दृढ इच्छाशक्ती असली तरच आपण यशस्वी होतो !

Spread the love

आपण आपल्या जीवनात सफल होण्याकरिता किंवा यश मिळविण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करतो परंतु तरीही अनेकवेळा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. त्या अपयशाचे नेमके कारण शोधण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला लक्षात येते की यश मिळविण्याची आपली केवळ इच्छा होती. त्यामुळेच आपण अपयशी झालो आहे. वास्तविक पाहाता यशस्वी होण्याकरिता आपली केवळ इच्छा असून काहीही उपयोग नसतो, तर त्याकरिता त्यासोबत आपल्या मनामध्ये आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्ती असणेही आवश्यक असते.

आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्ती नसल्यामुळे काय होते?

What happens because of lack of confidence and strong will

यशस्वी होण्यासाठी अनेकांची परिश्रम करण्याची तयारी असते, त्यांच्यामध्ये कोणतेही काम करण्याचे साहस असते, आपले काम इमानदारीने सतत करण्याचीही त्यांची तयारी सुद्धा असते, परंतु त्यांच्यामध्ये ते कार्य करण्याची जर दृढ इच्छा शक्तीच नसेल तर ते एखादे अवघड वाटणारे कार्य कधीच सुरु करण्यास पुढाकार घेणार नाहीत.

दृढ इच्छा शक्तीच्या अभावी त्यांच्यातील इतर गुणही निप्रभ असून ते अपयशी होतील.

अनेकांना वाटते की, एखाद्या कार्यामध्ये यशस्वी होण्याकरिता पैसा, ज्ञान, कार्य करण्याची शक्ती असणे आवश्यक असते, परंतु ज्यांच्या-ज्यांच्या कडे ह्या गोष्टी आहेत त्यातील अनेक लोक अपयशी होतात, कारण त्यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी असूनही केवळ आत्मविश्वास आणि दृढ इच्छा शक्ती नसल्यामुळे ते अशा अवघड कार्यास कधी सुरवातच करीत नाहीत.

आत्मविश्वास आणि दृढ इच्छा शक्ती असल्याचे परिणाम !

आपल्याला असेही काही लोक पाहायला मिळतात ज्यांच्याजवळ पैसा नव्हता, साधन-सामग्रीही नव्हती परंतु तरीही त्यांच्या मनामध्ये ते कार्य करण्याविषयी प्रचंड आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्ती असल्यामुळेच ते अगदी सहजपणे यशस्वी झाले होते.

दृढ इच्छाशक्ती नसेल तर काय होते?

एखादे अवघड कार्य समोर आल्यानंतर अनेकांना वाटते की हे कार्य खूप कठीण आहे ते आपल्याला कधीच जमणार नाही, असे वाटल्यामुळे अनेक लोक ते कार्य करण्यापासून अलिप्त होतात, मागे हटतात, अपयशाच्या भीतीने ते कार्य करण्यास नकार देतात. त्या कार्यास ते कधीच सुरुवातही करीत नाहीत.

आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्ती असण्याचे परिणाम !

The result of being confident and strong will!

ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्ती असते, असे लोक मात्र कोणतेही कार्य करण्याचे स्वीकारतात. ते कार्य करण्याकरिता त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वासासोबतच दृढ इच्छाशक्तीही असते, त्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावरच ते लोक सातत्याने परिश्रम करून स्वीकारलेल्या कामात यश मिळवितात. ते काम करतांना जर त्यांच्या काही चुका झाल्या तर ते विचारपूर्वक काम करून आपल्या त्या कामात सुधारणा करून नक्कीच यश मिळवितात.

आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्तीचा अभाव असण्याची कारणे –

Reasons for lack of confidence and strong will

आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्तीचा गुण एखाद्या व्यक्तीमध्ये येण्यासाठी त्या व्यक्तीवर त्याच्या बालपणी त्याचे पालक जे काही संस्कार करतात त्यामुळेच हे गुण त्यांच्यामध्ये निर्माण होतात.

उदा – एखादे अवघड कार्य करतेवेळी एखाद्या बालकाचे आई-वडील त्या बाळाच्या अतिसुरक्षेच्या विचारातून त्या बालकाला ते कार्य करण्याकरिता उत्तेजन न देता ते कार्य करण्यापासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न करतात. ते त्याला म्हणतात “अरे सायकल चालवू नकोस, पडशील”, “अरे झाडावर चढू नकोस, पडशील”, “क्रिकेट खेळू नकोस, चेंडू लागेल”, “पोहायला जाऊ नकोस, पाण्यात बुडशील” वगैरे वगैरे…. अशा अनेक प्रकारच्या नकारात्मक गोष्टीमुळे त्या मुलामध्ये बालपणी आत्मविश्वास तसेच दृढ शक्तीची निर्मिती कधीच होत नाही. सदैव नकारात्मक विचारामध्येच तो लहानाचा मोठा होतो. मोठे झाल्यावर सुद्धा त्याला सर्व साधन-सामग्री आणि पैसा असूनही अपयश येईल, ह्या भितीने त्याच्यामध्ये कोणतेही कठीण कार्य करण्यासाठी आत्मविश्वास तसेच दृढ इच्छाशक्तीचा अभाव आढळून येतो आणि त्यामुळे अशा प्रवृत्तीचे लोक इतरांच्या तुलनेत कायम मागे पडत असतात.

आत्मविश्वास तसेच दृढ इच्छाशक्ती वाढविण्याचे उपाय –

Increase Confidence and Strong Will

आपल्या मनातील आतमविश्वास तसेच दृढ इच्छाशक्तीचा विकास करण्याकरिता आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या समोर जेव्हा एखादे कठीण काम येईल तेव्हा आपण त्यामध्ये अपयशी होऊ ह्या भीतीने त्या कार्यास नकार देण्याएवजी, एक कागद घेऊन त्या कागदावर आपण त्या कार्याची रूपरेषा लिहावी. ते कार्य कोणत्या पद्धतीने कसे केले पाहिजे? ह्या संदर्भातील नियोजन त्या कागदावर लिहून काढावे, नंतर ते कार्य सफल झाले तर आपला कसा, किती आणि काय फायदा होईल? हे सुद्धा लिहावे. तसेच त्या कार्यात अपयश आल्यास आपले कसे, किती आणि काय नुकसान होईल? ह्याचीही कागदावर नोंद घ्यावी. मग तेवढे होणारे नुकसान आपण सहन करण्यास तयार आहोत काय? ह्याचाही विचार करावा आणि नुकसान करण्याची तयारी ठेवूनच त्या कार्यात यशस्वी होण्याच्या दृष्टीने आत्मविश्वास पूर्वक दृढ इच्छाशक्ती ठेवून परिश्रम पूर्वक तसेच विचारपूर्वक कार्याला सुरुवात करावी. ह्यामुळे आपल्याला कदाचित त्या कार्यात अपयश येणारही नाही.

एखादे कठीण कार्य पूर्ण करतेवेळी विविध प्रकारच्या अडचणी येण्याची शक्यता असते. आत्मविश्वास आणि दृढ इच्छाशक्ती ठेऊन त्या अडचणींचा धैर्यपूर्वक सामना केल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

 

– भगवान रणवीर

bhagwanranveer1@gmail.com


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!