इतरांच्या नजरेत आपण विश्वासपात्र आहोत काय?

Spread the love

जगात जेवढे काही कामे चालू आहेत, ती सर्व कामे एकमेकांच्या विश्वासावरच चालू आहेत. जगात जेवढे काही आपसातील निते, मैत्रीचे किंवा व्यवसायाचे संबंध चालू आहेत, ते सुद्धा एकमेकांच्या विश्वासावरच चालू आहेत. आपण इतरांच्या विश्वासास पात्र आहोत की नाही? ह्या संदर्भात आपल्याला आता गंभीरपणे विचार करावा लागेल. आपण इतरांच्या विश्वासास पात्र आहोत काय? याचेही आपणास आता उत्तर द्यावे लागेल. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर “विश्वासपात्र” ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

always try to speak the truth

विश्वासपात्र असणे म्हणजे आपण इतरांना दिलेला जो काही शब्द आहे किंवा इतरांशी आपली जी काही बांधिलकीची भावना किंवा कर्तव्य आहे, त्यानुसार त्याचे आपण शंभर टक्के योग्यवेळी, योग्य तर्हेने पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या जगामध्ये कुणाही मार्फत, कोणत्याही बाबतीत, जे काही कार्य होत आहेत, ते सर्व विश्वासाच्या भरवशावरच तर होत आहेत. जगामध्ये आज जेवढे काही नाते संबंध पाळल्या जात आहेत, ते सर्व विश्वासाच्या भावनेवरच पाळल्या जात आहेत. हे नाते पाळतांना एकमेकांना दिलेला जो काही शब्द असतो, तो शब्द एकमेकांनी शेवटपर्यंत पाळणे आवश्यक असते. दिलेला शब्द, दिलेल्या वेळी पाळल्यामुळेच आपला एकमेकांवरील विश्वास कायम टिकून राहातो, त्यामुळेच आपली नाती शेवटपर्यंत टिकतात. दिलेला शब्द, दिलेल्या वेळी न पाळल्यामुळे किंवा तो शब्द पाळण्याच्यावेळी काहीतरी कारण सांगून शब्द पाळण्याचे टाळल्यामुळे अथवा त्या व्यक्तीसोबत विश्वासघात केल्यामुळेच संबंधित व्यक्तीची विश्वासपात्रता नष्ट होते आणि तो व्यक्ती लबाड, खोटारडा किंवा इतरांची फसवणूक करणारा आहे, अशी त्याची नवीन ओळख समाजामध्ये होऊ लागते. ह्याचा परिणाम असा होतो की, त्या व्यक्तीने कुणाला जर काही शब्द दिला असेल तर त्या त्याच्या शब्दांवर पुन्हा कुणीही विश्वास ठेवीत नाहीत. अशा विश्वासपात्र नसलेल्या व्यक्तीशी कोणीही आपले कोणतेही नाते संबंध ठेऊ इच्छित नाहीत. त्याच्यासोबत पुन्हा कोणताही व्यवहार करू इच्छित नाहीत. ( खरे बोलून, अशाप्रकारे दिलेला शब्द पाळा )

untrustworthy people avoid taking calls when people call them

विश्वासपात्र नसलेल्या व्यक्तीला जेव्हा कुणाला शब्द द्यायची वेळ येते, तेव्हा तो त्याला अगदी सहजपणे शब्द देतो. परंतु त्याचवेळी त्याच्या मनात हे सुद्धा विचार नक्कीच आलेले असतात की, एन वेळी ह्या व्यक्तीला आपण कोणत्या कारणाने अथवा कोणत्या बहाण्याने कसे काय टाळायचे? मग जेव्हा त्या व्यक्तीने कुणाला त्यांच्या कामासंदर्भात कोणती वेळ दिलेली असेल तर अशा वेळी तो व्यक्ती संबंधित व्यक्तीला भेटण्याचे शिताफीने टाळतो. अनेक वेळा तो व्यक्ती घरी भेटायला येण्याअगोदरच तो व्यक्ती घरून निघून जातो. आपल्या कामासंदर्भात कुणी त्या व्याक्तीला फोन केले तर तो व्यक्ती फोनसुद्धा उचलत नाही किंवा एखादे नवीन काहीतरी काल्पनिक कारण सांगून विश्वासपात्र नसलेला व्यक्ती इतरांना किंवा त्याच्या कामांना टाळत असतो. ( खोटे बोलण्याचे, असे असतात दुष्परिणाम )

relations breaks when the trust breaks

आपल्याला जीवन जगण्यासाठी ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टींची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे त्यासोबतच आपल्यामध्ये “इतरांच्या प्रती विश्वासार्हता” असणेही अत्यंत आवश्यक असते. ही विश्वासार्हता असल्यामुळेच पती-पत्नीचे, आई-वडील आणि मुलांचे, भावा-भावांचे, भाऊ-बहिणींचे, मित्रांचे किंवा कुणाचेही कोणतेही नाते संबंध आपआपसात टिकून राहातात. जेव्हा एकमेकांप्रती असलेली कर्तव्य भावना अजिबात पाळल्या जात नाही, तेव्हाच मग ही विश्वासार्हता संपते आणि मग त्यानंतरच एकमेकांशी असलेली नाती सुद्धा संपविण्यात येतात. ह्यानंतरच मग घटस्फोट होतात, तसेच नात्यातील दुराव्याच्या घटना घडत असतात. एकमेकांशी असलेले संबंध फक्त नावापुरतेच राहातात. त्यामध्ये मग आत्मियता, प्रेम, जिव्हाळा अजिबात दिसून येत नाही. ( असे केल्याने, नक्कीच तुमचे मित्र आणि हितचिंतक वाढतील )

big companies shuts down because of untrustworthy people

त्याचप्रमाणे मालक आणि कामगारांमध्ये ही विश्वासार्हतेची भावना असणे अत्यंत आवश्यक आहे, दोघांपैकी कुणाही एकाने आपली विश्वासार्हता जपली नाही, आपण दिलेला शब्द पाळला नाही, एकमेकांच्या प्रती असलेल्या कर्तव्याचे योग्यवेळी योग्य तर्हेने एकमेकांनी पालन केले नाही, तर आपसातील संबंध कटू होऊन ते लगेच संपतात. ह्याचाच परिणाम अनेक कंपन्या बंद पाडण्यातही होतो. ( बोलतांना नेहमीच अशाप्रकारेच बोलावे )

आज कोणत्याही शहरातील बंद पडलेल्या कंपन्यासंदर्भात जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे दिसून येईल की, कर्मचाऱ्यांना कंपनी मालकाने वेळेवर पगार न दिल्यामुळेच त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत. त्या कंपन्यातील कामगार तर आपले काम व्यावस्थितरित्या करीतच असतात, परंतु तरीही त्या कंपनीच्या मालकाच्या मनातच बेईमानी निर्माण होते. अशावेळी मग तो काहीही कारणे सांगून कामगारांना त्यांच्या ठरलेल्या वेळी त्यांचा पगार द्यायला टाळाटाळ करतो, अशावेळी त्या कामगारांना दुसरीकडे काम शोधणे अपरिहार्य ठरते. त्यामुळेच असे कामगार ती कंपनी सोडून दुसरीकडे कामाला निघून जातात आणि त्यामुळेच त्यांची अगोदरची कंपनी बंद पडते.

उदा – विजय माल्या, निरव मोदी, मेहुल चौक्सी किंवा यांच्यासारखेच अनेक मोठे उद्योगपती जेव्हा त्यांच्या मनात बेईमान आली तेव्हा ते आपला सर्व पैसा घेऊन विदेशामध्ये पळून गेले. त्यांच्या कामगारांनाही त्यांनी त्यांची पगार देण्यास टाळाटाळ केली. परिणामी ह्या सर्वच लोकांच्या कंपन्या बंद पडल्या. ह्या कंपन्यांच्या नावावर ह्या उद्योगपतींनी हजारो कोटी रुपयांची कर्जे सुद्धा घेतलेली होतीच.

हे तर मोठ्या लोकांच्या बाबतीत झाले, परंतु अनेक ठिकाणी, अनेक सर्वसामान्य लोकांच्या बाबतीतही अशाच प्रकारच्या घटना घडत असतात.  म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपली “विश्वासार्हता” टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केलाच पाहिजे. मग ही विश्वासार्हता आप-आपसातील नात्यांमधील असो, अथवा आपल्या कोणत्याही आपआपसातील व्यवहारातील असो. ( अशाप्रकारे विश्वासपात्र बना )

आपण इतरांना दिलेल्या शब्दांचे, दिलेल्या वेळेत पालन केलेच पाहिजेत. जेव्हा अपान इतरांना दिलेला शब्द टाळतो, तेव्हा त्या कामाप्रती अथवा त्या व्याक्तीप्रती आपल्या मनात काहीतरी नकारात्मक भावना निश्चितपणे असते. म्हणूनच आपण त्या व्यक्तीला लबाड बोलू फसवीत असतो, किंवा दिलेल्या वेळात त्याचे काम करण्याचे आपण मुद्दामच टाळत असतो. ह्यामुळे आपली विश्वासार्हता नष्ट होऊन, इतर लोकांमध्येही मग आपल्या ह्या दुर्गुणाबद्दल निश्चितपणे चर्चा होत असते. लोक आपल्यापासून दूर राहू लागतात किंवा ते आपल्याला सोडून निघून जातात. म्हणून आपण नेहमीच आपल्या स्वत:च्या बाबतीत, आपल्या स्वतःच्या कार्यासंदर्भात, आपण इतरांना दिलेल्या शब्दांचे कटाक्षाने पालन केलेच पाहिजेत. त्यामुळेच आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, आपल्या पूर्वजांचा, तसेच आपल्या घराण्याचाही चांगला नावलौकिक आणि विकास होईल, ह्या गोष्टीवर आपण निश्चितपणे विश्वास ठेवण्यास हरकत नाही.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com

9326962651


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!