणावग्रस्त होऊन अथवा मानसिक वैफल्य आल्यामुळे ते आत्महत्या करतात.

people should think about alternate way to manage stress

 आपल्या जीवनात एखादा अवघड प्रश्न निर्माण झाल्यामुळे, त्या गोष्टीची चिंता करणे, अथवा त्या गोष्टीची भीती बाळगणे, ह्यामुळेही अनेक व्यक्तींची मानसिक स्थिती बिघडून ते तणावग्रस्त होतात. ह्या तणावातून मुक्त होण्यासाठी त्यांनी त्या गोष्टीचा विचारपूर्वक सामना करून त्यावर काहीतरी पर्याय मिळतो काय? ह्याचा विचारपूर्वक शोध घेतला पाहिजे. ( तणावातून मुक्त होण्यासाठी हे उपाय करून बघा )

 कोणत्याही गोष्टीची भीती त्यांनी मनात न बाळगता त्या भीती वाटणाऱ्या गोष्टीवरही काय पर्याय आहे? हे त्यांनी अगोदर पाहिले पाहिजे. ह्यामधुनच त्याना नक्कीच काहीतरी पर्याय मिळू शकेल.

 एखाद्या गोष्टीबद्दल आत्महत्या करणे, एवढी काही ती गोष्ट निश्चितच मोठी नसते. अशा अवघड गोष्टीचा धैर्यपूर्वक सामना करीत असतांना, कधीच आपला मृत्यू होऊ शकत नाही. हे आपण प्रथमत: लक्षात घेतले पाहिजे.

even the people suffering from stress fear the death

 कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनात सर्वात जास्त भीती त्याच्या मृत्यूचीच वाटत असते. त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ज्यांचा-ज्यांचा जन्म झालेला आहे, त्यांचा केव्हा ना केव्हा तरी मृत्यू हा निश्चितपणे होणारच आहे. मृत्युपासून कधीच कुणाचीही सुटका होत नसते. त्यामुळे व्यर्थपणे मृत्यूची भीती बाळगण्यात काहीच अर्थ नाही. जेव्हा आपला मृत्यू होणार असेल, तेव्हा तो होईलच. त्यापेक्षा अगोदर कधीही आपला मृत्यू होऊ शकणार नाही, आणि त्यापेक्षा नंतरही आपला मृत्यू कधीच होणार नाही, त्यामुळे आपण अवेळीच मृत्यूची भीती बाळगण्यातही काहीच अर्थ नाही.

 तसेच आपल्या जीवनात एखादा फार मोठा प्रश्न जरी निर्माण झाला असेल, आणि तो प्रश्न आपल्याला योग्य प्रकारे सोडविता येत नसेल, तर त्या प्रश्नाला आपण न सोडवू शकल्यामुळे निश्चितच आपला जीव जाणार नाही, हे सुद्धा आपण लक्षात ठेवले पाहिजेत. त्या प्रश्नाला घाबरून आपण स्वत: आत्महत्या करण्याची अजिबात गरज नाही. ( आत्महत्या करण्याऐवजी, ह्या पर्यायांचा शोध घ्या )

 सुरुवातीला आपण त्या गोष्टींवर पर्याय शोधून पाहाणे आणि जर तो पर्यायसुद्धा मिळत नसेल तर त्या प्रश्नाकडे त्यावेळी पूर्णपणे दुर्लक्ष करून त्या संदर्भात काहीही विचार न करता आपण आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या गोष्टीचे काय परिणाम होणार असतील, ते होऊ देणे. तो प्रश्न शक्य झाल्यास पुढे कधीतरी सवडीने सोडविण्याचा प्रयत्न करणे.

 जी गोष्ट होणे टळत नाही, त्या गोष्टीकरिता व्यर्थ चिंता करून आपली मानसिक स्थिती बिघडविण्यात अथवा आपण तणावग्रस्त राहण्यात काहीही अर्थ नाही. जीवनातील चांगल्या अथवा वाईट, अशा सर्वच घटनांचा शांतपणे सामना करा. कोणत्याही घटनेमुळे तणावग्रस्त होऊ नका. कोणतीही घटना कितीही वाईट असली तरीही, त्यामुळे आपला कधीही जीव जाऊ शकत नाही. आपल्यावर आलेले हे अत्यंत वाईट दिवसही अगदी सहजपणे निघून जातील, असा विश्वास ठेवावा.

 जीव जाण्याकरिता आपल्यालाच स्वतः आत्महत्या करावी लागते. त्यामुळे आपण तणावग्रस्त होऊन कधीही आत्महत्या करणार नाही, असा आपण पक्का निर्धार केला पाहिजे. सदैव आनंदात राहून, मजेने हसत-खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ( अशाप्रकारे जीवनात नेहमी हसत राहा )

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

2 thoughts on “मानसिक तणावाची कारणे आणि त्यापासून मुक्तीचे उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!