आपल्या मोबाईलची बॅटरी लाईफ वाढवण्याचे १२ सोपे उपाय

Spread the love

१००% चार्जिंग करून देखील आपला मोबाईल फक्त ३ ते ४ तास चालतो? आपण आपल्या स्मार्टफोन मधील बॅटरीची ही मर्यादा काही सेटिंग्ज व ऑप्शनमध्ये बदल करुन वाढवू शकतो.

 

१) स्क्रीन ब्राइटनेस कमी करा.

decrease the brightness of your screen

आपल्या मोबाईल स्क्रीनची ब्राइटनेस लेवल ही नेहमी कमी ठेवा. स्क्रीनच्या ब्राइटनेस मधून जेवढा प्रकाश बाहेर पडतो तितकी जास्त प्रमाणात आपल्या मोबाईलची बॅटरी ही कमी होत असते. बऱ्याच मोबाईल्समध्ये ऑटो-ब्राइटनेसचे ऑप्शन असते, जे सभोवतालच्या लाईट लेवलनुसार आपल्या स्क्रीनची ब्राइटनेस आपोआप कमी जास्त करते. आपल्या मोबाईल मध्ये ऑटो-ब्राइटनेस हे ऑप्शन असल्यास शक्यतो याला बंदच ठेवा व आपल्यालाला हवी तेवढी, हवी तेव्हा स्क्रीन ब्राइटनेस कमी जास्त करता येईल अशी सेटिंग स्क्रीन ब्राइटनेस ऑप्शन मध्ये करून ठेवा.

 

२) स्क्रीन टाईम आउट कमी ठेवा.

set minimum screen out time

आपल्या मोबाईलच्या डिस्प्ले सेटिंग्ज मेन्यूमध्ये, आपल्याला ‘स्क्रीन टाइमआउट’ हे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनद्वारे आपण आपल्या मोबाईलवर टच किंवा टॅप केले असतांना आपल्या मोबाईलची स्क्रीन ही किती वेळानंतर ऑटोमॅटिक बंद होते हे नियंत्रित करता येते. आपला स्क्रीन टाईम आउट कमीत-कमी वेळेवर सेट करा. अँड्रॉइड फोनवर स्क्रीन टाईम आउट कमीत कमी 15 सेकंद असतो. आपला स्क्रीन टाइमआउट सध्या 2 मिनिटांवर सेट केला असल्यास, त्या ऑप्शनवर जाऊन 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी टाईम सेट करा.

 

३) लाइव्ह वॉलपेपर, थीम्स व विजेट्स वापरू नका.

dont use live wallpaper and themes

बरेचसे लोक आपल्या मोबाईलला अधिक आकर्षक बनविण्यासाठी त्यामध्ये ‘लाइव्ह वॉलपेपर’, ‘थीम्स’, ‘विजेट्स’ लावतात. विजेट्स आणि लाइव्ह वॉलपेपर आपल्या स्मार्टफोनला आकर्षक तर बनवतात, परंतु ते बॅटरीचे आयुष्यही खराब करतात. आपल्या मोबाईलमध्ये जर आपण लाइव्ह वॉलपेपर लावला असेल तर तो बदलून एखाद्या फोटोला वॉलपेपर सेट करा, आणि ‘वेदर’, ‘क्लॉक’ इत्यादी सारखे विजेट्स लावले असतील तर ते ही तिथून डिलीट करून टाका.

 

४) ब्लूटूथ, वायफाय बंद करा.

turn off the bluetooth and wifi

मोबाईल मधील ब्लूटूथ ऑप्शन आपण साधारणपणे ब्लूटूथ सपोर्ट असलेल्या डिव्हाईसला आपला मोबाईल कनेक्ट करण्यासाठी वापरतो. जेव्हा आपण आपल्या कार किंवा घरात असलेल्या ब्लूटूथ स्पीकर्सला आपला मोबाईल कनेक्ट करून गाणे वाजवत नसेल तेव्हा आपल्या मोबाईल मधील ब्लूटूथ हे बंद ठेवा. त्याचप्रमाणे आपल्या मोबाईल मधील वाय-फाय देखील बॅटरी कमी करणारे ऑप्शन आहे. घरात किंवा ऑफिसमध्ये वाय-फाय कनेक्शन असल्यावर इंटरनेट ऍक्सेससाठी आपण वायफाय ऑप्शन ऑन करून वाय-फाय कनेक्शनशी कनेक्ट होतो. जेव्हा आपण घरातून किंवा ऑफिसमधून बाहेर येतो तेव्हा देखील आपले वायफाय ऑप्शन चालूच असते, जेव्हा आपल्याला वाय-फाय कनेक्शनशी कनेक्ट होऊन इंटरनेट ऍक्सेस करायचे नसेल तेव्हा मोबाईल मधील वायफाय ऑप्शन बंद ठेवा.

 

५) जीपीएस सिस्टीम ऑफ करा.

turn of the gps system

आपल्या मोबाईल मधील जीपीएस सिस्टीम ऑन असल्यास ही बॅकग्राऊंडला सतत चालू राहून इंटरनेट डाटा सोबतच मोबाईलची बॅटरी देखील कमी करत असते. जीपीएस सिस्टीम तेव्हाच ऑन करा जेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल, अन्यथा जीपीएसचे ऑप्शन हे ऑफ ठेवा.

 

६)  बॅकग्राऊंडला चालणारे अॅप्स बंद करा.

close the background apps

आपल्या मोबाईलमध्ये आपण एका वेळी एकापेक्षा अधिक अॅप्स चालवू शकतो, म्हणजेच आपण WhatsApp मिनिमाईज करून Facebook, Instagram इत्यादी वापरू शकतो. काही वेळा आपण या सर्व अॅप्स वापरल्यानंतर त्या व्यवस्थित बंद न करता आपला मोबाईल लॉक करून ठेवून देतो. त्यावेळी या अॅप्स बॅकग्राऊंडला तशाच चालू असतात व यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरी कमी होते. अॅप्सचा वापर करून झाल्यानंतर त्या अॅप्सला व्यवस्थितपणे बंद करून, आपण आपल्या मोबाईलच्या CPU चे वर्कलोड कमीतकमी करू शकता. यामुळे बऱ्याच प्रमाणात बॅटरी वाचेल.

अॅप्स व्यावस्थितपणे बंद करण्यासाठी : ‘रिसेंट अॅप’ बटण टॅप करा (सामान्यतः स्क्रीनच्या तळाशी असलेल्या तीन बटणापैकी डावे बटण). रिसेंट अॅप्समध्ये तुम्हाला तुम्ही मिनिमाईझ केलेल्या अॅप्स दिसतील ज्या व्यवस्थित बंद न केल्यामुळे बॅकग्राऊंडला चालू असतील. आता ज्या अॅप्स बंद करायच्या आहेत त्या स्वाईप करून अथवा ‘क्लिअर’च्या चिन्हावर टॅप करून बॅकग्राऊंडला चालू असलेल्या सर्वच अॅप्स आपण एकाच वेळी बंद करू शकतो.

 

७)  व्हायब्रेशन वापरू नका.

dont use vibration option

आजकाल सहसा लोक आपला मोबाईल रिंगटोन मोडवर न ठेवता व्हायब्रेशन मोडवर ठेवतात. व्हायब्रेशनला रिंगटोन पेक्षा जास्त प्रमाणात बॅटरी लागते. आपण जर ऑफिसमध्ये अथवा कोणत्या मिटिंगमध्ये असाल तर आपला मोबाईल व्हायब्रेशनवर न ठेवता त्याला सायलेंट मोडवर ठेवा. त्याचसोबत काही मोबाईल्समध्ये कीबोर्डवरील किज प्रेस करतांनाही व्हायब्रेशन लावलेले असते, असे आपल्या मोबाईलमध्ये सेट केलेले असेल तर ते बंद करून टाका.

 

८) आवश्यक नसलेल्या नोटिफिकेशन्स बंद करा.

turn off the unimportant notifications

मोबाईलचा ‘इंटरनेट डाटा’ ऑन केल्या केल्या आपल्याला WhatsApp, Facebook, Instagram, News इत्यादी अॅप्सच्या नोटिफिकेशन्स दिसतात. यांपैकी ज्या अॅप्सच्या नोटिफिकेशन्स आपल्या कामाच्या नसतात त्या बंद करून ठेवा.

नको असलेले नोटिफिकेशन्स बंद करण्यासाठी : ज्या अॅपचे नोटिफिकेशन्स तुम्हाला बंद करायचे असतील त्या अॅपच्या आयकॉनवर टॅप करून ठेवा, ‘अॅप इन्फो’ चे चिन्ह दिसेल त्यावर टॅप करा, खाली ‘मॅनेज नोटिफिकेशन्स’ किंवा ‘नोटिफिकेशन्स’ ऑप्शन असेल त्यावर टॅप करा, त्या अॅप समोरील ‘अलाऊ नोटिफिकेशन्स’चे बटन ऑन केलेले असेल ते ऑफ करून घ्या.

 

९) वापरात नसलेले गेम्स व अॅप्स डिलीट करा.

uninstall unimportant apps

मोबाईलचे ‘Clash Of Clans’ सारखे ऑनलाईन गेम्स हे बंद केल्यानंतर देखील बॅकग्राऊंडला चालू असतात, यामुळे मोबाईलची बॅटरी कमी होते. या गेम्स सोबत ‘PUBG’ सारखे हाय ग्राफिक्स असणाऱ्या गेम्स मुळे देखील बॅटरी जास्त प्रमाणात कमी होते. असे ऑनलाईन अथवा हाय ग्राफिक्स असणारे गेम्स आपल्या मोबाईलमधून अनइनस्टॉल करून टाका. बॅकग्राऊंडला चालू राहाणाऱ्या गेम्स सारख्याच काही अॅप्स असतात ज्या तुम्ही वापरत नसाल तरीही बॅकग्राऊंडला चालू असतात, अशा अॅप्स एक तर डिलीट करा किंवा त्यांना ऑफ करून टाका.

बॅकग्राऊंडला चालू असणाऱ्या अॅप्स ऑफ करण्यासाठी : जी अॅप तुम्हाला बंद करायची असेल त्या अॅपच्या आयकॉनवर टॅप करून ठेवा, ‘अॅप इन्फो’ चे चिन्ह दिसेल त्यावर टॅप करा, तिथे ‘फोर्स स्टॉप’ ऑप्शन दिसेल ते सिलेक्ट करा व ‘ओके’ बटण प्रेस करा.

 

१० )  पॉवर-सेव्हिंग मोड ऑन ठेवा.

turn on the power saving mode

आपल्या मोबाईलची बॅटरी २०% पर्यंत पोहोचल्यावर पॉवर-सेव्हिंग मोड ऑन करण्यासाठी नोटिफिकेशन येते. पॉवर-सेव्हिंग मोड ऑन केल्यावर अॅप्सचे ‘बॅकग्राऊंड सिंक’ ऑफ केले जाते. त्याचसोबत स्क्रीनचा ब्राईटनेस देखील कमी होतो. आपण जेव्हा मोबाईल वापरत नसेल तेव्हा पॉवर-सेव्हिंग मोड ऑन केल्यावर आपल्या मोबाईलची बॅटरी खूप प्रमाणात वाचेल.

 

११) एअरप्लेन मोड वापरा.

set your mobile on airplane mode before sleeping

रात्री झोपतांना आपला मोबाईल एअरप्लेन मोडवर सेट करा. एअरप्लेन मोड आपल्या मोबाईल मधील नेट्वर्किंग तसेच वायरलेस सर्व्हिसेस ऑफ करून मोबाईलची बॅटरी वाचवेल.

 

१२) ऑटोमॅटिक अॅप अपडेट्स ऑफ ठेवा.

turn off the auto updates

आपल्या मोबाईलची बॅटरी जास्त काळ टिकवायची असल्यास, ‘ऑटोमॅटिक अॅप अपडेट्स’ ऑफ ठेवणे हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ऑटोमॅटिक अॅप अपडेट्स बंद केल्याने मोबाईल डाटा अथवा वाय-फाय ऑन केल्यावर बॅकग्राऊंडला अॅप्स अपडेट होणे बंद होतील व तितकीच आपल्या मोबाईलची बॅटरी वाचेल.

ऑटोमॅटिक अॅप अपडेट्स ऑफ करण्यासाठी : Google Play Story  उघडा आणि वर डाव्या कोपर्यातील मेनू चिन्हावर टॅप करा. नंतर,  ‘सेटिंग्ज’वर टॅप करून ‘जनरल’ मधील ‘ऑटो अपडेट अॅप्स’ सिलेक्ट करा. तिथे टॅप केल्याने ‘डोंट ऑटो अपडेट अॅप्स’ हे ऑप्शन निवडा.

Swapnil Ranveer– स्वप्निल रणवीर

linpaws8@gmail.com

 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!